
Sharad Pawar Meet Bachchu Kadu : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि आमदार बच्चू कडू यांच्यात आज अमरावती येथे भेट झाली. यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड जवळ-जवळ 15 ते 20 मिनिटं चर्चा झाली. शरद पवार हे सध्या दोन दिवसांच्या अमरावती दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर असताना बच्चू कडू यांनी शरद पवारांना घरी येण्याचे आमंत्रण दिले होते. त्यावर आज गुरुवारी शरद पवार यांनी वझ्झर येथील शंकर बाबा पापडकर यांच्या आश्रमाला भेट दिल्यानंतर बच्चू कडूच्या निवासस्थानी पूर्णा येथे जाऊन त्यांची भेट घेतली. मात्र या भेटीचे आमंत्रण दिल्यापासून चर्चांना उधाण आल्याचे बघायला मिळाले. त्यानंतर आता बंद दाराआड झालेल्या या भेटीमुळे अनेक राजकीय तर्कवितर्क लावले जात असून चर्चेला जोर मिळाला आहे.
बच्चू कडू काय म्हणाले ?
आज घडीला कुठल्याही राजकीय नेत्यांची भूमिका सहजासहजी लक्षात येत नाही. त्यातच आता प्रहार जनशक्ती पार्टीचे प्रमुख आणि आमदार बच्चू कडू आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात झालेल्या चर्चेमुळे आगामी काळात बच्चू कडू काय भूमिका घेतील हे उत्सुकतेचे ठरणार आहे. मात्र, एकीकडे या चर्चा रंगत असतांना या चर्चाना स्वतः बच्चू कडू यांनी पूर्णविराम दिला आहे. यावेळी बच्चू कडू म्हणाले की, शरद पवार यांच्यासोबत थोडी राजकीय आणि सामाजिक चर्चा झाली. मात्र या भेटी दरम्यान सर्वाधिक चर्चा ही शेतीवर झाली. पेरणी ते कापणीपर्यंत सगळी कामे ही रोजगार हमी योजनेत व्हायला हवेत. ही बाब तुमच्या अजेंड्या मध्ये असायला हवी, असे मी त्यांना सुचवले, असल्याचं बच्चू कडू म्हणाले.
|
|
आकाशात ढगचं आले नाही, ढग येउद्या मग बघू - बच्चू कडू
या भेटी दरम्यान काही राजकीय चर्चा झाल्याचे विचारले असता बच्चू कडू म्हणाले की, आमच्यात राजकीय चर्चा झाली नाही, मात्र समजा जर ती, झाली असेल तरी तुम्हाला सांगायचं काही कारण नाही. बऱ्याच गोष्टी उघड करायच्या नसतात. शिंदे साहेब जोपर्यंत मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही. अजून आकाशात ढगच आले नाही, ढग येउद्या मग पाहू, अशा मिश्किल शब्दात त्यांनी आपली प्रतिक्रिया देत या भेटीतील गुप्तता पाळली.
भेटी बाबत शरद पवार काय म्हणाले ?
सध्या मी दोन दिवसांच्या अमरावती दौऱ्यावर असल्याचे बच्चू कडू यांना माहिती होताच त्यांनी मला चहा घेण्यासाठी घरी येण्याचे आमंत्रण दिले होते. “मी बच्चू कडूंच्या घरी जातोय, त्यात काहीही राजकीय हेतू नाही. एका विधानसभेच्या सदस्यानं चहासाठी बोलावलं, तर एवढी चर्चा करण्याची गरज नाही.” असं सांगत शरद पवारांनी राजकीय शक्यतांना पूर्णविराम दिला आहे.
शहर
- मुंबई: उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निर्देश: राज्यातील सर्व समुद्रकिनाऱ्यांवर जीवरक्षक आणि चेतावणी फलक बंधनकारक करण्याचे आदेश
- पुणे: पदवीधर मतदारसंघ निवडणूक विजयाचा ठाम विश्वास व्यक्त करत उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव आणि स्मिता जाधव यांनी बजावला मतदानाचा हक्क
- मुंबई: ठाणे-भिवंडी मेट्रो मार्गावर अखेर आनंदाची बातमी; या महिन्याच्या अखेरीस सुरू होणार मेट्रोच्या चाचण्या!
- पुणे: निवडणुकीच्या रिंगणात महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; काँग्रेस नेते विश्वजीत कदमांचा जोरदार निशाणा
महाराष्ट्र
- मुंबई: मनोज जरांगे पाटलांच्या ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिप प्रकरणावरून शिंदे गटाचे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, सखोल चौकशीची मागणी
- मुंबई: उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निर्देश: राज्यातील सर्व समुद्रकिनाऱ्यांवर जीवरक्षक आणि चेतावणी फलक बंधनकारक करण्याचे आदेश
- पुणे: पदवीधर मतदारसंघ निवडणूक विजयाचा ठाम विश्वास व्यक्त करत उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव आणि स्मिता जाधव यांनी बजावला मतदानाचा हक्क
- मुंबई: ठाणे-भिवंडी मेट्रो मार्गावर अखेर आनंदाची बातमी; या महिन्याच्या अखेरीस सुरू होणार मेट्रोच्या चाचण्या!
गुन्हा
- गडचिरोली: दारू तस्करीची भन्नाटक्कल उघड: दुचाकींच्या पेट्रोल टाकी अन् सीट कव्हरमध्ये लपवून नेली जात होती दारू, २.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेश: मनेागरणात डेंगूमुळे पतीचा मृत्यू, पाठोपाठ पत्नीनेही दम तोडला; एकाच चितेवर झाले अंत्यसंस्कार
- नवी दिल्ली: परिसीमन विधेयकासाठी भाजपची मोठी चाल इंडिया आघाडीतील सर्वात मोठ्या पक्षाला सोबत घेण्याची तयारी
- नवी दिल्ली: ३० वर्षे तरी तुमचा नंबर लागत नाही, तुम्ही आता परदेशात आहात... केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची राहुल गांधींवर जोरदार टीका!
- गोवा: नागरिकांना मोठा दिलासा जमीन आणि वनाशी संबंधित सर्व समस्या तातडीने सोडवणार, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची ग्वाही!



























Subscribe to my channel




