Pune : भिडे आणि शिवणे पूल पुन्हा पाण्याखाली

Pune : खडकवासला धरण साखळीत संततधार पाऊस सुरू असल्याने रविवारी रात्री मुठा नदीत मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आले. धरणातून विसर्ग सुरू झाल्यानंतर सोमवारी सकाळी भिडे पूल आणि शिवणे पूल पुन्हा पाण्याखाली गेले आहेत.

धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे रविवारी रात्रीनंतर विसर्ग सुरू करण्यात आला. नदीकाठच्या वसाहतींना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. सोमवारी सकाळी भिडे पूलावरुन पाणी वाहून लागल्याने पोलिसांनी पुलाच्या दोन्ही बाजूस तात्पुरते कठडे उभे करून पूल वाहतुकीस बंद केला.

Pune : अपघाती मृत्यू झालेल्या महापालिका कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना ‘इतक्या’ लाखांची मिळणार नुकसान भरपाई…

भिडे पुलावरून जाणाऱ्या वाहनांनी डेक्कन जिमखाना, छत्रपती संभाजी पूलमार्गे इच्छितस्थळी जावे. पाणी ओसरल्यानंतर पूल वाहतुकीस खुला करून दिला जाईल, असे वाहतूक पोलिसांनी कळविले आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *