पालघर: पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी यंदा ६० दिवसांवरून ७५ दिवस करण्याचा शासनाने निर्णय घेतला असतानाच, मत्स्यव्यवसाय तथा बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी १ ऑगस्टपासून १२ नॉटिकल मैलांपुढील समुद्री हद्दीत मासेमारीस परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे राज्यातील पारंपरिक मच्छिमारांमध्ये तीव्र संताप उसळला असून, महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीने यावर तीव्र आक्षेप घेतला आहे.
महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीच्या म्हणण्यानुसार, मासेमारी बंदीचा कालावधी ७५ दिवस करण्याबाबत शास्त्रज्ञ, सरकार आणि मच्छिमार समाजामध्ये एकमत झाले होते आणि त्यानुसार शासनाने आदेशही जारी केला होता. मात्र, बंदीचा कालावधी संपण्यापूर्वीच १२ नॉटिकल मैलांपुढील समुद्री क्षेत्रात मासेमारीस मुभा देण्याची घोषणा करण्यात आली. या निर्णयामुळे पारंपरिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या मच्छिमार बांधवांना नव्या हंगामासाठी कोणतीही पूर्वतयारी करता आली नाही, असा दावा समितीने केला आहे.
या निर्णयामुळे राज्यातील सुमारे आठ हजार पारंपरिक मच्छिमार नौका १ ऑगस्टपासून सुरू झालेल्या हंगामाचा लाभ घेऊ शकणार नाहीत, असा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. 'या निर्णयाचा फायदा केवळ एलईडी पर्ससीन, हायस्पीड ट्रॉलर आदी मोठ्या भांडवली नौकांना होणार असून, यामुळे पारंपरिक मच्छिमार पूर्णपणे उद्ध्वस्त होत आहेत आणि त्यांच्यावर मोठा अन्याय झाला आहे,' असे महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीने म्हटले आहे.
या संपूर्ण प्रकारामुळे आक्रमक झालेल्या मच्छिमार नेत्यांनी या प्रकरणात मुख्यमंत्री व राज्य शासनाने तातडीने हस्तक्षेप करावा आणि मंत्री नितेश राणे यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करावे, अशी आक्रमक मागणी केली आहे. महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष लिओ कोलासो, कार्याध्यक्ष रामकृष्ण तांडेल आणि सरचिटणीस किरण कोळी यांनी एका विशेष पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री नितेश राणे यांच्या या भूमिकेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. पारंपारिक मासेमारी आणि शाश्वत मासेमारीच्या (Sustainable Fishing) तत्त्वाला हा निर्णयबाधक ठरत असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला आहे.
शहर
- नारायणगावमध्ये कोट्यवधींची सायबर फसवणूक! फेक ट्रेडिंग ॲप्सद्वारे व्यापाऱ्याची १ कोटी ९३ लाखांची लूट, ५७ जणांवर गंभीर गुन्हे दाखल
- पुणे: ६ वर्षांनंतर अखेर न्याय मिळाला; पुण्याच्या बुधवार पेठेत २२ वर्षीय प्रेयसीच्या खून प्रकरणात नराधम प्रियकराला जन्मठेपेची शिक्षा
- अमरावती: बंद कारमध्ये मिळून आला प्रॉपर्टी ब्रोकर्सचा मृतदेह; गेल्या तीन दिवसांपासून होते बेपत्ता
- प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मोठा निर्णय! कल्याण-मुरबाड मार्गावर एसटी बसच्या फेऱ्या ४८ वरून थेट १०८ वर; मंत्री प्रताप सरनाईक यांच्या आदेशामुळे प्रवाशांना मोठा दिलासा"
महाराष्ट्र
- मुंबई:दिशा सालियन मृत्यू प्रकरण: संशय व्यक्त केला तरी पोलिसांनी एफआयआर का नोंदवला नाही? हायकोर्टाचे पोलिसांना खडे बोल
- नारायणगावमध्ये कोट्यवधींची सायबर फसवणूक! फेक ट्रेडिंग ॲप्सद्वारे व्यापाऱ्याची १ कोटी ९३ लाखांची लूट, ५७ जणांवर गंभीर गुन्हे दाखल
- पुणे: ६ वर्षांनंतर अखेर न्याय मिळाला; पुण्याच्या बुधवार पेठेत २२ वर्षीय प्रेयसीच्या खून प्रकरणात नराधम प्रियकराला जन्मठेपेची शिक्षा
- अमरावती: बंद कारमध्ये मिळून आला प्रॉपर्टी ब्रोकर्सचा मृतदेह; गेल्या तीन दिवसांपासून होते बेपत्ता
गुन्हा
- पुणे: ६ वर्षांनंतर अखेर न्याय मिळाला; पुण्याच्या बुधवार पेठेत २२ वर्षीय प्रेयसीच्या खून प्रकरणात नराधम प्रियकराला जन्मठेपेची शिक्षा
- चंद्रपूर: प्रेमाच्या लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यांतच संपला तरुणीचा संसार; चंद्रपूरमधील दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ
- जालना: अंबड येथे सतर्क नागरिकांमुळे टळला अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न; पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू
- १५ हजारांच्या कर्मचाऱ्याला फ्लॅट आणि पैशांचे आमिष; महाराष्ट्र टीईटी पेपर लीक प्रकरणातील सर्वात मोठा खुलासा समोर
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली
























Subscribe to my channel




