
Hyundai Company Will Invest In Pune: महाराष्ट्रात ह्युंदाई कंपनीकडून 4 हजार कोटींची गुंतवणूक होणार असून पुण्यात पहिला प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या गुंतवणूकीतून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे. तसेच दक्षिण कोरीयातील लोट्टे ग्रुप, एलजी इलेक्ट्रॉनिक्स कंपनीसुद्धा राज्यात गुंतवणूक करणार आहे, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
मंत्री सामंत यांच्या मुक्तागिरी निवासस्थानी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री सामंत बोलत होते.
मंत्री सामंत म्हणाले, जनरल मोटर्स कंपनीच्या कामगारांचे प्रश्न सोडविण्यासंदर्भात ह्युंदाईच्या व्यवस्थापनासोबत सकारात्मक चर्चा झाली आहे. कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. द. कोरीयामधील आइस्क्रीम बनविणारी आघाडीची कंपनी लोट्टे उद्योगसमूह सुद्धा पुण्यात 475 कोटी रूपयांची गुंतवणूक करणार आहे. कंपनीच्या हॅवमोअर ब्रँडचे उत्पादन या प्रकल्पात होणार आहे. हा प्रकल्प अनेक वर्षापासून रखडला होता, द. कोरीयाच्या दौऱ्यातील बैठकीत यावर सकारत्मक चर्चा झाली.
|
|
मंत्री सामंत म्हणाले, पाण्याच्या फिल्टरमध्ये असलेल्या ॲल्युमिनीअम झाकणीचा प्रकल्पही राज्यात येणार आहे. त्यासाठी 5 एकर जागेची मागणी कंपनीकडून करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी पायाभूत सुविधा पुरविण्यात येतील. त्यामुळे या प्रकल्पास चालना मिळेल. तसेच इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील आघाडीच्या एल.जी कंपनीला महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याची विनंती करण्यात आली आहे. त्यानुसार कंपनीने पुण्यातील प्रकल्पाचा विस्तार करण्याचे सांगितले असून कंपनी जवळपास 900 कोटी रूपयांची गुंतवणूक करणार आहे. जे उत्पादन कोरीयात होते, असे उत्पादन भारतात येऊन करण्याची विनंतीही करण्यात आली आहे.
भारतात 4 डोअर फ्रीजचे उत्पादन, ट्रान्सफरन्ट दूरचित्रवाणी संच, फोल्डेबल टिव्हीचे सेमीकंडक्टरचे उत्पादन करण्याची विनंती सॅमसंग कंपनीला करण्यात आली आहे, तसेच डिसेंबर महिन्यात कॉस्मेटीक उद्योजकांचे मंडळ भारतात भेट देणार असून लॅकमे कंपनी राज्यात आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे. असे सांगून मंत्री सामंत म्हणाले द.कोरीया देशाचा दौरा यशस्वी झाला असून आघाडीच्या कंपन्यांसोबत बैठका घेण्यात आल्या आहेत. तेथील उद्योजकांना राज्यात गुंतवणूक करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यातील जे नागरीक द. कोरीयात आहेत, त्यांना राज्यात गुंतवणूक करायची असेल, तर अशा उद्योजकांना नवीन सवलती देण्यात येतील, राज्यात उद्योगासाठी पोषक वातावरण असून विदेशी गुंतवणूक राज्यात होत आहे.
शहर
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- गॅस सिलेंडर पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयची कमाई किती? एजन्सीला मिळणाऱ्या कमिशनचे संपूर्ण गणित!
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
महाराष्ट्र
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- नागपुरात आता कचरा फेकणाऱ्यांची खैर नाही! नाल्यांत आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर थेट FIR दाखल होणार.
- पुरोगामी कोल्हापूरला काळिमा! गुप्तधनाच्या लालसेपोटी अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा बाजार; भोंदूगिरीचे वाढते पेव.
गुन्हा
- सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
- मुंबई: कल्याण मध्ये १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या दोघांकडून अत्याचार; दोन नराधमांना अटक!
राजकीय
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!



























Subscribe to my channel

