इराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावामुळे आणि युद्धसदृश परिस्थितीमुळे अनेक भारतीय परदेशात अडकले आहे. युद्धग्रस्त देशात वास्तव्यास असलेल्या पुणेकर नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत पुणे महानगरपालिका (PMC) आणि जिल्हा प्रशासनाने तातडीने पावले उचलली आहेत. या ठिकाणी अडकलेल्या नागरिकांना सुखरूप परत आणण्यासाठी विशेष मदत कक्ष आणि डेटा बँक सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पुणे महानगरपालिकेची तातडीची पावले
युद्धजन्य परिस्थितीमुळे पुण्यातील नातेवाईकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या आपत्ती व्यवस्थापनाचा भाग म्हणून पुणे महापालिका आयुक्तांनी प्रशासनाला महत्त्वाचे आदेश दिले आहेत. यानुसार पुणे महानगरपालिकेत एक स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. हा कक्ष २४ तास कार्यरत राहील. नागरिकांना मदतीसाठी तातडीने संपर्क साधता यावा, यासाठी विशेष हेल्पलाईन क्रमांक लवकरच सार्वजनिक केला जाणार आहे.
तसेच युद्धग्रस्त भागात अडकलेल्या पुणेकर पर्यटकांची आणि नोकरी-व्यवसायानिमित्त तिथे असलेल्या रहिवाशांची एक अधिकृत यादी (Data Bank) तयार केली जात आहे. यामुळे केंद्र सरकार आणि परराष्ट्र मंत्रालयाशी समन्वय साधणे सोपे होणार आहे. तसेच प्रशासनाने नातेवाईकांकडून अडकलेल्या व्यक्तीचे पूर्ण नाव, परदेशातील सध्याचा पत्ता किंवा हॉटेलचा पत्ता, पासपोर्ट क्रमांक आणि स्थानिक संपर्क क्रमांक जमा करण्यास सुरुवात केली आहे.
नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये
पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिलेल्या माहितीनुसार, १ ते २ मार्च या कालावधीत दुबई येथे अडकलेल्या पुण्यातील एकूण १२३ नागरिकांची माहिती प्राप्त झाली होती. जिल्हा प्रशासनाने या सर्व नागरिकांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असून, ते सर्व सुरक्षित असल्याची खात्री पटली आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. काही शंका असल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या ०२०-२६१२३३७१ किंवा ०२०-२६१३३५२२ या क्रमांकावर संपर्क साधावा.
तसेच परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) संबंधित देशांतील भारतीय दूतावासांचे संपर्क क्रमांक जाहीर केले आहेत, जेणेकरून अडकलेल्या नागरिकांना स्थानिक पातळीवर मदत मिळू शकेल. पॅलेस्टाईन (रामल्लाह), कुवेत, बहरीन, मस्कत आणि जॉर्डन येथील भारतीय नागरिकांनाही अत्यंत सतर्क राहण्याच्या आणि दूतावासाच्या संपर्कात राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती





















Subscribe to my channel

