
Team India Celebration at Wankhede Stadium: टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धा २९ जून रोजी जिंकल्यानंतर भारतीय संघ गुरुवारी (४ जुलै) मायदेशी परतला. मायदेशी परतल्यानंतर भारतीय संघाचं जोरदार स्वागत झालं.दिल्लीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर गुरुवारी संध्याकाळी भारतीय संघ मुंबईत दाखल झाला होता. मुंबईत पोहचल्यानंतर भारतीय संघाची नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियमदरम्यान ओपन बसमध्ये विजयी मिरवणूक काढण्यात आली. यानंतर वानखेडे स्टेडियमवर भारतीय संघाचा सन्मान करण्यात आला होता.
या सन्मान सोहळ्यानंतर भारतीय संघातील खेळाडू आणि सपोर्ट स्टाफने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमला फेरी मारली. यावेळी खेळाडू चाहत्यांचा उत्साह वाढवताना दिसत होते. याचवेळी स्टेडियमवर माँ तुझे सलाम हे गाणं वाजत असताना खेळाडूही चाहत्यांबरोबर ते गाणं गात होते.
|
Beed News : वाळू प्रकरणी तलाठ्यासह मंडळाधिकारी निलंबित; गोदापट्ट्यातून सुरु होता वाळूचा उपसा |
पण याचवेळी चाहत्यांमधून कोणीतरी एक शर्ट मैदानाच्या दिशेने फेकला, तो शर्ट नेमका हार्दिक पांड्याच्या हातात आला. एकाक्षणी हार्दिकही ते पाहून गोंधळल्यानंतर त्याने तो लगेचच खाली टाकला आणि तो पुन्हा सेलीब्रेशन करू लागला. मात्र, हार्दिकच्या हातात अचानक आलेला शर्ट पाहून त्याच्या मागेच असलेल्या जसप्रीत बुमराहला मात्र त्याचे हसू रोखता आले नाही. काही वेळाने अखेर हसणाऱ्या बुमराहकडे वळून नंतर हार्दिकनेही त्याला टाळी दिली. दरम्यान, या क्षणांचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
दरम्यान, भारतीय संघाच्या या विजयोत्सवावेळी चाहत्यांचा मोठा उत्साह दिसून आला. मरिन ड्राईव्हवर हजारो चाहत्यांची गर्दी भारतीय संघाला पाहण्यासाठी जमली होती.
'भारतीय संघाने टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेत बार्बाडोसला झालेल्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला ७ धावांनी पराभूत केले होते. अंतिम सामन्यानंतर बार्बाडोसला आलेल्या चक्रीवादळामुळे भारतीय संघ काही दिवस तिथे अडकला होता. मात्र, त्यानंतर गुरुवारी भातीय संघ मायदेशी परतला.
शहर
महाराष्ट्र
गुन्हा
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती























Subscribe to my channel


