
Pune : जगभरात मंकीपॉक्सचा वेगाने प्रसार होऊ लागला आहे. आफ्रिकेतील देशांसह पाकिस्तानमध्येही हा संसर्ग पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून उच्चस्तरीय बैठकांचे सत्र सुरू आहे. देशात अनेक राज्यांत आफ्रिकेतील विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. यामुळे काही राज्यांनी आपापल्या आरोग्य यंत्रणांना अतिदक्षतेचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्राने मात्र केंद्राकडून मार्गदर्शक सूचना नसल्याने त्या काढता येत नसल्याचे तांत्रिक कारण समोर केले आहे.
जगभरात मंकीपॉक्सचा संसर्ग वाढला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने १४ ऑगस्टला हे चिंताजनक आरोग्य संकट म्हणून जाहीर केले. मंकीपॉक्सच्या रुग्णांची संख्या आफ्रिकेतील देशांमध्ये वाढत आहे. त्याच वेळी पाकिस्तानमध्येही या रोगाचा शिरकाव झाला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी शनिवारी (१७ ऑगस्ट) उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी उपाययोजना करण्याचे निर्देश राज्यांना दिले. याचबरोबर भारतात एकही रुग्ण आढळला नसल्याने घाबरून जाऊ नये, असे आवाहन केले. त्यानंतर राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राच्या संचालकांनी सर्व राज्यांच्या आरोग्य विभागांची बैठक रविवारी (ता.१८) घेतली. यात त्यांनी राज्यांना उपाययोजनांचे निर्देश दिले.
|
Pune Rain : पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; सुट्टीच्या दिवशी पुणेकरांची तारांबळ |
विशेष म्हणजे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून बैठकांचा धडाका सुरू असताना अद्याप मंकीपॉक्सबाबत नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर झालेल्या नाहीत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंकीपॉक्सबाबत २०२२ मध्ये मार्गदर्शक सूचना काढल्या होत्या. महाराष्ट्रात अद्यापही २०२२ च्या मार्गदर्शक सूचनांचा आधार घेतला जात आहे. केंद्राने मार्गदर्शक सूचना न काढल्याने महाराष्ट्रानेही मार्गदर्शक सूचना काढलेल्या नाहीत. त्यामुळे मंकीपॉक्सबाबत नेमक्या काय उपाययोजना करावयाच्या, असा प्रश्न आरोग्य यंत्रणांसमोर उपस्थित झाला आहे.
मुंबई, पुण्याला धोका अधिक
मुंबई आणि पुण्यात परदेशी विद्यार्थी शिक्षणासाठी येण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यातही आफ्रिकी देशांतील विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. परदेशातून येणाऱ्या विद्यार्थ्यांमुळे या शहरांत मंकीपॉक्सचा संसर्ग होण्याचा धोका आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचना नसल्यामुळे स्थानिक आरोग्य यंत्रणा कोणतीही पावले सध्या याबाबत उचलताना दिसत नाहीत. याच्या उलट तमिळनाडू राज्य सरकार आणि दिल्ली व हैदराबाद शहरातील स्थानिक प्रशासनांनी याबाबत मार्गदर्शक सूचना जारी करून आतापासूनच मंकीपॉक्सचा संसर्ग रोखण्याची पावले उचलली आहेत.
मंकीपॉक्सच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राच्या संचालकांनी बैठक घेतली. यात त्यांनी उपाययोजनांचे निर्देश दिले आहेत. देशात अद्याप एकही रुग्ण आढळून आलेला नाही, त्यामुळे घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. केंद्र सरकारने मंकीपॉक्सबाबत नव्याने मार्गदर्शक सूचना काढल्यानंतर राज्याच्या आरोग्य विभागाकडून त्या काढल्या जातील.
शहर
- पुणे: एम.ए. रंगूनवाला कॉलेजतर्फे अबेदा इनामदार इम्प्लांटोलॉजी आणि डिजिटल दंतचिकित्सा केंद्राचा शुभारंभ
- पुणे: आषाढी वारीची सांगता! 'ज्ञानोबा-तुकाराम'च्या जयघोषाने देहूनगरी दुमदुमली, तुकोबा पोहोचले देहूला.
- मुंबई: मॉर्निंग वॉकला जाणे पडले महागात; मुंबईत पहाटे फिरायला गेलेल्या तरुणावर चाकूने वार करत पैसे लुटले!
- चंद्रपूर: अंगणवाडीतील पोषण आहाराच्या तांदळात आढळले जिवंत किडे; प्रयोगशाळेकडून तांदूळ 'असुरक्षित' घोषित.
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: आंबोलीत मन हेलावणारी दुर्घटना: धबधब्यावर सर्पदंश झालेल्या पर्यटकाचा वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकल्याने उपचाराअभावी मृत्यू
- पुणे: एम.ए. रंगूनवाला कॉलेजतर्फे अबेदा इनामदार इम्प्लांटोलॉजी आणि डिजिटल दंतचिकित्सा केंद्राचा शुभारंभ
- जळगाव: जामनेर आगारातून नवी कोरी एसटी बस लांबवली; बसचे चाक पंक्चर होताच चोरट्याने रस्त्यातच सोडली!
- मुंबई: मॉर्निंग वॉकला जाणे पडले महागात; मुंबईत पहाटे फिरायला गेलेल्या तरुणावर चाकूने वार करत पैसे लुटले!
गुन्हा
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- पुणे: प्रियकरासोबत राहत असल्याच्या रागातून पतीने केला पत्नीचा निर्घृण खून.
- पुणे: माणुसकी वेशीवर! पुण्यातील खराडी येथे मुळा-मुठा नदीपात्रात आढळला नवजात चिमुकलीचा मृतदेह; पोलिसांनी सुरू केला सखोल तपास.
- पुणे: भोरमध्ये संतापजनक घटना; दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पोटच्या आईलाच दारुड्या मुलाने लोखंडी रॉडने ठेचून संपवले, मृतदेह घरात ठेवून पळाला.
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमानच्या मुलाला अपघात: गायक ए.आर. अमीनच्या कारला चेन्नईत धडक, थोडक्यात बचावला!
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- बिहार: आईच्या उपचारासाठी जमीन गहाण ठेवली, एका गायीपासून सुरू केला प्रवास; बिहारच्या रोशन कुमार यांची प्रेरणादायी यशोगाथा.
- दिल्ली: ४२ वर्षीय महिला वकिलाचा हैदरपूर उड्डाणपुलावरून पडून मृत्यू; पतीने ढकलून दिल्याची कुटुंबीयांची तक्रार, पतीवर गुन्हा दाखल.



























Subscribe to my channel



