
Nagpur News : अवैधरित्या गाईची तस्करी करणारे पीकअप वाहन समृद्धीच्या एन्ट्री पॉईंट वर उलटल्याने मोठा अपघात झाला आहे. या अपघातात चार गाईंचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय. नागपूर जिल्ह्यातील कामठी येथून निघालेले हे वाहन समृद्धी महामार्गावरून अवैधरित्या गाईची तस्करी करत होते.
दरम्यान, समृद्धीच्या एन्ट्री पॉईंट वर हे पीकअप वाहन आले असता अचानक हा अपघात झाला आहे. ही घटना मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास घडली आहे. हिंगणा पोलिसांनी या प्रकरणी पीकअप गाडी चालक आणि अन्य एका संशयित आरोपीस प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायद्यानुसार अटक केली आहे. सध्या पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहे. मात्र या प्रकरणामुळे समृद्धी महामार्गावरुन पुन्हा गो-तस्करी होतेय का? असा प्रश्न उपस्थित केले जात आहे.
|
|
अपघातात चार गाईंचा जागीच मृत्यू
या प्रकरणातील वाहनचालक जुबेर जान मोहम्मद कुरेशी आणि रिझवान उर्फ रिझु रौब खान दोघे ही कामठीचे रहिवासी आहेत. यात संशयित आरोपींनी पीकअप गाडीमध्ये तब्बल 13 गाई कोंबून भरल्या होत्या. त्यानंतर ते समृद्धी मार्गाने वर्धेकडे जाण्यासाठी निघाले असता समृद्धीच्या एन्ट्री पॉईंट जवळ भरधाव वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन उलटले. त्यामुळे गाडीत असलेली सर्व जनावरे खाली फेकल्या गेलीत. यामध्ये 4 गाईंचा जागीच मृत्यू झालाय. तर इतर गाईना जबर मार असल्याची माहिती समोर आली आहे.
अपघातात गाडीचालक जखमी
अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच हिंगणा पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय वाघ, हवालदार अरुण इंगळे आणि इतर स्टाफ घटनास्थळी दाखल झाले. या अपघातात दोन्ही संशयित आरोपी किरकोळ जखमी झाले होते. त्यांच्यावर उपचार करण्यात आले. तसेच मृत गाईंचा पंचनामा करण्यात आला. तर उर्वरित 9 गायींना नागपूर येथील गोरक्षण समितीकडे देण्यात आले आहे.
गो तस्करी प्रकरणी गुन्हा दाखल
या प्रकरणातील संशयित आरोपींनी 13 गायी कत्तलखान्यात नेण्यासाठी अवैधरित्या गाईची वाहतूक केल्याप्रकरणी हिंगणा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसेच दोन्ही संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.
गो-तस्करांनी केला पोलिसांना चिरडण्याचा प्रयत्न
नागपूरात गोवंश तस्करांची हिंमत इतकी वाढली आहे की, ते आता पोलिसांना चिरडण्यास सुद्धा भीत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. पारडी-कन्हान या मार्गावर गो-तस्कर मालवाहू वाहनाने गोवंशांना कत्तलखान्यात घेऊन जात असल्याची माहिती मिळाली. पोलीस पथकाने त्यासाठी सापळा रचला होता. संशयास्पद ट्रक येताना पाहून पोलीस पथक सतर्क झाले. पोलिसांनी त्या वाहनाला थांबण्याचा आदेश दिला. मात्र, गो तस्करी करत असलेल्या वाहन चालकाने ट्रक थांबवण्याऐवजी गती आणखी वाढवली आणि ट्रक पोलिसांच्या दिशेने घेऊन गेला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे पोलीस भांभावले आणि त्यांनी रस्त्याच्या कडेला उड्या घेतल्या त्यामुळे त्यांचा जीव वाचला. मात्र, तोपर्यंत तो चालक ट्रक घेऊन पळून गेला. पोलीस या प्रकरणातील संशयित आरोपींचा शोध घेत आहे.
शहर
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- गॅस सिलेंडर पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयची कमाई किती? एजन्सीला मिळणाऱ्या कमिशनचे संपूर्ण गणित!
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
महाराष्ट्र
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- नागपुरात आता कचरा फेकणाऱ्यांची खैर नाही! नाल्यांत आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर थेट FIR दाखल होणार.
- पुरोगामी कोल्हापूरला काळिमा! गुप्तधनाच्या लालसेपोटी अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा बाजार; भोंदूगिरीचे वाढते पेव.
गुन्हा
- सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
- मुंबई: कल्याण मध्ये १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या दोघांकडून अत्याचार; दोन नराधमांना अटक!
राजकीय
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!



























Subscribe to my channel

