
Mumbai : राज्यातील अनेक अंगणवाड्या भाड्याने घेतलेल्या खोल्यांमध्ये चालविल्या जात आहेत. अंगणवाड्यांना स्वमालकीच्या इमारती असण्याबरोबरच वीज, पाणी आदी पायाभूत सुविधा दिल्या पाहिजेत. याअनुषंगाने ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांच्या इमारतींमध्ये मोकळ्या असणाऱ्या वर्गखोल्या अंगणवाडीच्या बालकांसाठी वापरण्याबाबत धोरण तयार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
महिला व बाल विकास विभागाच्या विविध प्रश्नांसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात बैठक घेतली. या बैठकीस महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे,राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. अजित पवार यांनी सांगितले की, 'राज्यातील ग्रामीण भागात 94 हजार 886 तर नागरी भागात 15 हजार 600 अशा एकूण 1 लाख 10 हजार 48 अंगणवाड्या कार्यरत आहेत. त्यापैकी 21 हजार 969 अंगणवाड्या भाड्याच्या इमारतीत भरतात. तसेच इतर 9060 अंगणवाड्या समाज मंदिर, वाचनालयाच्या इमारतीत भरतात.'
'लहान मुलांना आनंददायी शिक्षण मिळण्यासाठी त्यांना पुरेशी जागा व इतर सुविधा मिळाल्या पाहिजेत. त्यामुळे ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांच्या इमारतींमध्ये मोकळ्या राहणाऱ्या वर्गखोल्या अंगणवाडीच्या मुलांसाठी वापरता येऊ शकतात. त्यादृष्टीने ग्रामविकास विभागामार्फत धोरण तयार करावे. तसेच शहरांमधील अंगणवाड्यांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत निधी देण्याबाबत उचित कार्यवाही करावी.', असे त्यांनी सांगितले.
|
Mumbai धक्कादायक प्रकार! ट्रेनच्या रनिंग रूममध्ये भरदिवसा दारु पार्टी; ३ टीटीई निलंबित |
राज्य महिला आयोग, राज्य बाल हक्क संरक्षण आयोग यांची कार्यालये सध्या वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. महिलांना आपल्या तक्रारी, निवेदने घेऊन येण्यास सोयीचे व्हावे, यासाठी सोयीच्या ठिकाणी कार्यालय उपलब्ध करून द्यावे. या दोन्ही आयोगांना प्रभावी काम करता यावे यासाठी मनुष्यबळ, स्वच्छतागृहे आदी बाबी देखील पुरविण्यात याव्यात. त्यासाठी लागणारा आवश्यक निधी त्यांना देण्यात येईल, असे देखील उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मुंबईतील मानखुर्द व बोर्ला तसेच पुण्यातील हडपसर आणि येरवडा याठिकाणी महिला व बाल विकास विभागाच्या मालकीच्या जमिनी आहेत. या जमिनींवर काही ठिकाणी अतिक्रमण झाले आहे. ही अतिक्रमणे हटवून त्यांचा वापर विभागाच्या आवश्यक बाबींसाठी करण्याबाबतचा आराखडा सादर करण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या.
शहर
- पुणे: भोंदू बाबाचे किळसवाणे कृत्य! दैवी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण; 'गुरुवर्य' स्वप्नील लांडेवर गुन्हा दाखल
- मुंबई: कंपन्या बंद झाल्याचा केवळ आभास, त्यातील ७६ टक्के कंपन्या.. शरद पवारांच्या दाव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आकडेवारीसह जोरदार प्रत्युत्तर
- पुणे: १ हजार ३१७ बेवारस वाहनांचा जाहीर लिलाव; वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई, वाहनमालकांना १५ दिवसांची मुदत
- मुंबई: मेट्रो-२बच्या कामादरम्यान क्रेन बिघडल्याने जुहू आणि अंधेरीत वाहतूक कोलमडली; दिवसभर वाहनचालक त्रस्त
महाराष्ट्र
- मुंबई: कंपन्या बंद झाल्याचा केवळ आभास, त्यातील ७६ टक्के कंपन्या.. शरद पवारांच्या दाव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आकडेवारीसह जोरदार प्रत्युत्तर
- पुणे: १ हजार ३१७ बेवारस वाहनांचा जाहीर लिलाव; वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई, वाहनमालकांना १५ दिवसांची मुदत
- मुंबई: मेट्रो-२बच्या कामादरम्यान क्रेन बिघडल्याने जुहू आणि अंधेरीत वाहतूक कोलमडली; दिवसभर वाहनचालक त्रस्त
- पुणे: अतिक्रमण करणाऱ्या ढोल पथकांना पाठीशी घालणार नाही; हलगर्जी किंवा नियमभंग झाल्यास कठोर नोटीस देणार - महापौर मंजुषा नागपुरे
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान मोदींचे देशाला आवाहन; फाळणीच्या वेदनांची आठवण करत 'विकसित भारत'चे लक्ष्य
- नवी दिल्ली: लोकशाही जिवंत ठेवण्याची आपली जबाबदारी आहे; कपिल सिब्बलांच्या युक्तिवादावर सरन्यायाधीशांचे महत्त्वपूर्ण निरीक्षण
- बांगलादेश: आता फक्त भारतच वाचवू शकतो का? रात्री ८ वाजताच दिवे बंद करण्याची वेळ का आली? नेमकं काय घडलं
- उत्तर प्रदेश: केस गळतीच्या गंभीर समस्येमुळे आणि उपचारांनंतरही फरक न पडल्याने १५ वर्षीय मुलीचे टोकाचे पाऊल; गळफास घेऊन संपवले जीवन!


























Subscribe to my channel



