
Mumbai : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते परळदरम्यान पाचव्या-सहाव्या मार्गासाठी आता नव्याने चाचपणी सुरू झाली आहे. सीएसएमटी परिसरातील जागेची मर्यादा लक्षात घेऊन हार्बर लोकल सँडहर्स्ट रोड स्थानकातच थांबवण्याचा प्रस्ताव रेल्वेने तयार केला असून, त्याची चाचपणी केली जात आहे. यामुळे सीएसएमटीतील हार्बरसाठीचा फलाट अतिरिक्त फलाट म्हणून उपलब्ध होणार आहे. यासोबतच भायखळ्यातील जागेची मर्यादा लक्षात घेऊन जलद लोकलसाठीचा फलाट तोडून त्या ठिकाणी अतिरिक्त मार्ग उभारण्यात येणार असल्याने जलद लोकलचा भायखळा थांबा रद्द करण्याबाबतही व्यवहार्यता अभ्यासण्यात येत आहे.
एमयूटीपी-२ अंतर्गत सीएसएमटी ते कुर्ला पाचवा-सहावा मार्ग सन २००८मध्ये मंजूर करण्यात आला होता. रुळांलगत असलेल्या जागेच्या अनुपलब्धतेमुळे सीएसएमटी ते परळ आणि कुर्ला ते परळ अशा दोन टप्प्यांत प्रकल्प राबवण्यात येत आहे. आज, बुधवारी मध्यरात्रीनंतर वाहतुकीस बंद होणाऱ्या शीव रेल्वे उड्डाणपुलाची पुनर्बांधणी हा कुर्ला ते परळदरम्यानच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रमुख भाग आहे. सीएसएमटीतील फलाट क्रमांक १ आणि २वरून पनवेल/वाशी/अंधेरी हार्बर लोकल धावतात. या सर्व हार्बर लोकल सँडहर्स्ट स्थानकापर्यंतच आणून तेथूनच त्यांचा परतीचा प्रवास सुरू होईल. सीएसएमटीतील फलाट क्रमांक १ ते ७ मुख्य मार्गासाठी वापरता येतील. भायखळा स्थानकातून जलद लोकलवरील प्रवाशांची संख्या कमी आहे. यामुळे याचा वापर नव्या मार्गिकांकरिता करण्यासाठी जलद मार्गावरील फलाट तोडून त्या ठिकाणी नवी मार्गिका उभारणे शक्य आहे.
|
Pune News : कॉलेजमधलं अफेअर, तो म्हणाला आपण लग्न करु, तिचा नकार अन् पुण्यात भरदिवसा भयंकर घडलं |
हार्बर लोकल सँडहर्स्ट रोडपर्यंत चालवणे आणि जलद लोकलचा भायखळा थांबा हटवणे हा एकमेव पर्याय सीएसएमटी ते परळदरम्यान अतिरिक्त मार्गिकांसाठी कमी खर्चात आणि निश्चित कालावधीत करणे शक्य आहे. यामुळे याची व्यवहार्यता तपासणे सुरू करण्यात आले आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. सँडहर्स्ट रोड स्थानकात हार्बर मार्ग उन्नत आणि मुख्य मार्ग जमिनीवर आहे. यामुळे हार्बरने सीएसएमटीपर्यंत प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांना मुख्य मार्गावरील लोकल पकडून सीएसएमटी गाठणे शक्य आहे. हा पर्याय प्रवाशांच्या दृष्टीने जुन्या प्रस्तावापेक्षा अधिक दिलासादायक ठरणार आहे, असे रेल्वे अधिकारी सांगतात.
पाचव्या-सहाव्या मार्गिकांसाठीच्या जुन्या प्रस्तावात डॉकयार्ड रोड स्थानकावरून पूर्व मुक्तमार्गे हार्बर रेल्वे पुढे नेण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. त्यानुसार सीएसएमटीमध्ये फलाट क्रमांक १८वर डेक उभारून त्या ठिकाणाहून हार्बर धावती करण्याचे नियोजन होते. यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टच्या ताब्यातील जागेची गरज होती. मात्र, पोर्ट ट्रस्टने रेल्वे प्रशासनाला जागा देण्यास सकारात्मकता दाखवली नाही. त्याचबरोबर वडाळा-कासारवडवली मेट्रो-४चे सुरू असलेले काम आणि मुक्तमार्गाचे विस्ताराचे नियोजन यांमुळे उन्नत हार्बर प्रस्ताव बारगळला. नव्या प्रस्तावानुसार जलदगतीने काम केल्यास दोन वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन तयार आहे, असा विश्वास रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
सीएसएमटी ते परळ पाचवी-सहावी मार्गिका
- लोकमान्य टिळक टर्मिनस ते कल्याणदरम्यान पाचवी-सहावी मार्गिका आहे.
- परळ ते कुर्लादरम्यानचा टप्पा पूर्ण केल्यानंतर परळ ते कल्याणपर्यंत ४४ किमीचा मार्ग उपलब्ध.
- सीएसएमटी-परळ परिसरात खासगी जागेचे संपादन करण्याची गरज असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची गरज आहे.
शहर
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
महाराष्ट्र
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल


























Subscribe to my channel



