
Contract Recruitment : कंत्राटी भरतीच्या मुद्द्यावरुन विरोधक सरकारवर सातत्याने निशाणा साधत आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील कंत्राटी भरतीच्या मुद्द्यावरुन अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. आता ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी देखील कंत्राटी भरतीवर टीका केली आहे. कंत्राटी भरतीच्या माध्यमातून आरक्षण संपवण्याचा घाट हे सरकार घालत आहे, असा दावा शेंडगे यांनी केला.
प्रकाश शेंडगे यांनी पत्रकार परिषद घेतओबीसी समाजाची विविध मुद्द्यांवर भूमिका स्पष्ट केली. जरांगे पाटील यांच्या सभेमध्ये सरसकट कुणबी दाखले घेऊन मराठा समाज ओबीसीमध्ये समावेश करण्याची मागणी, मराठवाड्यामध्ये ओबीसीचा एल्गार महामेळाव्याची घोषणा, ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ यांच्यावरील जरांगे पाटील यांनी केलेली वैयक्तिक टीका, सरकारी नोकऱ्यातील ओबीसी समाजाचा अनुशेष व सरकारी नोकऱ्यामधील कंत्राटीकरण यावर प्रकाश शेंडगे यांनी भाष्य केलं.
मनोज जरांगेंच्या सभेबाबत बोलताना त्यांनी म्हटलं की, आरक्षणाचा मागणी वाढत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सभा घेतली. आम्ही त्यांचे अभिनंदन करतो. कारण आमचा त्यांच्या आरक्षणाला विरोध नाही. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण देण्याची त्यांनी जी मागणी केली आहे, त्याला आमचा विरोध आहे.
यापूर्वी मराठा समाजाने ५८ मोर्चे काढले. त्या सर्व मोर्चांना आम्ही समर्थन दिले. मोठा मेळावा घेतला म्हणजे आरक्षण मिळत असं नाही. केवळ सरकारवर दबाव येतो. मराठा आरक्षणाच्या प्रकरणात न्यायालयात बाजू मांडण्यात सरकार कमी पडलं. त्याची शिक्षा ओबीसी समाजाला का? असा सवालही प्रकाश शेंडगे यांनी उपस्थित केला.
ओबीसीचा महामेळाव्याची माहिती देताना शेंडगे यांनी सांगितलं की, हिंगोलीमध्ये १० नोव्हेंबर रोजी हा महामेळावा आयोजित करण्यात येणार आहे. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीमध्ये घुसवण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही रस्त्यावर उतरु. मनोज जरांगे पाटील यांनी स्वत:ची अंत्ययात्रा काढण्यापेक्षा सरकारची अंत्ययात्रा काढावी. घटनेच्या मार्गाने गेलात तरच आरक्षण मिळेल, असा सल्लाही प्रकाश शेंडगे यांनी दिला.
शहर
- टोमॅटोच्या किमती गगनाला भिडल्या! सामान्यांना दिलासा देण्यासाठी सरकारचा 'अनुदानित' विक्रीचा मोठा निर्णय
- शेअर बाजाराची दमदार 'यु टर्न' कामगिरी; सेन्सेक्स ७९० अंकांनी वधारला, निफ्टी पुन्हा २४,००० च्या पार!
- जालन्यात खळबळ: दीड वर्षात १५ बांगलादेशी घुसखोर जेरबंद; बनावट ओळखपत्रांचे मोठे रॅकेट उघड!
- इंडिगोची एअरपोर्ट टॅक्सी सेवा सुरू! आता अवघ्या ४९ रुपयांपासून कॅब बुकिंग, प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा
महाराष्ट्र
- शेअर बाजाराची दमदार 'यु टर्न' कामगिरी; सेन्सेक्स ७९० अंकांनी वधारला, निफ्टी पुन्हा २४,००० च्या पार!
- जालन्यात खळबळ: दीड वर्षात १५ बांगलादेशी घुसखोर जेरबंद; बनावट ओळखपत्रांचे मोठे रॅकेट उघड!
- इंडिगोची एअरपोर्ट टॅक्सी सेवा सुरू! आता अवघ्या ४९ रुपयांपासून कॅब बुकिंग, प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा
- अमरावतीत अंगावर काटा आणणारी घटना! सकाळी फिरायला निघालेल्या मुलालाच आढळला वडिलांचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह; ६५ वर्षीय वृद्धाची निर्घृण हत्या
गुन्हा
- अमरावतीत अंगावर काटा आणणारी घटना! सकाळी फिरायला निघालेल्या मुलालाच आढळला वडिलांचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह; ६५ वर्षीय वृद्धाची निर्घृण हत्या
- लोहगड किल्ला हत्याकांडाचा धक्कादायक खुलासा! केतन अग्रवालचा मृत्यू 'अपघात' नसून मंगेतर आणि तिच्या प्रियकराने केलेली सुनियोजित हत्या
- मुंबई: लोकलमध्ये प्रवाशावर जीवघेणा हल्ला; दरवाजा बंद करण्याच्या वादातून तरुणावर चाकूने वार!
- गोव्यातील आलिशान सोसायटीतून चालत होते सायबर फ्रॉडचे साम्राज्य; ६.२५ कोटींचे व्यवहार उघड, १२ जणांना बेड्या
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- स्कोडाची दमदार एन्ट्री! एका चार्जवर ६४७ किमी धावणार ७-सीटर लक्झरी इलेक्ट्रिक एसयूव्ही 'पीक' (Peaq) लाँच
- उत्तर प्रदेशात खळबळ! काकी गरोदर राहिली अल्पवयीन पुतण्यामुळे; नात्याला काळीमा फासणाऱ्या प्रकरणामुळे गाव हादरले!
- प्रवाशांसाठी मोठा दिलासा! हायवेवर आता मिळणार गाडी दुरुस्ती आणि पंचरची सुविधा; NHAI चा महत्त्वाचा निर्णय
- टेलिग्रामवरील बंदी अखेर उठली; मात्र 'मेसेज एडिटिंग' फिचर ३० जूनपर्यंत बंदच राहणार
























Subscribe to my channel




