
Maratha Reservation : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जालन्यातील अंतरावाली सराटी गावात जाऊन मराठा आंदोलक जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी जरांगे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. राज्य सरकार मराठ्यांना आरक्षण देण्यास सदैव प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जरांगे यांना सांगितलं.
दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेल्या आश्वासनानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आहे. तब्बल १७ दिवसांनी मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आहे. मुख्यमंत्र्याच्या हातून ज्यूस पिऊन मनोज जरांगे पाटील यांनी अखेर उपोषण सोडले आहे.
मराठा समाजाला आरक्षण तसेच कुणबी प्रमाणपत्र मिळावं, यासाठी मनोज जरांगे पाटील गेल्या १७ दिवसांपासून जालन्यातील अंतरवाली सराटी गावात उपोषण करत आहेत. मराठा समाजाला जोपर्यंत सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळत नाही, सरकार तसा जीआर काढत नाही, तोपर्यंत आमचं उपोषण सुरू राहणार अशी भूमिका मनोज जरांगे यांनी घेतली होती.
|
|
दरम्यान, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकाळी ११ वाजता जालन्यात जाऊन जरांगे यांची भेट घेतली. यावेळी राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यास तत्पर असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी जरांगे पाटील यांना दिलं. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतलं.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस घेऊन त्यांनी आपलं उपोषण सोडलं. यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांसोबत संवाद देखील साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात धाडसी निर्णय घेण्याची क्षमता आहे. त्यांनी आरक्षणात लक्ष घातले आहे, असे मनोज जरांगे म्हणाले.
मराठा समाजाला केवळ एकनाथ शिंदे हेच न्याय मिळवून देतील, असा मला विश्वास आहे. त्यांनी येथे येऊन ते सिद्ध केले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचं आश्वासन त्यांनी दिलंय. मी उपोषण सोडलं असलं, तरी आपलं आंदोलन शांततेत सुरू राहणार असं जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं.
समाजाला विचारुन मी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मी मराठा समाजाशी प्रामाणिक आहे. मराठा समाजाला केवळ एकनाथ शिंदे हेच न्याय मिळवून देतील असा मला विश्वास आहे, असंही जरांगे यांनी म्हटलं आहे.
शहर
- पुणे: पिंपरी-चिंचवडच्या मारुंजी परिसरात थरकाप उडवणारी घटना: चालकाला चालत्या गाडीतच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने भीषण अपघात, उपचारापूर्वीच मृत्यू
- पुणे: मुंढवा जॅकवेलचे ५ पंप सुरू; शेतीसाठी दररोज ४५ कोटी लिटर पाणी सोडण्यास सुरुवात, अखेर जलसंपदा विभागाला आली जाग
- पुणे: शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक वादाच्या भोवऱ्यात मतदानासाठी 'स्पायकॅम पेन' आणि पैसे वाटपाचे गंभीर आरोप, राजकीय वातावरण तापले
- नाशिक: शालार्थ आयडी घोटाळा उच्च न्यायालयाकडून अमोल कुलकर्णीचा अटकपूर्व जामीन फेटाळला, बनावट कागदपत्रांच्या आधारे कोट्यवधींची फसवणूक उघड
महाराष्ट्र
- पुणे: हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे उद्घाटन अनिश्चित काळासाठी स्थगित, पंतप्रधानांच्या दौऱ्यावरील अनिश्चितता ठरली कारण
- पुणे: पिंपरी-चिंचवडच्या मारुंजी परिसरात थरकाप उडवणारी घटना: चालकाला चालत्या गाडीतच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने भीषण अपघात, उपचारापूर्वीच मृत्यू
- पुणे: मुंढवा जॅकवेलचे ५ पंप सुरू; शेतीसाठी दररोज ४५ कोटी लिटर पाणी सोडण्यास सुरुवात, अखेर जलसंपदा विभागाला आली जाग
- पुणे: शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक वादाच्या भोवऱ्यात मतदानासाठी 'स्पायकॅम पेन' आणि पैसे वाटपाचे गंभीर आरोप, राजकीय वातावरण तापले
गुन्हा
- गडचिरोली: दारू तस्करीची भन्नाटक्कल उघड: दुचाकींच्या पेट्रोल टाकी अन् सीट कव्हरमध्ये लपवून नेली जात होती दारू, २.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: दिल्लीतील व्यापाऱ्यांचे राहुल गांधींना पत्र; रामलळा मैदानातील रॅली पुढे ढकलण्याची मागणी, १०,००० कोटी रुपयांच्या नुकसानीचा इशारा
- नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत एसआयआरविरोधातील आंदोलने अधिक तीव्र १४५ संघटनांचे एकत्र येऊन निवडणूक आयोगावर धडक मोर्चा, राकेश टिकैतही मैदानात
- गोवा: एआय धोरण २०२६ जाहीर तरुणांना प्रशिक्षण, स्टार्टअप्सला चालना आणि तंत्रज्ञान क्रांतीच्या दिशेने मोठी झेप!
- उत्तर प्रदेश: मनेागरणात डेंगूमुळे पतीचा मृत्यू, पाठोपाठ पत्नीनेही दम तोडला; एकाच चितेवर झाले अंत्यसंस्कार



























Subscribe to my channel




