Pandharpur Crime News : पंढरपुरात पावणे सहा लाखांचा गुटखा जप्त, तिघांना अटक

Pandharpur Crime News : पंढरपूर शहरात अन्न व औषध प्रशासनाने  3 ठिकाणी छापा टाकून गुटखा जप्त केला आहे. या करावाईत 5 लाख 76 हजार रूपयांचा वेगवेळ्या कंपन्यांचा गुटखा  तसेच सुगंधी तंबाखू युक्त सुपारीचा साठा जप्त करण्यात आला आहे. 

पंढरपूर येथील शहर पोलिस व अन्न व औषध प्रशासन यांच्या संयुक्तरित्या कारवाई करण्यात आली आहे. या पथकाने संजय होनराव यांच्या दुकानातून 72 हजार रुपयांचा गुटखा व सुगंधी सुपारी जप्त केली.

Bengaluru Blast : बेंगळुरू कॅफे स्फोटाचं पुणे कनेक्शन? संशयित दहशतवादी शहरात, तपास यंत्रणा अलर्टवर

याबराेबरच या पथकाने अजित तांबोळी यांच्या दुकानातून 5 लाख रुपयांचा मावा तसेच सागर अभंगराव यांच्या दुकानातून 3 हजार रुपयांचा गुटखा असा एकूण पावणे सहा लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. या प्रकरणी पाेलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *