
Pune : कोट्यवधींची संपत्ती, अलिशान कार, गाडी, बंगला, फ्लॅटस आणि आरामदायी लाईफस्टाईल असतानाही नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र मिळवलं. अंध-अपंगांच्या प्रमाणपत्रावर सनदी अधिकारी बनल्या, तरीही कार चालवून कार्यालयात जातात, विविध खोट्या प्रमाणपत्रांचा आधार घेऊन आयएएस अधिकारी बनलेल्या पूजा खेडकर यांचे अनेक कारनामे समोर येत आहेत. वडिलांच्या पाऊलावर पाऊल टाकत अधिकारी होण्याचं स्वप्न पूजा खेडकर यांनी बाळगलं, पण त्यासाठी गैरमार्गाचा वापर केल्याचं आता समोर येत आहे. त्यातच, त्यांच्या मातोश्रींचाही एक दमदाटी करण्यात येत असल्याचा बंदुकधारी व्हिडिओ समोर आला होता. तसेच, पुण्यातील बाणेर रोडवरील बंगल्याच्या जागेत त्यांनी अनधिकृतपणे सरकारी जागेवर अतिक्रमण केल्याचं उघडकीस आलं आहे. आता, याप्रकरणी पुणे महापालिकेनं त्यांच्या घरावर नोटीस चिटकवली आहे.
खेडकर कुटुंबीयांकडून पुण्यातील बाणेर भागातील त्यांच्या बंगल्याच्या बाहेर असलेल्या फुटपाथवर अतिक्रमण करण्यात आलंय. फुटपाथवर कठडे करून त्यात झाडें लावण्यात आली आहेत. खेडकर कुटुंबाचे एकामागोमाग एक कारनामे उघड झाल्यानंतर पुणे महापालिकेने हे अतिक्रमण काढून टाकण्याची नोटीस खेडकर यांच्या बंगल्यावर चिकटवली आहे. खेडकर कुटुंबीयांनी पुढील 7 दिवसांत अतिक्रमण काढून न घेतल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे, आता खेडकर कुटुंबीयांना 7 दिवसांत बाणेरच्या बंगल्यासमोरील अतिक्रमण हटवावे लागणार आहे, अन्यथा कारवाई अटळ आहे.
|
Pune : लोणावळ्यात गेल्या २४ तासांत तब्बल २१६ मिलिमीटर रेकॉर्डब्रेक पावसाची नोंद |
पूजा खेडकर ह्या पुणे इथं प्रशिक्षणार्थी काळात वादाच्या भोवऱ्यात अडकल्या होत्या. त्यानंतर पूजा खेडकर यांना प्रशिक्षणार्थी म्हणून वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर सहायक जिल्हाधिकारी म्हणून 11 जुलै रोजी रुजू झाल्या आहेत. पहिल्याच दिवशी त्यांनी वाशिमच्या जिल्हाधिकारी एस.बूवनेश्वरी यांची भेट घेऊन वाशिमच्या जलसंपदा विभागासह 12 जुलै रोजी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे प्रशिक्षण घेतले. इथून पुढे आठवड्याचे पहिले दिवशी म्हणजेच सोमवार 15 जुलै पासून 19 जुलैपर्यंत अकोला येथील प्रकल्प अधिकारी आदिवासी विभाग म्हणून आठवडाभर कामकाज प्रशिक्षण करिता हजर होणार आहेत. त्यानंतर 22 जुलै पासून विविध शासकीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्या कामकाजाचा अनुभव घेणार आहेत.
पुजा खेडकर यांनी दिव्यांग असल्याचं सर्टिफिकेट मिळवलंय ते अहमदनगर जिल्हा रुग्णालयातुन. 2021 साली मिळवलेल्या या सर्टिफिकेटमध्ये त्यांना दृष्टीदोष असल्याचं आणि मानसिक विकलांगता असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे अहमदनगरच्या या जिल्हा रुग्णालयांतील तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सकांची चौकशी करण्याची मागणी आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केलीय.
वादग्रस्त प्रशिक्षार्थी आयएएस अधिकारी पुजा खेडकर या दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रीय दृष्टीहीन संघाकडून करण्यात आली आहे. पुजा खेडकर यांनी जर अंध असल्याचं खोटं प्रमाणपत्र सादर केलं असेल तर त्यांनी एका खऱ्या अंध व्यक्तीवर अन्याय केलाय, असं या संघटनेचे सदस्य असलेल्या अंध व्यक्तींच म्हणणं आहे. एखाद्या व्यक्तीला किमान चाळीस टक्के दृष्टीदोष असला तरच त्या व्यक्तीला दिव्यंगत्वाचे प्रमाणपत्र मिळते आणि अशी व्यक्ती कार चालवणं तर दुरच, पण लिहू-वाचू देखील शकत नाही, असेही या अंध व्यक्तींच म्हणणं आहे. त्यामुळे पुजा खेडकर यांनी प्रमाणात कसं मिळवलं असा प्रश्न आता अंध संघटनेने विचारला आहे.
पूजा खेडकर प्रकरणी एक सदस्य समिती स्थापन करण्यात आली आहे. जर या समितीच्या तपासात खेडकर दोषी आढळून आल्या तर पूजा खेडकर यांची गच्छंती अटळ असल्याची माहिती आहे. पूजा खेडकर यांनी सादर केलेल्या दस्तावेजांची तपासणी या समिती मार्फत केली जाणार आहे. नॉन क्रिमिनल आणि मेडिकल दृष्टी दोष चाचणी कोणी केली होती, ज्या रहिवासी भागातून जे प्रमाणपत्र देण्यात आलं त्याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सोमवार किंवा त्यानंतर या प्रकरणात कारवाई केली जाऊ शकते.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!



























Subscribe to my channel



