
BMC Covid Scam Update : मुंबई महापालिकेच्या कथित कोविड सेंटर घोटाळा प्रकरणाची व्याप्ती दिवसागणिक वाढत आहे. २०० हून अधिक डॉक्टरांच्या नावाचा वापर करून पालिकेकडून कोट्यवधी रुपये लाटल्याचे तपासात उघड झाले आहे, अशी माहिती ईडीच्या सूत्रांनी दिली.
मुंबई महापालिकेच्या जम्बो कोविड सेंटर घोटाळा प्रकरणात ईडीचा तपास सुरू आहे. ईडीने मुंबईत अनेक ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी यात असल्याचे झाडाझडतीत समोर आले आहे. या कथित घोटाळ्याची व्याप्ती वाढत असून, तपासात अनेक धक्कादायक बाबी उघड होत आहेत.
ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २०० हून अधिक डॉक्टरांच्या नावाचा वापर करून पालिकेकडून कोट्यवधी रुपये लाटल्याचे उघड झाले आहे. कंत्राटी डॉक्टरांच्या नावांच्या बोगस नोंदी केल्या असून, त्यांच्या नावे कोट्यवधी रुपये लाटले आहेत.
बहुतांश डॉक्टरांनी काही दिवस, तर काहींनी काही आठवडे या कोविड सेंटरमध्ये सेवा दिली होती. मात्र त्यांनी कित्येक महिने सेवा दिल्याच्या खोट्या नोंदी करून त्यांच्या नावाने कोट्यवधी रुपये उकळल्याची माहितीही समोर आली आहे. ईडीने ई-मेलद्वारे संबंधित डॉक्टरांशी संपर्क साधला असून, या प्रकरणात डॉक्टरांना ईडी साक्षीदार करणार असल्याचेही कळते.
लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसच्या भागीदारांना ED चे समन्स
मुंबई महापालिकेतील कथित कोविड सेंटर घोटाळा प्रकरणात ईडीने लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसच्या भागीदारांना समन्स बजावले आहे. २६ ते २८ जून या काळात ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे. भागीदार डॉ. हेमंत रामशरण गुप्ता, सुजित मुकुंद पाटकर, संजय मदनलाल शहा आणि राजू नंदकुमार साळुंखे यांना हे समन्स बजावले आहे. तसेच या प्रकरणात मुंबई महापालिकेच्या ९ अधिकाऱ्यांचेही जबाब नोंदवण्यात येणार आहे.
संजीव जयस्वाल यांनी मागितला ४ दिवसांचा वेळ
मुंबईतील कथित कोविड केअर सेंटर घोटाळा प्रकरणात आयएएस अधिकारी संजीव जयस्वाल यांचे नाव देखील आले आहे. जयस्वाल यांच्या घरावरही छापेमारी केली होती. आता जयस्वाल यांनी ईडीकडे चार दिवसांचा वेळ मागितला आहे. या प्रकरणात चौकशीसाठी ईडीने काल, गुरुवारी जयस्वाल यांना समन्स बजावले होते.
जयस्वाल हे काल ईडीसमोर हजर झाले नाहीत. ईडीच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी हजर राहण्यासाठी ४ दिवसांचा वेळ मागितला आहे. ईडी लवकरच त्यांना दुसरे समन्स पाठवून चौकशीसाठी बोलावणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


