
Mumbai : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमिवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी ऐरोली टोलनाक्यावर करण्यात आलेल्या नाकाबंदीत दोन कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले. याप्रकरणात सराईत टोळी असल्याचा संशय आहे. नवघर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून एकाला अटक केली असून आरोपीकडून सुमारे दोन किलो एमडी आणि मोटरगाडी जप्त करण्यात आली आहे.
१५ ऑगस्ट रोजी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी १४ ऑगस्टपासूनच मुंबईतील सुरक्षा वाढविण्यात आली आहे. या पार्श्वभूमिवर विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. मुंलुंड येथील एरोली नाका येथेही अशाच प्रकारे नाकाबंदी करण्यात आली होती. त्याअंतर्गत मुंबईत प्रवेश करणाऱ्या मोटरीची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यावेळी पोलीस निरीक्षक चौहान, सहाय्यक पोलीस निरीक्षक धाडगे व पोलीस उपनिरीक्षक दणाने यांच्या पथकाने एक बलेनो मोटर अडवली.
|
Pune : कर्वेनगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच सोसायटीतील चार सदनिका फोडण्याचा प्रयत्न |
मोटरगाडीची तपासणी केली असता संशयीत भुकटी सापडली. त्यामुळे चालक मोहम्मद कलीम सलीम चौधरीला (२७) मोटरीतून खाली उतरण्यास सांगितले. त्यानंतर अमली पदार्थ चाचणी कीटच्या साह्याने तपासणी करण्यात आली असता ती पिवळसर पावडर एमडी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर याबाबतची माहिती नवघर पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांची अतिरिक्त कुमक घटनास्थळी दाखल झाली. तपासणी केली असता आरोपीकडून दोन किलो २९ ग्रॅम एमडी सापडले. त्याची किंमत दोन कोटी दोन लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याशिवाय गुन्ह्यात वापरण्यात आलेली बलेनो मोटरही पोलिसांनी जप्त केली. याप्रकरणी चौधरीविरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौधरी कुर्ला येथे गाझीमिया दर्ग्याजवळ राहतो. चौधरीची चौकशी केली असता याप्रकरणात साकीब नावाच्या आरोपीचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्याचा शोध सुरू आहे. आरोपीने यापूर्वीही अनेक वेळा अशा प्रकारे अमली पदार्थांची तस्करी केल्याचा संशय आहे. त्याबाबत पोलीस तपास करीत आहेत.
पोलीस हवालदार हनुमंत सावंत यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात आणखी दोन व्यक्तींचा सहभाग असल्याची माहिती उघड झाली आहे. त्यांचा शोध सुरू आहे. आरोपींनी एमडी कुठून आणले. याबाबत माहिती मिळविण्यात येत असून आरोपीला बुधवारी न्यायालयापुढे हजर करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. आरोपीकडून मोटर व एमडी असा एकूण दोन कोटी सात लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शहर
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
महाराष्ट्र
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल


























Subscribe to my channel



