Maharashtra Politics : आजच होणार नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी! राजभवनात जोरदार तयारी सुरू;

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीमध्येही मोठी फूट पडल्याचं म्हटलं जात आहे. राष्ट्रवादी आमदारांचा एक मोठा गट अजित पवारांसह भाजप सरकारमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. यासाठी राष्ट्रवादीचे हे आमदार राजभवनात दाखल झाले आहेत. या नव्या आमदारांचा शपथविधी आजच होण्याची शक्यता आहे. यासाठी राजभवनात जय्यत तयारी सुरू आहे.या ठिकाणी राष्ट्रवादीमधील मोठे नेते उपस्थित आहेत.

धनंजय मुंडे, प्रफुल पटेल, छगन भुजबळ असे राष्ट्रवादीचे कित्येक बडे चेहरे या फोटोंमधून दिसत आहेत. राजभवनात नवीन आमदारांचा शपथविधी होतानाच, अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील अशा चर्चा सुरू आहेत. यामुळे फडणवीस मुख्यमंत्री होतील, की त्यांना केवळ गृहमंत्रीपदावर समाधान मानावं लागेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *