Navi Mumbai : 40 हजार रुपयांची लाच घेताना महसूल कर्मचारी सापडला, एसीबीची नवी मुंबईत माेठी कारवाई

Navi Mumbai : 40 हजार रुपयांची लाच घेताना पनवेल तहसीलदार कार्यालयातील महसूल सहाय्यक किरण गोरे  या अधिकाऱ्याला नवी मुंबई लाचलुचपत विभागाने  रंगेहात पकडले. या कारवाईमुळे पनवेल तहसील कार्यालयातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

तक्रारदार यांची गिरवले येथे शेतजमीन आहे. यातील सर्व्हे नंबर 44 आणि 94/2 मधील त्रुटी दूर करण्यासाठी त्यांनी पनवेल तहसील कार्यालयात जानेवारी महिन्यात प्रकरण दाखल केले हाेते.

Pune Crime News : बॉम्बच्या साहित्यासाठी साताऱ्यात व्यापाऱ्याला लुटले; ‘एटीएस’ची माहिती

या कार्यालयाने तीन महिने तक्रारदार यांच्या अर्जावर कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे तक्रारदाराने महसूल सहाय्यक किरण गोरे यांची भेट घेतली. गाेरेंना त्यांना लाचेची मागणी केली. त्यानंतर तक्रारदाराने एसीबी कार्यालय गाठले. एसीबीने तक्रारीची शहनिशा करुन गाेरेंवर सापळा रचला. त्यात ते सापडले. त्यांच्यावर कायदेशिर कारवाई केल्याचे एसीबीने नमूद केले.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *