
Latest Maharashtra News : महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा, सर्व घटकांना न्याय देणारा आणि सर्व समाजांना सोबत घेऊन जाणारा राज्याचा अर्थसंकल्प आहे. जनतेला, महिला भगिनी, शेतकरी आणि कष्टकरी वर्गाला हा 'निर्धार अर्थसंकल्प' न्याय देईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.
तब्बल दोन तास केलेल्या भाषणात पवार यानी विरोधकानी अर्थसंकल्पाबाबत केलेले सर्व आरोप फेटाळून लावत, खोटे नरेटिव्ह आणि प्रत्येक बाबीला विरोध न करण्याचा सल्ला विरोधकांना दिला. दरम्यान, अजित पवार यांच्या भाषणावर बोलू न दिल्याने विरोधकांनी घोषणा देत सभात्याग केला.
यावेळी बोलताना ते म्हणाले, "राज्य सरकारचा पारदर्शक प्रशासनावर भर असून लाभार्थ्यांना मिळणारे अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शिष्यवृत्ती, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना अप्रेंटिसशिपसाठी देण्यात येणारे विद्यावेतन, मुलींना उच्च व व्यावसायिक शिक्षणासाठी देण्यात येणारी शिष्यवृत्ती, अन्नपूर्णा योजनेंतर्गत तीन मोफत सिलिंडरसाठीचे अनुदान, शेतकऱ्यांसाठी देण्यात येणारे अनुदानही 'डीबीटी' मार्फत थेट त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. "विविध योजनांसाठीच्या तरतुदींचा धावता आढावाही पवार यांनी यावेळी घेतला.
|
|
राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर करण्याच्या नियोजनाबाबत सांगताना ते म्हणाले, "राज्य चालविणाऱ्याऱ्यांनी नेहमीच मोठी स्वप्ने बघितली पाहिजेत आणि ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सर्व ताकद पणाला लावली पाहिजे
देशाने पाच ट्रिलियन डॉलरपर्यंत अर्थव्यवस्था नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. ते पूर्ण व्हायचे असेल तर त्यात महाराष्ट्राची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. म्हणून महाराष्ट्राची अर्थव्यवस्था २०२८ पर्यंत एक ट्रिलियन डॉलर आणि त्यापुढच्या काळात साडेतीन ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचे ध्येय ठेवलेले आहे"
पवार म्हणाले, "सन २०२४-२५ च्या अर्थसंकल्पीय अंदाजानुसार महसूली जमा ही मागील आर्थिक वर्षपिक्षा ४९ हजार ९३९ कोटीनी अधिक आहे. महसुली जमेत साधारणतः ११.१० टक्के इतकी वाढ आहे. केंद्राच्या महसुली करातसुद्धा वाढ होत आहे. त्यामुळे केंद्राकडून राज्यांना मिळणाऱ्या कर हिश्श्यातही मोठी वाढ होणार आहे.
जीएसटी, व्हॅट, व्यवसाय कराचा एकत्रित विचार केला तर त्यात सातत्याने वाढ होत आहे. दरवर्षी साधारणपणे ३० ते ३५ हजार कोटी रुपयांची वाढ असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मागच्या वषपिक्षा १४ हजार ८५४ कोटी रुपयांनी राजकोषीय तूट वाढली असली तरी ती कमी करण्यासाठी राज्य सरकार उपाययोजना राबवीत आहे."
वर्ष २०२३-२४ मध्ये सात लाख सात हजार ४७२ इतके कर्ज अंदाजित होते. २०२४-२५ मध्ये कर्जाचा भार ७ लाख ८२ हजार ९९१ कोटी होणार आहे. कर्जामध्ये १०.६७ टक्के वाढ असली तरी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी कर्ज घेत आहोत आणि राज्याच्या आर्थिक क्षमतेच्या मयदितच हे कर्ज आहे, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.
अजित पवार म्हणाले...
दरडोई उत्पन्नात राज्याचा क्रमांक ११ वा पण मोठ्या राज्यांच्या तुलनेत सहावा क्रमांक
शासकीय पदभरतीचे निबंध शिथिल केले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची कार्यकक्षा वाढवून लिपिक वर्गाची पदे आयोगामार्फत भरणार, कमाल वयोमर्यादा डिसेंबर, २०२३ पर्यंत २ वर्षासाठी शिथिल केली आहे
यापूर्वी १७ जिल्ह्यांत जाहीर केलेली पिंक ई रिक्षा' योजना आता आवश्यक त्या सर्व जिल्ह्यात सुरू केली जाईल
विंदा करंदीकरांच्या कवितेतून टोला
Hearing Aids
अर्थसंकल्पीय चर्चेला उत्तर देताना अजित पवार यांनी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक आणि कवी विंदा करंदीकर यांची एक कविता सभागृहाला ऐकवली. ही कविता सांगण्यापूर्वी त्यांनी विरोधकांकडे हात दाखवत 'एवढे लक्षात ठेवा', असे या कवितेचे शीर्षक असल्याचा टोला लगावत कवितेचे वाचन केले.
उंची न आपुली वाढते, फारशी वाटून हेवा।
श्रेय ज्याचे त्यास द्यावे; एवढे लक्षात ठेवा।
या सुरुवातीच्या ओळीतून त्यांनी आपल्या कवितेचा रोख स्पष्ट करत विरोधकांना चांगलेच चिमटे काढले.
Iपुतळ्याची पाहणी करू
दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात राजर्षी शाहू महाराजांचा नवीन पुतळा बसवला आहे. यामध्ये अनेक बदल करण्यात करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत दिल्ली भेटीवेळी खा. शाहू महाराज छत्रपती यांच्यासोबत पुतळ्याची पाहणी करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली, राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यासंदर्भात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मांडलेल्या स्थगन प्रस्तावावर ते बोलत होते
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!



























Subscribe to my channel



