पुणे - ससूनमधून ‘आरएमओ’ (RMO) बोलतोय. तुमच्या रुग्णाला तातडीने औषध द्यावी लागत आहेत. ती ससूनमध्ये नाहीत. तसेच, ती रुग्णालयाच्या परिसरातील दुकानांमध्येही नाही. त्यामुळे तुम्ही जिथे असाल तिथून लवकर या आणि औषधे आणा. साडेतीन हजार रुपयांची ही औषधे आहेत. पैसे ‘कॅश’ द्या किंवा ‘ऑनलाइन’ पाठवा,’ असा फोन आल्यास तुम्ही सावध व्हा.
असा फोन ससूनमधून कोणीही आरएमओ करत नाही. तर तुमचे पैसे उकळायला बसलेला तोतया डॉक्टर करतो. या फोनवरून कोणीही पैसे देऊ नका किंवा ऑनलाइन पाठवू नका, असे आवाहनही ससून रुग्णालय प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
ससून रुग्णालयात हजारांहून जास्त रुग्ण वेगवेगळ्या आजाराच्या उपचारांसाठी दाखल आहेत. त्यांच्या नातेवाइकांना असा फोन येतो. विशेषतः ज्यांचे रुग्ण अतिदक्षता विभागात (आयसीयू) उपचार घेत आहेत. त्यांना फोन करण्यात येतात, असे निरीक्षण टिपण्यात आले आहे.
निवासी वैद्यकीय अधिकारी (आरएमओ) बोलत असल्याचे फोनवरून रुग्णाच्या नातेवाइकांना सांगितले जाते. रुग्णाला तातडीने जीवरक्षक औषधांची गरज आहे. ती ससून रुग्णालयात मिळत नाहीत. ती बाहेरून आणावी लागतील. त्यासाठी साडेतीन हजार रुपये खर्च आहे. औषधे लवकर द्यायची आहेत. तुम्ही औषधांचे पैसे कॅश देणार की ऑनलाइन असा प्रश्न समोरचा व्यक्ती आवर्जून विचारतो.
या बाबत ससून रुग्णालय प्रशासनासाठी संपर्क साधला असता, फोनवरून सांगितलेल्या नावाचा कोणताही ‘आरएमओ’ रुग्णालयात नाही, हे स्पष्ट झाले. गेल्या काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारची फसवणुकीचे प्रकार उघड झाले होते. त्या बाबत पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानंतर काही दिवस हे प्रकार थांबले आता पुन्हा नव्या स्वरूपात हे प्रकार सुरू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
मोबाईल नंबर बाहेर जातोच कसा?
ससून रुग्णालयात रुग्णांचा केस पेपर काढताना तेथे जवळच्या नातेवाइकांचा मोबाईल क्रमांक दिला जातो. हा मोबाईल क्रमांक रुग्णालयाच्या व्यवस्थेतून बाहेर जातो कसा, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
खात्री करा
पैसे देण्यापूर्वी तुम्ही रुग्णावर उपचार करत असलेल्या डॉक्टरांकडून औषधे लागणार आहेतच याची न चुकता खात्री करा. संबंधित औषधे रुग्णाला कशासाठी वापरण्यात येणार आहे, ते विचारा.हे पण वाचा-
शहर
- पादचाऱ्यांचा मोठा विजय! रस्त्यावर सुरक्षित चालणे हा आता 'मूलभूत हक्क'; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
- पुणे-नाशिक रेल्वे मार्गात तिसऱ्यांदा मोठा बदल! 'जीएमआरटी' दुर्बिणीच्या संरक्षणासाठी नवा मार्ग निश्चित, ताशी १६० किमी वेगाने धावणार ट्रेन
- औषधांशिवाय रक्तातील साखर कमी करायचीये? दररोज १५ मिनिटं करा हे काम; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला!
- मराठा-कुणबी विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! 'सारथी'ची परदेशी शिष्यवृत्ती आता पूर्ण अनुदानित; शैक्षणिक शुल्काची मर्यादा हटवली
महाराष्ट्र
- पुणे-नाशिक रेल्वे मार्गात तिसऱ्यांदा मोठा बदल! 'जीएमआरटी' दुर्बिणीच्या संरक्षणासाठी नवा मार्ग निश्चित, ताशी १६० किमी वेगाने धावणार ट्रेन
- मराठा-कुणबी विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! 'सारथी'ची परदेशी शिष्यवृत्ती आता पूर्ण अनुदानित; शैक्षणिक शुल्काची मर्यादा हटवली
- PF खातेदारांसाठी मोठी खुशखबर! महिनाअखेरीस सुरू होणार नवी सुविधा; आता UPI आणि ATM द्वारे थेट काढता येणार पीएफचे पैसे!
- नांदेड : अनैतिक संबंधातून पतीचा निर्घृण खून , पत्नी आणि प्रियकराने मृतदेह पुरून रचला हत्येचा थरार.
गुन्हा
- नाशिक: सुटकेसमधील महिलेच्या हत्येचा उलगडा; हातावरील टॅटू ठरला तपासाचा धागा, प्रेम प्रकरणातून भीषण हत्या.
- अंबरनाथ: डॉक्टर पतीची सीसीटीव्हीतून पत्नीवर पाळत; हुंड्यासाठी छळ आणि मारहाणीला कंटाळून नवविवाहितेची आत्महत्या.
- पुणे: काळ आला होता पण वेळ आली नव्हती! ५० चिमुरड्यांचा जीव टांगणीला; पुण्यात चालकाच्या दारुड्या वृत्तीमुळे मोठा अनर्थ!
- मंदिरात बनावट लग्न करून कॉलेज तरुणीवर वारंवार अत्याचार; पांढरकवडा पोलिसांत नराधमाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल
राजकीय
- महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक २०२६: मतदानाला सुरुवात, खासदार बंडाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले!
- दिल्ली: ऑपरेशन टायगर फत्ते! उद्धवसेनेच्या ६ खासदारांचा वेगळा गट स्थापन, लोकसभा अध्यक्षांकडून मिळाली मान्यता.
- फ्रान्स: "आम्ही इंस्टाग्रामवर सर्वात प्रसिद्ध आहोत!": G7 परिषदेत जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान मोदींना दिले मजेशीर उत्तर.
- मुंबई: महाराष्ट्र पुन्हा 'राजकीय भूकंप'? ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याची तयारी; 'ऑपरेशन टायगर'ची चर्चा!
इतर
- मराठा-कुणबी विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! 'सारथी'ची परदेशी शिष्यवृत्ती आता पूर्ण अनुदानित; शैक्षणिक शुल्काची मर्यादा हटवली
- दैनिक राशिभविष्य १८ जून २०२६: गजकेसरी राजयोगामुळे या राशींचे नशीब फळफळणार, मिळणार धनलाभ!
- 'फूड सेफ्टी' अलर्ट! तुमच्या किचनमधील चाकू ठरू शकतात आजारांचे कारण; FSSAI ने जारी केले कडक नवीन नियम.
- आजचे राशिभविष्य १७ जून २०२६: चंद्र, शुक्र आणि गुरूच्या कृपेने या राशींना मिळणार तिप्पट लाभ!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
विडियो गॅलेरी

पुणे शहरात अतिक्रमण विरोधात पुणे महापालिकेचा धडक कारवाई सुरू!
पुणेकर, आजच्या महत्त्वाच्या बातम्या तुमच्यासाठी! सर्व ताज्या घडामोडींसाठी Pune News ला फॉलो करा
माझ्याविरोधात तक्रार करणारे तुम्ही कोण?" असे म्हणत संबंधित अधिकाऱ्याने नागरिकांना उद्धट वागणूक दिली.
देश विदेश
- भारतासाठी सर्वात मोठा दिलासा! 'होर्मुझ' जलमार्ग खुला होताच ४० एलपीजी टँकर्स भारताकडे रवाना, गॅस-इंधन स्वस्त होणार?
- मोठी आर्थिक घडामोड! भारत-ब्रिटन मुक्त व्यापार करार १५ जुलैपासून लागू; स्कॉच व्हिस्की आणि लक्झरी कार होणार स्वस्त
- हरियाणा: पानिपतमध्ये १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर नातेवाईकाकडून अत्याचार; 'रमेश छोटू' वर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल!
- ओडिशा: समोरा-समोरील धडकेत दोन ट्रकला भीषण आग, दोन्ही चालक जिवंत जळाले!
























Subscribe to my channel




