
पुणे : व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनी, तसेच आर्थिकदृष्ट्या मागास (ईबीसी), आर्थिकदृष्ट्या मागास घटक (ईडब्ल्यूएस), सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग (एसईबीसी), इतर मागास वर्ग (ओबीसी) प्रवर्गातील विद्यार्थी-विद्यार्थिनींकडून प्रवेशावेळी शिक्षण शुल्काची रक्कन न घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. असे असतानाही शैक्षणिक शुल्क भरण्याची सक्ती करणाऱ्या महाविद्यालयांवर आता कारवाई करण्यात येणार आहे.
तंत्रशिक्षण संचालक (डीटीई) डॉ. विनोद मोहितकर यांनी या बाबतचे निर्देश विभागीय सहसंचालकांना दिले. राज्य सरकारने चालू शैक्षणिक वर्षापासून ६४२ अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थिनींना पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांना १०० टक्के शुल्क सवलत (मोफत शिक्षण) देण्याचा निर्णय घेतला.
|
|
त्यानुसार विद्यार्थिनींना, तसेच ईबीसी, ईडब्ल्यूएस, एसईबीसी, ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना प्रवेशावेळी शिक्षण शुल्क न भरता प्रवेश देणे आवश्यक असताना काही महाविद्यालये विद्यार्थिनींकडे शुल्क भरण्यासाठी तगादा लावत आहेत. त्याबाबत तक्रारी करण्यात आल्यानंतर आता शुल्क भरण्याची सक्ती करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे तंत्रशिक्षण संचालनालयाने जाहीर केले.
राज्यातील अभियांत्रिकी, व्यवस्थापन, औषधनिर्माणशास्त्र अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थिनींना प्रवेश देताना प्रवेश देताना शैक्षणिक शुल्कात १०० टक्के सवलत द्यायची आहे. तसेच ईबीसी, ईडब्ल्यूएस, एसईबीसी, ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थी-विद्यार्थिनींकडून प्रवेशावेळी शिक्षण शुल्क न घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शुल्क भरण्याची सक्ती करणाऱ्या महाविद्यालयांना विभागीय सहसंचालकांनी प्रत्यक्ष भेट देऊन महाविद्यालय प्रशासनाला समज द्यावी. तसेच केलेल्या कारवाईचा अहवाल डीटीईकडे पाठवण्याबाबत डॉ. मोहितकर यांनी स्पष्ट केले.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




