
Unseasonal Rain : राज्यात अनेक भागात अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकणात अवकाळी पाऊस सुरु आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गात अवकाळी पावसाची हजेरी दिसून येत आहे. सोमवारी कोकणात मुसळधार पाऊस झाला, यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सिंधुदुर्गात आजही सर्वत्र पहाटे अवकाळी पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे आंबा, काजू उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. ऐन फुलोऱ्यावर आलेली आंबा, काजू पीक धोक्यात आली आहेत. अवकाळी पाऊस पडल्याने किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता तर आंबा आणि काजु पिकाला आलेला मोहोर गळून पडण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे.
गेल्या 24 तासांपासून पावसाची हजेरी
सिंधुदुर्गात बहुतांश भागात गेल्या 24 तासांपासून अवकाळी पाऊस सुरु आहे. सावंतवाडी आणि कणकवली तालुक्यातील काही भागात अवकाळी पावसाचा तडाखा दिसून येत आहे. वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने दोडामार्ग तालुक्याला झोपडपून काढलं. दोडामार्ग तालुक्यात सोमवारी रात्रीपासून अवकाळी पाऊस सुरू आहे.
|
MLA Disqualification : कौल कोणाला? , अवघ्या काही तासांत राज्याच्या राजकारणाचं भविष्य ठरणार |
आंबा, काजू पिकाला फटका बसण्याची शक्यता
बदलत्या वातावरणाचा आंबा, काजू पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या अनेक भागात मध्यरात्री जोरदार पाऊस पाहायला मिळाला. अवकाळी पावसाचा कोकणातल्या आंबा आणि काजू पिकावर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे. काही भागांमध्ये जोरदार तर काही भागांमध्ये रिमझिम पाऊस सुरु असल्याने शेतकऱ्याची चिंता वाढली आहे. पुढील 24 तास कोकणासह राज्याच्या विविध भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणात आज 9 जानेवारीला विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.
रत्नागिरीत जोरदार पावसाच्या सरी
रत्नागिरी जिल्ह्यातील काही तालुक्यात मुसळधार पावसाच्या सरी पाहायाला मिळत आहेत. चिपळूण, संगमेश्वर भागांत रिमझिम पाऊस सुरु आहे. जोरदार पावसामुळे तालुक्यातील काही गावांतील विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे. ऐन थंडीच्या वातावरण असताना पावसाच्या सरी कोसळत आहे. वातावरणातील बदलामुळे आंबा, काजू पीकाला याचा फटका बसू शकतो. सकाळी महाबळेश्वर परिसरात एक तास तुरळक पाऊस पाहायला मिळाला. अवकाळी पावसाचा स्ट्रॉबेरी पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे. स्ट्रॉबेरीवर काळे डाग आणि रोग पडण्याची दाट शक्यता असल्याने बळीराजाचं टेन्शन वाढलं आहे.
शेतकऱ्यांची चिंता वाढली
सिंधुदुर्ग जिल्यातील दोडामार्ग तालुक्यात अवकाळी पाऊस पाहायला मिळत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोमवारी सायंकाळपासून ढगाळ वातावरण होतं. त्यानंतर रात्रीपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली, त्यामुळे आंबा, काजूचं पीक धोक्यात आलं आहे. पुढील दोन दिवस अवकाळी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!



























Subscribe to my channel



