
पुणे - पावसाने दिलेली ओढ अन् उन्हामुळे जिवाची काहिली होत असतानाही, विठुमाऊलीच्या भेटीच्या ओढीने निघालेल्या लाखो वैष्णवजणांचा मेळा संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीबरोबर सोमवारी पुण्यभूमीत दाखल झाला. कित्येक तास रस्त्यावर उभे राहून त्या एका क्षणाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या लाखो पुणेकरांनी त्रिवेणी संगमाची ‘याची देही याची डोळा’ अनुभूती घेत हा क्षण हृदयात साठविला. प्रथेप्रमाणे पुणेकरांनी पालख्यांचे मोठ्या आनंदोत्सवात स्वागत तर केलेच, शिवाय आपल्या दारी आलेल्या वारकऱ्यांच्या पाहूणचाराला तितक्याच आनंदाने सुरुवात केली.
संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी पुणेकरांकडून दरवर्षी मोठी जय्यत तयारी केली जाते. रांगोळ्यांच्या पायघड्यांपासून कमालीची स्वच्छता, वारकऱ्यांना मुक्कामासाठीची व्यवस्था, खाण्या-पिण्यासाठी नानाविध जिन्नसपासून ते त्यांचे ऊन, वारा, पावसापासून संरक्षण करण्यासाठी छत्री, रेनकोट यांसारख्या किती तरी वस्तु देण्यासाठीची ही तयारी होती. आळंदीहून प्रस्थान ठेवल्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी सोमवारी दुपारी १२ वाजून २० मिनीटांनी पुणे शहरात आळंदी रस्त्यावरील कळस येथे दाखल झाली.
तर संत तुकाराम महाराज पालखी नेहमीप्रमाणे दुपारी एक वाजून १५ मिनिटांनी बोपोडी येथे दाखल झाली. पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी दोन्ही पालखी सोहळ्याचे सन्मानपूर्वक स्वागत केले. विक्रम कुमार यांनी वारकऱ्यांना श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. यावेळी पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक यांच्यासह अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, रवींद्र बिनवडे, उपायुक्त माधव जगताप, संतोष वारुळे, किशोरी वारुळे आदी उपस्थित होते.
भगवा ध्वज हाती घेऊन दिंड्यांपुढे चालणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या सानिध्यात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दुपारी फुलेनगर येथे भोजनासाठी थांबला. त्यानंतर दुपारी एक वाजता संगमवाडी येथे विसावा घेतल्यानंतर पालखीने पुढे प्रस्थान ठेवले. त्याचवेळी संत तुकाराम महाराज पालखीचे कासारवाडी येथे दुपारचे जेवण झाले. त्यानंतर वाकडेवाडीत दुपारी साडेचार वाजता पालखी विसाव्यासाठी थांबली.
सायंकाळी सहा वाजता तुकाराम महाराज पालखीचे शिवाजीनगर येथे आगमन झाले. त्यापाठोपाठ संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळाही तेथे दाखल झाला. यावेळी पुणेकरांनी शिवाजीनगर येथे मोठ्या संख्येने गर्दी केली होती. लाखो भाविकांनी पालखीचे दर्शन घेण्यासाठी अक्षरशः गर्दी केली होती. लहान मुले, वृद्ध, महिला पालखीतील पादुकांवर डोके ठेवून आशीर्वाद घेत होते. दोन्ही पालख्यांचे जंगली महाराज रस्त्यावर आगमन झाले.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी व संत तुकाराम महाराज पालखी पादुका चौकात आल्यानंतर प्रथेप्रमाणे पालखी थांबवून आरती करण्यात आली. त्यानंतर भाविकांच्या भक्तीसागरात पालख्यांनी पुढे प्रस्थान ठेवले. जंगली महाराज रस्ता, खंडुजीबाबा चौक, लक्ष्मी रस्त्याने संत तुकाराम महाराज पालखी नाना पेठेतील निवडुंगा विठ्ठल मंदिरात आली. त्यापाठोपाठ संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरामध्ये आली. दोन्ही पालख्यांचे मंदिरात आगमन झाल्यानंतर लाखो भाविकांच्या उपस्थितीत समाजआरती झाली. त्यानंतर हा पालखी सोहळा दोन दिवसांच्या मुक्कामासाठी पुण्यात विसावला.
शहर
- पुणे: कात्रज चौकात जड वाहनांना बंदी! पुणे मेट्रोच्या कामामुळे वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग!
- पुणे: फटाके केवळ वाजवण्यावरच नाही, तर उत्पादन अन् विक्रीवरही पूर्ण बंदी घाला!; विद्यानंद बापट यांची सर्वोच्च न्यायालयाकडे मोठी मागणी!
- पुणे: आमदार सुनील शेळकेंवर पाळत? पुण्यात एकाला ताब्यात घेतलं; २ मोबाईल अन् मोठ्या रोकडमुळे प्रकरणाला नवं वळण!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
महाराष्ट्र
- सोलापुर: भाजपचा शिंदे सेनेला मोठा धक्का! मंगळवेढा नगरपालिकेतील ५ नगरसेवकांसह २०० पदाधिकाऱ्यांचा कमळ हातात घेत भाजपमध्ये प्रवेश!
- कोल्हापुर: ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस! श्री अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांची उडाली प्रचंड तारांबळ!
- कोल्हापूर: 'समान काम, समान वेतन'च्या मागणीसाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा एल्गार! कोल्हापुरातील ९०० हून अधिक कर्मचारी आंदोलनात सहभागी, ५ नोव्हेंबरला सामूहिक रजेचा इशारा!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- राजस्थान: दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; खाटूश्यामजीच्या दर्शनाला जाणारी बस १५ फूट खोल नाल्यात कोसळून ८ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी!
- उत्तर प्रदेश: ग्रेटर नोएडामध्ये थरारक घटना! चहा आणि मॅगी खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील ५ जणांचा संशयास्पद मृत्यू; आई-वडील अन् ३ चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत!
- नवी दिल्ली: श्रेयासाठी आला असाल तर चुकीच्या पक्षात आहात ; नेहा बोरा यांच्यावरून रंगलेल्या वादावर राहुल गांधींनी सुनावले!
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!



























Subscribe to my channel




