Dhanodi Bahaddarpur Fire : धानोडी बहाद्दरपुरात भीषण आग, सिंचनाचे काेट्यावधीचे साहित्य जळाले

Wardha  : वर्धा जिल्ह्यातील धानोडी बहाद्दरपुर येथे भीषण आग लागली आहे. धानोडी येथील निम्न वर्धा प्रकल्पतून उपसा सिंचनाचे काम सुरु आहे. त्या घटनास्थळी आग लागल्याने काेट्यावधींचे साहित्य जळून खाक झाले आहे.

विदर्भ पाटबंधारे विभागामार्फत हे काम सुरु आहे. आर्वी तालुक्यातील शेतकऱ्यांना ड्रीप लाऊन मोफत सिंचनाची सुविधा उपलब्ध करुन दिली जात आहे. जैन एरिगेशनने कामासाठी मोठ्या प्रमाणात साहित्य ठेवले हाेते.

घटनास्थळी शॉट सर्किटनेआग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या आगीत मोठ्या प्रमाणात ड्रीप, पाईप, स्प्रिंकलर जळून खाक झाले आहे.आगीचे आकाशात मोठ्या प्रमाणात लोळ दिसत आहे. घटनास्थळी अग्निशमक दल दाखल झाले असून आग विजविण्याचे प्रयत्न सुरु आहेत.या आगीत काेट्यावधीचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *