Iran-Israel War: इस्राइलचा बेरूतवर हल्ला, रहिवासी भागांना केलं लक्ष्य; १० जणांचा मृत्यू

image

इस्राइल आणि इराणमध्ये जोरदार युद्ध सुरू आहे. दोन्ही देशांकडून हवाई हल्ले सुरू आहेत. इस्राइलने आता बेरूतवर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये अनेक शहरं उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला गेला. इस्राइलने केलेल्या हल्ल्यामध्ये बेरूतमधील १० जणांचा मृत्यू झाला. इस्रायलने बेरूतमधील नागरी वस्तींवर जोरदार हवाई हल्ले केले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.

इस्राइलने बेरूतवर केलेल्या हल्ल्याचे व्हिडीओ समोर आले आहे. हल्ल्याच्या ठिकाणांवर इमारतींचे नुकसान झाल्याचे यामधून दिसत आहे. इमारती जमीनदोस्त झाल्याचे पाहायला मिळत आहे. या हल्ल्यामुळे बेरूतमधील नागरिक घाबरले आहेत. सध्या याठिकाणी तणावाचे वातावरण आहे. इराणच्या सर्वोच्च नेत्याच्या हत्येनंतर लेबनॉनहून इस्रायलवर हिजबुल्लाहने केलेल्या हल्ल्यांच्या वृत्तानंतर हे हल्ले करण्यात आले आहेत. इस्रायलने नागरी भागांवर हल्ला केला तेव्हा काही तासांत अनेक स्फोट झाल्याचे प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *