
Mumbai : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील वाढत्या महिलांवरील अत्याचार, अपहरण आणि ड्रग्स तस्करीच्या घटनांवर तीव्र चिंता व्यक्त केलीये. सरकारने विधिमंडळात दिलेल्या आकडेवारीचा दाखला दिला. त्यावरून राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर असल्याचे त्यांनी म्हटले. दैवी शक्तीच्या नावाखाली किंवा राजकीय आश्रयाने महिलांचे शोषण होत असेल, तर त्यापेक्षा गंभीर बाब नाही, असेही ठाकरे म्हणाले. या प्रकरणातील सर्व दोषींना शोधून कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. दोषींवर कारवाई केल्याशिवाय संत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करण्याचा नैतिक अधिकार सत्ताधाऱ्यांना नसल्याचा टोला त्यांनी लगावला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिकच्या अशोक खरात प्रकरणावर संताप व्यक्त केला. राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित दोषींवर कडक कारवाईची मागणी केली. राज ठाकरे म्हणाले, 'अशोक खरात प्रकरणातील हिडीस तपशील वाचून शब्दशः गरगरल्यासारखं झालंय. काही दिवसांपूर्वी म्हणजे गुढीपाडव्याच्या मेळाव्यात महाराष्ट्राला किती सशक्त परंपरा लाभली आणि महाराष्ट्राने किती अद्वितीय माणसं या देशाला दिल्याचे सादरीकरण केलं होतं. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम ते संत गाडगेबाबांपर्यंतचा ते अगदी आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरेंनी मराठी मनाची कशी मशागत केली हे दाखवलं होतं. त्याच महाराष्ट्रात अशोक खरातसारखा नीच माणूस, राजकारण्यांच्या आशीर्वादाने धुमाकूळ घालतोय. खरंच, 'कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र' हा प्रश्न पडतोय'.
'महाराष्ट्रात राज्यकर्ते आशीर्वाद घ्यायचे, लोकमान्य टिळक यांच्यासारखे नेते भगवद्गीतेचा अर्थ लावणारा 'गीतारहस्य' सारखा ग्रंथ लिहायचे. त्याच महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाणांसारखे नेते आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यात संवाद असायचा. त्याच महाराष्ट्रात नेते तर्काला तिलांजली देऊन कुठलं तरी अजब 'तीर्थ' प्राशन करण्यासाठी अशोक खरातसारख्याच्या भजनी लागताहेत हे भीषण आहे, असे ठाकरे म्हणाले.
'महाराष्ट्रात डिसेंबर २०१३ ला महाराष्ट्र विधानसभेत अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक पारित झालं होतं. त्यावेळी ज्याआमदारांनी हे विधेयक पारित केलं असेल. त्यातील अनेक जण आजदेखील आमदार असतील. किती हा दुर्दैवी विरोधाभास आहे. महाराष्ट्राचं किती अधःपतन झाल्याचे हे द्योतक आहे. अशोक खरात स्त्रियांचं शोषण करतोय, ते झालं तरी चालेल. त्याच्या बदल्यात कुठल्यातरी शक्तीने तो आपलं भलं करेल, असा अजब विश्वास व्यक्त करतोय. त्यासाठी कोडगेपणा हे दोन्ही या राज्यात कुठून आला आहे हेच कळत नाही, असे राज ठाकरे पुढे म्हणाले.
'दैवी शक्तीच्या नावाखाली आणि राजसत्तेच्या आशीर्वादाने स्त्रियांचं शोषण होत असेल तर याच्या इतकं गंभीर काहीच नाही. याला जर वेळीच आवर नाही घातला तर महाराष्ट्र राज्याचं वाटोळं झालं म्हणून समजा. या प्रकरणातले सगळे दोषी शोधून काढा. त्यांना ठेचून काढा. तुम्ही ते केलंत तर आणि तरच तुमच्या भाषणामध्ये संतांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा दाखला देण्याचा अधिकार आहे. अन्यथा नाही, असेही परखड मत राज ठाकरेंनी व्यक्त केले.
शहर
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- गॅस सिलेंडर पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयची कमाई किती? एजन्सीला मिळणाऱ्या कमिशनचे संपूर्ण गणित!
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
महाराष्ट्र
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- नागपुरात आता कचरा फेकणाऱ्यांची खैर नाही! नाल्यांत आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर थेट FIR दाखल होणार.
- पुरोगामी कोल्हापूरला काळिमा! गुप्तधनाच्या लालसेपोटी अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा बाजार; भोंदूगिरीचे वाढते पेव.
गुन्हा
- सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
- मुंबई: कल्याण मध्ये १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या दोघांकडून अत्याचार; दोन नराधमांना अटक!
राजकीय
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!


























Subscribe to my channel

