
Samruddhi Highway Accident : ठाण्यातील शहापूर तालुक्यातील समृद्धी महामार्गावर सोमवारी रात्रीच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली. समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचं काम सुरू असताना अचानक पुलावरून गर्डर मशीनला जोडणारी क्रेन कोसळली. या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेबाबत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त करत मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, 'महाराष्ट्रातील शहापूर येथे झालेल्या भीषण दुर्घटनेनं दु:ख झालं. मृतांच्या कुटुंबीयांसोबत माझ्या सहवेदना आहेत. तर जखमींनी लवकरात लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो. एनडीआरफ आणि स्थानिक प्रशासनाकडून अपघाताच्या ठिकाणी बचावकार्य सुरु आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, 'महाराष्ट्रातील शहापूर येथे झालेल्या भीषण दुर्घटनेनं दु:ख झालं. मृतांच्या कुटुंबीयांसोबत माझ्या सहवेदना आहेत. तर जखमींनी लवकरात लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो. एनडीआरफ आणि स्थानिक प्रशासनाकडून अपघाताच्या ठिकाणी बचावकार्य सुरु आहे.'
या ट्विटमध्ये पीएम मोदींनी पुढे असे देखील सांगितले आहे की,'मृतांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान मदत निधीतून २ लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. तर, जखमींना ५० हजार रुपये देण्यात येतील.' दरम्यान, या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
|
|
मिळालेल्या माहितीनुसार,शहापूरनजीक समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात १७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये १० कामगार, २ अभियंते आणि ५ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्या दोघांवर ज्युपिटर रुग्णालय तर एकावर शहापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुर्घटनेच्या ठिकाणी ढिगाऱ्याखाली आणखी ३ कर्मचारी दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
शहापूर तालुक्यातील सरलांबे पुलावर सोमवारी रात्रीच्या सुमारास ही मोठी दुर्घटना घडली. गर्डर मशीनला जोडणारी क्रेन आणि स्लॅब तब्बल १०० फूटांवरून खाली काम करत असलेल्या मजुरांच्या अंगावर कोसळला. या दुर्घटनेच्या ठिकाणी एकूण १७ कामगार आणि ९ इंजिनिअर काम करत होते.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक कामगार, पोलीस कर्मचारी, अग्निशन दल आणि एनडीआरफच्या पथकाकडून बचाव कार्य युद्धपातळीवर सुरु करण्यात आले. आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे. या दुर्घटने मृत्यू झालेले बरेच मजूर हे उत्तर प्रदेश आणि बिहारमधील होते.
शहर
- पनवेल: लग्नाच्या तगाद्यातून प्रेयसीची हत्या करून मृतदेह जाळला; दोन महिन्यांनी प्रियकर अटकेत.
- नवी मुंबई: धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न; हिंदू देव-देवतांचा अपमान केल्याप्रकरणी नर्सवर नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!
- मुंबई: मृणालताई गोरे उड्डाणपूल विस्तारीकरण वादाच्या भोवऱ्यात; निकृष्ट दर्जाच्या पृष्ठभागावरून मुंबईकरांचा संताप!
- पुणे: सचिन गायवळ फरारी असतानाही 'फेस टाइम ॲप'द्वारे भावाशी संपर्क; गुन्हे शाखेने जप्त केले ४ मोबाईल आणि लॅपटॉप.प्रकरणाचा
महाराष्ट्र
- अहिल्यानगर (पारनेर ): देविभोयरे ग्रामपंचायत निवडणुकीचे रणशिंग फुंकले; चार वार्डातील 11 जागांसाठी चुरशीची लढत अनुसूचित जाती महिला आरक्षणामुळे राजकीय समीकरण बदलणार
- लग्नापूर्वीचे शारीरिक संबंध म्हणजे चारित्र्यावर डाग नव्हे; सर्वोच्च न्यायालयाची अत्यंत महत्त्वपूर्ण टिप्पणी!
- पनवेल: लग्नाच्या तगाद्यातून प्रेयसीची हत्या करून मृतदेह जाळला; दोन महिन्यांनी प्रियकर अटकेत.
- नवी मुंबई: धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न; हिंदू देव-देवतांचा अपमान केल्याप्रकरणी नर्सवर नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!
गुन्हा
- नवी मुंबई: धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न; हिंदू देव-देवतांचा अपमान केल्याप्रकरणी नर्सवर नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!
- पुणे: सचिन गायवळ फरारी असतानाही 'फेस टाइम ॲप'द्वारे भावाशी संपर्क; गुन्हे शाखेने जप्त केले ४ मोबाईल आणि लॅपटॉप.प्रकरणाचा
- गडचिरोली: माणुसकीला काळीमा! नवीन घराच्या गच्चीवर ७ वर्षांच्या चिमुरडीचा विनयभंग; नराधम पेंटरला बेड्या
- पुणे: बंडू आंदेकर टोळीतील सराईत गुंडाला बेड्या; आठ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा ओम नगरकर गजाआड
राजकीय
- कर्नाटकच्या राजकारणात मोठा भूकंप! डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री होताच पक्षात बंडाळी; असंतुष्ट नेते दिल्लीला रवाना
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
इतर
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- लग्नापूर्वीचे शारीरिक संबंध म्हणजे चारित्र्यावर डाग नव्हे; सर्वोच्च न्यायालयाची अत्यंत महत्त्वपूर्ण टिप्पणी!
- काश्मीर: जोजिला बोगद्याचा ऐतिहासिक टप्पा गाठला! काश्मीर ते लडाख आता वर्षभर राहणार जोडलेले; 'ब्रेकथ्रू' पूर्ण.
- पीएम किसान २३ वा हप्ता: शेतकऱ्यांच्या खात्यात २,००० रुपये कधी जमा होणार?
- "भारताच्या अण्वस्त्र धोरणात ऐतिहासिक बदल; एकूण अण्वस्त्रांची संख्या १९० वर, शेजाऱ्यांना धडकी!"
























Subscribe to my channel



