
Nanded Hospital Death : शेतात रात्रंदिवस काबाडकष्ट करणाऱ्या एका माऊलीने ९ महिने ९ दिवस पोटात जुळी लेकरं वाढवली. पण जन्मानंतर या लेकरांची अचानक तब्येत खालावली. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. पण दोन्ही लेकरांवर तातडीने उपचार व्हावेत, म्हणून या माऊलीने आपलं मंगळसूत्र देखील गहाण ठेवलं.
पण नियतीने घात केला, सर्वकाही सुरळीत असताना एकाच दिवशी ही दोन्ही बाळं दगावली. मन सुन्न करणारी ही घटना ३२ वर्षीय शेतकरी महिला संगीता मनोज खैरवार यांच्यासोबत घडली. नांदेड येथील घटनेत संगीता यांनी आपली जुळी मुलं गमावली आहेत.
|
|
मुलांच्या विरहानं या माऊलीने दोन दिवसांपासून अन्नाचा त्याग केलाय. संगीता मूळच्यानांदेड जिल्ह्यातल्या त्यांचा विवाह मनमाड येथील मनोज खैरवार यांच्यासोबत झाला होता. मनोज शेतकरी असून ते रात्रंदिवस काबाडकष्ट करतात. लग्नानंतर काही दिवस या दाम्पत्याला मूलबाळ झालं नाही. त्यावर त्यांनी डॉक्टरांचा सल्ला देखील घेतला.
अखेर संगीता आणि मनोज यांना गोड बातमी मिळाली. तुम्ही आई-बाबा होणार आहात, असं डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना सांगितलं. आपल्या घरी लवकरच पाळणा हलणार आहे. दोन बाळं घरात खेळताना, बागडताना दिसतील, असं स्वप्न या दाम्पत्यानं बघितलं होतं.
२८ सप्टेंबर रोजी संगीता यांनी नांदेड येथील एका रुग्णालयात जुळ्या बाळांना जन्म दिला. पण जन्मानंतर त्यांची तब्येत अचानक खालावली. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना तातडीने मोठ्या रुग्णालयात दाखल करा, असा सल्ला दिला. पण पैसे नाहीत. काय करायचं या विवंचनेत हे दाम्पत्य होतं.
पण पोटच्या गोळ्यांवर उपचार व्हायला हवेत. म्हणून संगीता यांनी आपलं सौभाग्याचं लेणं असलेलं मंगळसूत्रही गहाण ठेवलं. त्यानंतर दोन्ही बाळांना नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र, दोन दिवसानंतरच दोन्ही लेकरांनी या जगाचा निरोप घेतला.
संगीता यांना त्यांना डोळे भरून बघताही आलं नाही. “मी त्यांना माझ्या मिठीत घेऊ शकले नाही आणि त्यांचे चेहरेही बघितले नाहीत… त्यांच्या उपचारासाठी मी माझे मंगळसूत्रही विकले…,” असं म्हणत संगीता यांनी हंबरडा फोडला. या घटनेला रुग्णालयातील डॉक्टरच जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला.
शहर
- पुणे: एम.ए. रंगूनवाला कॉलेजतर्फे अबेदा इनामदार इम्प्लांटोलॉजी आणि डिजिटल दंतचिकित्सा केंद्राचा शुभारंभ
- पुणे: आषाढी वारीची सांगता! 'ज्ञानोबा-तुकाराम'च्या जयघोषाने देहूनगरी दुमदुमली, तुकोबा पोहोचले देहूला.
- मुंबई: मॉर्निंग वॉकला जाणे पडले महागात; मुंबईत पहाटे फिरायला गेलेल्या तरुणावर चाकूने वार करत पैसे लुटले!
- चंद्रपूर: अंगणवाडीतील पोषण आहाराच्या तांदळात आढळले जिवंत किडे; प्रयोगशाळेकडून तांदूळ 'असुरक्षित' घोषित.
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: आंबोलीत मन हेलावणारी दुर्घटना: धबधब्यावर सर्पदंश झालेल्या पर्यटकाचा वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकल्याने उपचाराअभावी मृत्यू
- पुणे: एम.ए. रंगूनवाला कॉलेजतर्फे अबेदा इनामदार इम्प्लांटोलॉजी आणि डिजिटल दंतचिकित्सा केंद्राचा शुभारंभ
- जळगाव: जामनेर आगारातून नवी कोरी एसटी बस लांबवली; बसचे चाक पंक्चर होताच चोरट्याने रस्त्यातच सोडली!
- मुंबई: मॉर्निंग वॉकला जाणे पडले महागात; मुंबईत पहाटे फिरायला गेलेल्या तरुणावर चाकूने वार करत पैसे लुटले!
गुन्हा
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- पुणे: प्रियकरासोबत राहत असल्याच्या रागातून पतीने केला पत्नीचा निर्घृण खून.
- पुणे: माणुसकी वेशीवर! पुण्यातील खराडी येथे मुळा-मुठा नदीपात्रात आढळला नवजात चिमुकलीचा मृतदेह; पोलिसांनी सुरू केला सखोल तपास.
- पुणे: भोरमध्ये संतापजनक घटना; दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पोटच्या आईलाच दारुड्या मुलाने लोखंडी रॉडने ठेचून संपवले, मृतदेह घरात ठेवून पळाला.
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमानच्या मुलाला अपघात: गायक ए.आर. अमीनच्या कारला चेन्नईत धडक, थोडक्यात बचावला!
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- बिहार: आईच्या उपचारासाठी जमीन गहाण ठेवली, एका गायीपासून सुरू केला प्रवास; बिहारच्या रोशन कुमार यांची प्रेरणादायी यशोगाथा.
- दिल्ली: ४२ वर्षीय महिला वकिलाचा हैदरपूर उड्डाणपुलावरून पडून मृत्यू; पतीने ढकलून दिल्याची कुटुंबीयांची तक्रार, पतीवर गुन्हा दाखल.



























Subscribe to my channel



