
पुणे : बंद अवस्थेतील मोबाइल टॉवरचे साहित्य चोरणार्या टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडून १३ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला. सहा जिल्ह्यातील दहा मोबाइल टॉवरची चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात पथकाला यश आले आहे. टोळीमध्ये टॉवर कंपनीतील दोन अधिकार्यांचा सहभाग असल्याचेही निष्पन्न झाले आहे.
रमेश मल्लाप्पा गरसंगी (वय ३३ रा. मळघन ता बसवन बागेवाडी जि.विजयपुरा कर्नाटक) प्रशांत वामन यादव (वय ३१ रा.वडकी ता. हवेली मूळ रा. हर्णे ता. पुरंदर), सुहास श्रीराम लाड (वय ४० रा.मांजरी बु ) जावेद हमीदुल्ला खान (वय ३३ रा. भेकराईनगर, फुरसुंगी ) आणि सचिन गणपत कदम (वय ४१ रा. कोंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
जी. टी. एल. इन्फास्ट्रक्चर कंपनीच्या रांजणगावातील पाचंगे वस्ती परिसरातून बंद अवस्थेतील मोबाइल टॉवरची चोरीची घटना २८ जानेवारीला घडली होती. चोरट्यांनी तब्बल १५ लाखांचे साहित्य चोरुन नेले होते. गुन्हयाची व्याप्ती मोठी असल्यामुळे गुन्हयाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून केला जात होता. पथकाने तांत्रिक विश्लेषणाचा आधारे आरोपींना कर्नाटक राज्यातून आणि पुणे जिल्हा परीसरातून पाचजणांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून १३ लाख ५० हजारांचा ऐवज जप्त केला . त्यांनी जी. टी. एल. कंपनीचे सातारा, रत्नागिरी, सांगली, पुणे, बीड, रायगड अशा सहा जिल्हयातील १० मोबाइल टॉवरची चोरी केल्याची कबुली दिली.
अटक केलेल्या टोळीत जी.टी.एल इन्फास्ट्क्चर कंपनीत काम करणार्या दोघा अधिकार्यांचा सहभाग आहे. २००८ मध्ये कंपनी बंद झाल्यानंतर संबंधित मोबाइल टॉवरची चोरीचा कट त्यांनी रचला. त्यानंतर इतर साथीदारांच्या मदतीने चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली. ही कामगिरी पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर,गणेश जगदाळे, अभिजीत सावंत, तुषार पंदारे, सचिन घाडगे, राजु मोमीन, मंगेश थिगळे, जनार्दन शेळके, चंद्रकांत जाधव, अजित भुजबळ, हनुमंत पासलकर, हेमंत विरोळे, अक्षय सुपे आदींनी ही कारवाई केली.
शहर
- पुणे: ओतूर येथे भीषण अपघात; वडिलांसह ३ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी
- पुणे: पहाटेच गोळीबाराचा थरार! वानवडीत पोलीस-गुन्हेगारात चकमक; ३० गुन्हे असलेला सराईत करण सिंग जखमी.
- अहिल्यानगर: लेकीला वाचवण्यासाठी बापाची बिबट्याशी झुंज; थरारक घटना सीसीटीव्हीत कैद
- मुंबई: आषाढी वारीसाठी एसटी सज्ज! वारकऱ्यांच्या सेवेसाठी धावणार ५,५०० विशेष बसेस; थेट गावातून मिळणार पंढरपूरची बस.
महाराष्ट्र
- पुणे: पोलिसांची धडाकेबाज कारवाई! केमिकल कंपनीच्या गोडावूनमधून ऑर्थो फॉस्फरिक ॲसिड चोरणारी टोळी गजाआड.
- पुणे: ओतूर येथे भीषण अपघात; वडिलांसह ३ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी
- अमरावती: 'निम-आराम'च्या नावाखाली प्रवाशांची लूट; वरूड-नागपूर मार्गावरील भंगार बस आणि जाहिरातींचा सुळसुळाट!
- सातारा: जेजुरीला निघालेल्या भाविकांच्या टेम्पो ट्रॅव्हलरचा उभ्या ट्रकला धडक; आजोबा-नातीचा जागीच मृत्यू.
गुन्हा
- उत्तर प्रदेश: हुंड्याच्या राक्षसाने घेतला अंजलीचा बळी! "त्यांनीच माझ्या बहिणीला विष पाजले...", भावाचा पोलिसांसमोर टाहो.
- हरियाणा: पोलीस ठाण्यात कर्करोगग्रस्त रुग्णाला बेदम मारहाण; दोषी ३ पोलीस कर्मचारी निलंबित
- पुणे: शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून ५ कोटींची फसवणूक; हिंजवडीतील अहेरकर कुटुंब गजाआड
- पुणे: पोलिसावर जीवघेणा हल्ला; हेल्मेटने मारहाण करत ई-चलन मशीनची तोडफोड, कात्रजमधील धक्कादायक प्रकार!
राजकीय
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
- "मी मोठ्या धर्मसंकटात!" शिंदे गटात जाण्याच्या चर्चांवर खासदार ओमराजे निंबाळकरांनी अखेर सोडलं मौन
- मुंबई: उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवारांशी राष्ट्रवादी सैनिक सेल प्रदेशाध्यक्ष दिपकराजे शिर्के यांची विविध मागण्या संदर्भात भेट व चर्चा ;
इतर
- आजचे राशीभविष्य २० जून २०२६: शनिदेव आणि हनुमानजींची कृपादृष्टी; या राशींचे नशीब फळफळणार!
- औषधांशिवाय रक्तातील साखर कमी करायचीये? दररोज १५ मिनिटं करा हे काम; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला!
- मराठा-कुणबी विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! 'सारथी'ची परदेशी शिष्यवृत्ती आता पूर्ण अनुदानित; शैक्षणिक शुल्काची मर्यादा हटवली
- दैनिक राशिभविष्य १८ जून २०२६: गजकेसरी राजयोगामुळे या राशींचे नशीब फळफळणार, मिळणार धनलाभ!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विक्रमी कामगिरी! वैभव सूर्यवंशीचा धमाका; अवघ्या ११ चेंडूत अर्धशतक ठोकत रचला विश्वविक्रम!
- हरियाणा: पोलीस ठाण्यात कर्करोगग्रस्त रुग्णाला बेदम मारहाण; दोषी ३ पोलीस कर्मचारी निलंबित
- देशातील महामार्ग आणि एक्सप्रेस वेवर आता हवामानानुसार बदलणार 'स्पीड लिमिट'; नियमांचे उल्लंघन केल्यास आपोआप ई-चलान!
- नवी मुंबई: विमानतळावर पाणीगळतीचा व्हिडीओ व्हायरल; विमानतळ प्रशासनाचे स्पष्टीकरण, 'प्रवाशांची दिशाभूल होतेय!'



























Subscribe to my channel


