Pune Crime : पुणे हादरलं! ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; तरुणाचे भयंकर कृत्य

Pune Crime : पुण्यातील कोथरुड भागात एका ४ वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडलीय. खाऊ देण्याच्या बहाण्यानं ३० वर्षीय व्यक्तीनं चिमुरडीवर अत्याचार केला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केलीय. राजेश चोरगे असं अटक केलेल्या नराधमाचं नाव आहे. पीडितेच्या आजोबांनी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून याप्रकरणाचा अधिक तपास कोथरुड पोलीस करत आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांच्या घरासमोर राहतात. शनिवारी फिर्यादी यांची ४ वर्षीय नात घराबाहेर खेळत होती. तेव्हा तेथे आरोपी चोरगे त्या आला. पीडितेला खाऊ देण्याच्या बहाण्याने जवळ असलेल्या शंतीबन चौकाजवळ घेऊन गेला. त्या ठिकाणी उभ्या असलेल्या बसच्या खाली नेऊन त्या या नराधमाने चिमुरडीवर अत्याचार केला. तिने आरडा ओरडा केल्यामुळे जवळ असलेल्या लोकांनी हे कृत्य पाहिले आणि त्या चिमुरडीला बसच्या खालून बाहेर काढलं.

तीन नराधमांकडून अत्याचार

मागील महिन्यात कोंढवा येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घडली होती. तीन नराधमांकडून सामूहिक अत्याचार करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतलंय. पीडितेनं पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी पॉस्को कायद्यांतर्गत तिघांविरुध्द गुन्हा दाखल केला.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *