
मुंबई: पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे उद्भवलेल्या संभाव्य गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने मोठी पावले उचलली आहेत. राज्यातील घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचा पुरवठा विस्कळीत होऊ नये, यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. सिलिंडरची वाहतूक करणाऱ्या वाहनांना पोलीस संरक्षण देण्यासोबतच, जिल्हा स्तरावर 'कंट्रोल रुम' स्थापन करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती
अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर यांनी गुरुवारी यासंदर्भात अधिकृत पत्रक जारी केले. यानुसार, प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समन्वय समिती स्थापन केली जाईल. या समितीत जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा पुरवठा अधिकारी आणि सरकारी तेल कंपन्यांचे प्रतिनिधी यांचा समावेश असेल.
राज्य सरकारचे महत्त्वाचे निर्देश:
पोलीस सुरक्षा: गॅस सिलिंडरची वाहतूक करणाऱ्या वाहनांना आणि गॅस एजन्सींना आवश्यकतेनुसार पोलीस संरक्षण पुरवण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनाकडे सोपवण्यात आली आहे.
कंट्रोल रुमची स्थापना: राज्य, विभाग, जिल्हा आणि तालुका स्तरावर चोवीस तास नियंत्रण कक्ष (Control Rooms) कार्यान्वित करण्याचे आदेश दिले आहेत. तक्रार निवारणासाठी 'व्हॉट्सॲप' सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे.
अत्यावश्यक सेवांना प्राधान्य: रुग्णालये, शासकीय वसतिगृहे, शाळा-महाविद्यालयांचे मेस, माध्यान्ह भोजन योजना आणि आश्रमशाळांना गॅस पुरवठ्यात प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
तांत्रिक बिघाड दुरुस्त करा: तेल कंपन्यांना त्यांच्या गॅस बुकिंग ॲप्स आणि 'मिस्ड कॉल' सेवांमधील तांत्रिक बिघाड त्वरित दुरुस्त करण्यास सांगितले आहे, जेणेकरून नागरिकांना बुकिंगमध्ये त्रास होणार नाही.
'अफवांवर विश्वास ठेवू नका'
राज्य सरकारने स्पष्ट केले आहे की, सध्या महाराष्ट्रात घरगुती गॅसचा कोणताही तुटवडा नाही. मार्च महिन्यातील गॅस उपलब्धता मागील सहा महिन्यांच्या सरासरीपेक्षा जास्त आहे. सोशल मीडियावर पसरणाऱ्या अफवा रोखण्यासाठी आकाशवाणी, एफएम चॅनेल आणि स्थानिक माध्यमांद्वारे दररोज माहिती प्रसारित करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. चुकीची माहिती पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही सरकारने दिला आहे.
पर्यायी इंधनाचा विचार
हॉटेल आणि रेस्टॉरंट्सना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचे पालन करून कोळसा किंवा केरोसीन यांसारख्या पर्यायी इंधनाचा वापर करण्याबाबत जिल्हा समित्यांनी संघटनांशी चर्चा करावी, असेही सूचित करण्यात आले आहे.
शहर
- पुणे: अहिल्यानगर महामार्गावर मध्यरात्री भीषण अपघात! दुभाजक ओलांडून कार पलटी आणि ट्रकला धडक; वाघोलीतील ३ तरुणांचा मृत्यू, २ जखमी!
- पुणे: पाईट–शिरोली मार्गावर हायवाची स्कूटरला भीषण धडक; दिंडी मंडळाचे अध्यक्ष पोपट रौंधळ यांचा जागीच मृत्यू!
- पुणे: 'एफडीए'चे २ दिवसांत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ९६ ठिकाणी छापे; १२ परवाने निलंबित, ५ आस्थापने बंद करण्याचे आदेश
- पुणे: महापालिकेचा सुट्टीच्या दिवशीही अतिक्रमणावर हातोडा; पुन्हा अतिक्रमण केल्यास दुकाने सील करण्याचा आयुक्तांचा इशारा!
महाराष्ट्र
- पुणे: अहिल्यानगर महामार्गावर मध्यरात्री भीषण अपघात! दुभाजक ओलांडून कार पलटी आणि ट्रकला धडक; वाघोलीतील ३ तरुणांचा मृत्यू, २ जखमी!
- पुणे: पाईट–शिरोली मार्गावर हायवाची स्कूटरला भीषण धडक; दिंडी मंडळाचे अध्यक्ष पोपट रौंधळ यांचा जागीच मृत्यू!
- कोल्हापूर: महायुतीची १२५ महामंडळे केवळ घोषणांसाठी; सतेज पाटलांचा हल्लाबोल, करवीर आणि कागल तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी!
- रत्नागिरी: गुहागरात शृंगारतळी-आबलोली रस्त्याकडेला आढळले बिबट्याचे मादी पिल्लू; वनविभागाच्या पथकाने केले सुरक्षित रेस्क्यू!
गुन्हा
- यवतमाळ: घाटंजी येथे ग्रामपंचायत अधिकाऱ्याचे टोकाचे पाऊल; भाड्याने राहत असलेल्या खोलीत घेतला गळफास, परिसरात खळबळ
- छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावर सावंगी जवळ भीषण अपघात: चालकाला डुलकी लागल्याने ट्रॅव्हल्स उलटली; दोघांचा मृत्यू, ३० प्रवासी जखमी!
- नाशिक: १८ वर्षीय विद्यार्थ्याची मित्रांनीच दगड आणि धारदार शस्त्राने वार करून केली निर्घृण हत्या; चौघे संशयित ताब्यात
- अमरावती: बाळ विक्री प्रकरणाचे धागेदोरे अकोल्यापर्यंत! चौथे बालक सुखरूप ताब्यात, दाम्पत्याला अटक; तपासातून धक्कादायक खुलासे
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- कोलकाता: 'पश्चिम बंगाल'चे नाव बदलून 'पश्चिम बंग' करण्याची तयारी; मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची मोठी घोषणा, विधानसभेत प्रस्ताव मांडणार!
- नवी दिल्ली: बालेन शाह १८ हजार कोटी मागायला आलेले, भारताने दिले २४ हजार कोटींचे पॅकेज; मोदींच्या भेटीनंतर ऐतिहासिक घोषणा आणि 'सरयू-कमल एक्सप्रेस'ला हिरवा झेंडा!
- उत्तर प्रदेश: बुलंदशहरमध्ये धक्कादायक घटना! घरापासून ४० मीटर अंतरावरील बंद खोलीत चिमुकलीचा मृतदेह; जादूटोण्याच्या संशयाने खळबळ, संशयित महिला ताब्यात
- गोवा: पुढील वर्षापासून गोव्यात दुसरे मेडिकल कॉलेज, आयटीआयच्या दर्जावाढीसाठी २५० कोटींची तरतूद आणि मुख्यमंत्री चषक मॅरेथॉनचा शुभारंभ!




























Subscribe to my channel



