Vinayak Raut : नारायण राणेंनी तिकीट मिळवून दाखवावं, मग धमकीची भाषा वापरावी; विनायक राऊत यांचं ओपन चॅलेंज

Vinayak Raut :  केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर केलल्या टीकेचा खरपूस समाचार ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी घेतला आहे. नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना इशारा दिल्यानंतर विनायक राऊत यांनी टीका केली. 'नारायण राणे यांनी आधी लोकसभेचं तिकीट मिळवून दाखवावं. त्यानंतर धमकीची भाषा वापरा, असा शब्दात विनायक राऊत यांनी नारायण राणेंना ओपन चॅलेंज दिलं.

खासदार विनायक राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना नारायण राणेंवर टीका केली. 'कोणाच्या बापाचा बाप जरी आला तरी उद्धव ठाकरेंना रोखण्याची कोणाची हिंमत नाही. नारायण राणे यांची धमकीची भाषा ऐकण्याचे दिवस आता गेले आहेत. राणेंनी धमकी द्यायची. नितेश राणेंनी सरपंचांना धमकी द्यायची. निलेश राणेंनी मिमिक्री करायची, एवढ्यासाठीच राणे कुटुंब राहिलेलं आहे, अशी टीका विनायक राऊतांनी केली.

Mumbai Fire : मुंबईतील BKC परिसरातील सरकारी कार्यालयाला भीषण आग

'नारायण राणे हे केंद्रीय लघू व मध्यम उद्योग खात्याचे जिल्ह्यातील पहिले लाभार्थी आहेत. लोकांचं भलं करण्यापूर्वी स्वत:चं भलं करायला निघाले आहे, असा आरोप विनायक राऊत यांनी केला.

नारायण राणे यांच्या आरोपावर भाष्य करताना राऊत म्हणाले,' नारायण राणेंनी नरेंद्र मोदी आणि अमित शहांची सगळी यंत्रणा कामाला लावा आणि माझ्या मुलाने पैसे घेतले हे सिद्ध करा. अन्यथा राणेंनी तोंड बंद करावं आणि हिमालयात जावे. स्वत: दुसऱ्याची पारख करण्याची सवय राणेंना आहे. टक्केवारी तुमचा मुलगा काम करतो. ठेकेदाराने पैसे दिले नाही म्हणून ब्रिजवर नेऊन त्यांना चिखल मारता'.

आशिष शेलार यांनी आज विनायक राऊत यांना पराभवासाठी शुभेच्छा, असा खोचक टोला लगावला. आशिष शेलार यांच्या टीकेला उत्तर देताना विनायक राऊत म्हणाले, 'आशिष शेलार सारखा नौटंकी करणारा माणूस मी महापालिकेपासून बघत आहे. त्यांना फार किंमत द्यायची गरज नाही'.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *