Chandrapur News : बल्लारपूरहून नागपूरला जाणारी कार चंद्रपूर पाेलिसांनी तपासली, 25 लाखाची रक्कम जप्त

Chandrapur News : आगामी काळात हाेणा-या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर पोलिस सतर्क झाल्याचे पाहायला मिळत आहे. पाेलिसांनी जिल्ह्यात एका चार चाकीमधून तब्बल 24 लाख 75 हजार रुपये जप्त केले. संबंधितांची चाैकशी सुरु असल्याची माहिती पाेलिसांनी दिली. 

बल्लारपूर-चंद्रपूर महामार्गावर गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास एक कारला चंद्रपूर पोलिसांनी थांबविले. या कारची तपासणी केली असता त्यामध्ये काही रक्कम हाेती. ही रक्कम कसली आहे याची चाैकशी पाेलिसांनी केली. परंतु कारमधील लाेकांना समपर्क उत्तर देता आले नाही.

Maha Vikas Aghadi : वंचितला पाच ते सहा जागा सोडण्यासाठी पवार-ठाकरे आग्रही, काँग्रेस आणि राऊत मात्र तीनच जागेवर ठाम

कारमधील व्यक्तीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पाेलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे. पाेलिसांनी अधिक चाैकशी केली असता ही रक्कम बल्लारपूर येथून नागपूरला नेली जात होती. पाेलिसांनी त्याच्याकडून 24 लाख 75 हजार रुपये जप्त केलेय सध्या ही रक्कम कोषागार कार्यालयात जमा करण्यात आली आहे अशी माहिती पाेलिसांनी साम टीव्हीला दिली.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *