
बिबवेवाडी - सातारा रस्त्यावरील माणिक दुगड चौकातून सुरु होणार्या स्वामी विवेकानंद मार्गासह अंतर्गत रस्त्यावरील चार ठिकाणच्या कामांमुळे बिबवेवाडीकर पुरते वाहतूक कोंडीत अडकलेले असून दोन किलोमीटर अंतरात चार ठिकाणी रस्त्याचे काम सुरू आहे, रस्त्यांच्या कामाकडे ना महापालिका प्रशासनाचे लक्ष ना वाहतूक पोलिसांचे लक्ष,
नागरिक, कार्यकर्ते स्व:ता वाहतूक कोंडी सोडवत असतात त्यामुळे रस्त्याला वाली कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे. विवेकानंद मार्गाच्या सुरवातीला प्रेम नगर येथील माणिक दुगड चौकात भुयारी मार्गा शेजारून विवेकानंद मार्गाला जोडणाऱ्या जुन्या रस्त्याचे सीमेंट काँक्रिटीकरण करण्याचे काम सुरू आहे संथ गतीने मुदतीपेक्षा जास्त काळ काम सुरू आहे त्यामुळे चौकात वाहतूक कोंडी होते.
विवेकानंद मार्गावरील गावठाण चौकात भगली हॉस्पिटल चौका कडे जाणार्या रस्त्याचे 130 मीटर सीमेंट काँक्रीटकरण करण्याचे काम सुरू आहे, रस्त्याचे अर्धवट काम केले असून येथे वाहने पार्किंग केली जातात त्यामुळे वाहतूक कोंडी होते, रस्त्यावर शाळा आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून रस्त्यावरून शाळेत जावे लागते.
बिबवेवाडी पोलीस ठाण्यापासून संविधान चौकापर्यंत 80 मीटर चा रस्ता सीमेंट काँक्रीट चा करण्याचे काम खूपच संथगतीने सुरू आहे. रस्त्याच्या दुतर्फा अर्धवट कामे झालेली असून त्यातच नव्याने संविधान चौक ते अप्पर बस थांब्यापर्यंत चैत्रबन झोपडपट्टी च्या बाजूने 90 मीटर रस्त्याची एक बाजू सीमेंट काँक्रीटकरणासाठी खोदलेली आहे.
त्यामुळे प्रचंड प्रमाणात दररोज वाहतूक कोंडी चा सामना नागरिकांना करावा लागतो. लेक टाऊन सोसायटी, अप्पर, महालक्ष्मी नगर, सुखसागर नगर, व्हीआयटी हॉस्टेलकडे जाणाऱ्या काही मीटर च्या रस्त्यासाठी अर्धा अर्धा तास वाहतूक कोंडीत वाहने अडकतात.आबा बाबर ( स्थानिक रहिवासी ) : चिंतामणी नगर येथील रस्त्यांचे काम अर्धवट असताना चैत्रबन समोर रस्त्याचे काम सुरू केले आहे.
त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडली असून अधिकारी दुर्लक्ष करतात, कामाची गती पाहता पावसाळ्या पूर्वी काम पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे.अमर शिंदे ( कार्यकारी अभियंता पथ विभाग ) : पावसाळी व सांडपाणी वाहिन्यांच्या कामामुळे रस्त्याच्या कामाला विलंब झाला, खोदलेले रस्ते पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणार आहे.
शहर
- मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ! मतदार यादीतून तब्बल २ कोटी नावे वगळल्याचा रोहित पवार यांचा गंभीर दावा, निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर खळबळ
- मुंबई: महायुतीमधील पालकमंत्री पदाचा तिढा सुटला! रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले तर नाशिकची धुरा गिरीश महाजन यांच्याकडे
- मुंबई: मिरा रोडमध्ये धावत्या स्कूल बसजवळ कोसळला मेट्रोचा स्लॅब, शाळकरी मुलं थोडक्यात बचावली
- पुणे: वाकड बनले कचऱ्याचे हब; चौधरी पार्क आणि यमुनानगर रोड परिसरातील नागरिक अस्वच्छतेमुळे त्रस्त
महाराष्ट्र
- गोवा: ‘लगे रहो मुन्नाभाई’ फेम अभिनेता अश्विन मुशरनच्या कारने बाप-लेकाला उडवले; गोव्यातील अपघातानंतर मदतीऐवजी स्थानिकांसोबत घातला वाद
- मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ! मतदार यादीतून तब्बल २ कोटी नावे वगळल्याचा रोहित पवार यांचा गंभीर दावा, निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर खळबळ
- मुंबई: महायुतीमधील पालकमंत्री पदाचा तिढा सुटला! रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले तर नाशिकची धुरा गिरीश महाजन यांच्याकडे
- बीड: पहिल्या श्रावण सोमवारी व नागपंचमीच्या दुर्मिळ योगावर परळीच्या वैद्यनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; ३ हजार किलो फुलांची सजावट
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गोंदिया: स्वातंत्र्यदिनी काळाचा घाला! अंघोळीची हौस बेतली जिवावर, गोंदियातील ढासगड येथे दोन तरुण वाहून गेले
- लखनऊ: शिक्षणाचा खेळ; जेन-झीनंतर आता जेन-अल्फा आक्रमक; लखनऊमध्ये विद्यार्थ्यांचे रस्त्यावर उतरून आंदोलन
- नवी दिल्ली: नितीन नबीन यांच्या टीममध्ये 'जेन झी'ची एन्ट्री; भाजपात मोठे बदल, महाराष्ट्रातून कुणाला संधी?
- अरुणाचल प्रदेश: मुसळधार पावसामुळे निसर्गाचा कोप; अचानक आलेल्या पुरात लष्कराचे ५ जवान बेपत्ता, तर भूस्खलनात ४ मजुरांचा मृत्यू



























Subscribe to my channel




