
Air Pollution : अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात हवा प्रदूषणाची समस्या अगदी गंभीर झाली आहे. बुधवारी याठिकाणी प्रदूषणामुळे चक्क आभाळाचा रंगही केशरी झाला होता. यामुळे शहरातील नागरिकांना घराबाहेर पडणंही अवघड झालं होतं. कॅनडामधील वणव्यांमुळे हे झालं असल्याचं म्हटलं जातंय.
अमेरिकेच्या राष्ट्रीय हवामान विभागाने न्यूयॉर्क शहरासाठी एक एअर क्वालिटी हेल्थ अॅडव्हायजरी जारी केली आहे. यामध्ये नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडणं टाळावं, आणि श्वसनाचे आजार असलेल्या व्यक्तींनी अधिक खबरदारी घ्यावी असा सल्ला देण्यात आला आहे.
कॅनडातील वणव्यांचा परिणाम
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, न्यूयॉर्कमधील हवेत राखेचे कण आढळून आले. वणव्यातील धुरामध्ये असणारे हे कण याठिकाणी आढळून आल्यामुळे, हे प्रदूषण कॅनडातील वणव्यांमुळे झालं असल्याचं म्हटलं जात आहे.
बुधवारी न्यूयॉर्क जगातील सर्वात प्रदूषित शहर होतं. एअर क्वालिटी इंडेक्सनुसार न्यूयॉर्कमधील हवामानाची पातळी 350 - A एवढी होती. या पातळीला अत्यंत धोकादायक मानलं जातं. न्यूयॉर्कमध्ये यापूर्वी कधीही एवढ्या प्रमाणात हवा प्रदूषण पाहण्यात आलं नव्हतं.
खबरदारीची सूचना
न्यूयॉर्क स्टेट डिपार्टमेंटने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. या प्रदूषणामुळे डोळ्यांमध्ये जळजळ, नाक आणि घशाचा त्रास, खोकला, शिंका, सर्दी आणि श्वास घेण्यास अडचण अशा तक्रारी जाणवू शकतील असं यात म्हटलं आहे. यासोबतच शहराचे महापौर एरिक अॅडम्स यांनी नागरिकांना शक्य तितकं घरातच राहण्याचे आवाहन केलं आहे.
फ्लाईट्स रद्द
न्यूयॉर्कमध्ये प्रदूषणामुळे दाट धुक्याचा थर जमा झाला होता. यामुळे कित्येक फ्लाईट्स देखील रद्द करण्यात आल्या. तसेच, ब्रॉडवे शो देखील रद्द करण्यात आला.
१३ राज्यांमध्ये इशारा
कॅनडामध्ये सध्या ४०० पेक्षा अधिक वणवे पेटले आहेत. याचा गंभीर परिणाम अमेरिकेवर होत आहे. दाट धुक्याची ही चादर दक्षिण दिशेला वेगाने प्रवास करत आहे. त्यामुळे अमेरिकेतील १३ राज्यांना हवा प्रदूषणाचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, कॅनडाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील आतापर्यंतचा हा सर्वात गंभीर वणवा आहे. आतापर्यंत तब्बल ६.७ मिलियन एकर जंगलामध्ये हा वणवा पसरला आहे.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!


























Subscribe to my channel



