
Amravati-Chikhali National Highway : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात 816 कोटी रुपये खर्चाच्या अमरावती-चिखली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 च्या शेलाड ते नांदुरा या टप्प्याचे उद्घाटन केले.
राष्ट्रीय महामार्ग 53 हा गुजरात (Gujarat), महाराष्ट्र, छत्तीसगड आणि ओडिशा तसेच देशातील इतर राज्यांमधील महत्त्वाचा व्यापारी दुवा म्हणून महत्त्वपूर्ण आहे. तसेच, हा महामार्ग महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे , जळगाव , (खामगाव) बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूरआणि भंडारा जिल्ह्यांना जोडणारा महामार्ग आहे. हा महामार्ग रायपूर-नागपूर-सुरत किंवा पूर्व-पश्चिम कॉरिडॉरसाठी चांगली संपर्क सुविधा असल्यानेही महत्त्वाचा ठरतो.
या शेलाड - नांदुरा विभागाच्या चतुर्भूज प्रकल्पाची एकूण लांबी 45 किमी असून यामध्ये 14 किमी ग्रीनफिल्ड बायपास, 4 मोठे पूल, 16 छोटे पूल, 63 कल्व्हर्ट, 1 रोड ओव्हर ब्रीज, 8 वाहन भुयारी मार्ग, 2 पादचारी भुयारी मार्ग, 12 बस थांबे यांचा समावेश आहे. बुलढाणा जिल्ह्यातील उपविभाग असलेल्या आणि सिल्व्हर सिटी अशी ओळख असलेल्या खामगावच्या प्रसिद्ध चांदीच्या बाजारपेठेसाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरणार आहे.
या प्रकल्पामुळे खामगाव शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटला असून अपघातांचे प्रमाणही कमी होण्यासही याची मदत होणार आहे. वाहन अंडरपास आणि रोड ओव्हर ब्रीज प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करतील. या प्रकल्पामुळे शेगाव, लोणार किंवा इतर धार्मिक आणि भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणी पोहोचणे सुलभ होणार आहे. या प्रकल्पामुळे पर्यटन, आरोग्य, शिक्षण आणि रोजगार निर्मितीचा विकास होईल.
केंद्र सरकारच्या अमृत सरोवर योजनेत, महामार्ग प्रकल्पांतर्गत तलाव खुले करून "जलकुंभ बांधण्यात आल्याने खामगावसारख्या उष्ण आणि कोरड्या भागातील पाण्याची समस्या दूर होण्यास मदत झाली आहे.
मलकापूर - बुलढाणा - चिखली या 1,200 कोटी रुपये खर्चाच्या तर बाळापूर - शेगाव या 22 किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी 350 कोटी रुपये खर्चाची योजना जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय चिखली ते ठाकरखेड यासह इतर रस्त्यांच्या 25 कोटी रुपयांच्या कामांनाही मंजुरी देण्यात आली आहे.
शहर
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
महाराष्ट्र
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल

























Subscribe to my channel



