
बेळगाव : पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर कमी झाल्याचे कारण देत आलमट्टी धरणातील विसर्ग कमी करण्यात आला आहे. शुक्रवारी (ता. २८) दुपारी तीनपासून धरणातून विसर्ग १ लाख २५ हजार क्युसेक करण्यात आला आहे.
कर्नाटक राज्य पाटबंधारे खात्याकडून ही माहिती देण्यात आली आहे. गुरुवारी (ता. २७) धरणातील पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला होता. सकाळी सहा वाजता जलाशयातून १ लाख २५ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. दुपारी बारा वाजता विसर्ग १ लाख ५० हजार क्युसेक झाला. तर, सायंकाळी सहा वाजता विसर्ग तब्बल १ लाख ७५ हजार क्युसेक इतका केला होता; पण गुरुवारी सायंकाळपासून आलमट्टी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर कमी झाल्याचे पाटबंधारे खात्याचे म्हणने आहे. त्यामुळेच धरणातील पाण्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे विसर्ग कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
पाटबंधारे खात्याने धरणाची क्षमता १२३.०१ टीएमसी इतकी आहे. शुक्रवारी सकाळी आठ वाजता धरणातील पाणीसाठा ८८.५०३ टीएमसी इतका होता. म्हणजे धरण ७१.०९ टक्के इतके भरले आहे. धरणात येणाऱ्या पाण्याची आवक दीड लाख क्युसेकपर्यंत झाल्यानंतर विसर्ग कमी करण्याचा निर्णय घेतला.
पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढल्यानंतर आलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्याची मागणी होत होती. धरणातील पाण्याची आवक व विसर्ग यासंदर्भात माहिती घेण्यासाठी महाराष्ट्राच्या पाटबंधारे खात्याकडून वरिष्ठ अधिकारी आलमट्टीत नियुक्त केले आहेत. त्यांच्याकडून याबाबतची माहिती वारंवार महाराष्ट्र शासनाला दिली जात आहे.
दोन्ही राज्यांच्या पाटबंधारे खात्याने गतवर्षीपासून समन्वय ठेवल्याने आलमट्टी धरणातील पाण्याचा विसर्ग नियमितपणे केला जात आहे. बेळगाव जिल्ह्यातील हिडकल धरणाची पाण्याची पातळीही वाढली आहे. हिडकल धरणाची क्षमता ५१ टीएमसी आहे.
शुक्रवारी (ता. २८) धरणातील एकूण पाणीसाठा ३१.६५८ टीएमसी तर जिवंत पाणीसाठा २९.६३८ टीएमसी इतका होता. पण गतवर्षीच्या तुलनेत यंदा हिडकलमधील पाणीसाठा कमी आहे. गतवर्षी २८ जुलै रोजी हिडकल धरणातील एकूण पाणीसाठा ३६.८२६ टीएमसी होता तर जिवंत पाणीसाठा ३४.८०६ टीएमसी इतका होता.
|
|
हिडकलमधून विसर्ग नाही’
गतवर्षीच्या तुलनेत यंदा हिडकलमधील पाण्याची आवक मात्र जास्त आहे. गतवर्षी २८ जुलैला धरणातील पाण्याची आवक ४,७१२ क्युसेक्स होती. यंदा मात्र तब्बल २९ हजार ४१५ क्युसेक्स आवक आहे. हिडकल अद्याप पूर्ण क्षमतेने भरलेले नाही. त्यामुळे धरणातून अद्याप विसर्ग सुरू झालेला नाही.
शहर
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- गॅस सिलेंडर पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयची कमाई किती? एजन्सीला मिळणाऱ्या कमिशनचे संपूर्ण गणित!
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
महाराष्ट्र
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- नागपुरात आता कचरा फेकणाऱ्यांची खैर नाही! नाल्यांत आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर थेट FIR दाखल होणार.
- पुरोगामी कोल्हापूरला काळिमा! गुप्तधनाच्या लालसेपोटी अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा बाजार; भोंदूगिरीचे वाढते पेव.
गुन्हा
- सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
- मुंबई: कल्याण मध्ये १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या दोघांकडून अत्याचार; दोन नराधमांना अटक!
राजकीय
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!



























Subscribe to my channel

