नियम मोडाल तर विमा महागणार! प्रलंबित ई-चलान, 'नो इन्शुरन्स, नो फ्युएल' आणि ANPR कॅमेऱ्यांचा वाहनचालकांवर मोठा परिणाम

महाराष्ट्र: गाडी चालवताना वाहतूक नियम मोडताय? मग खिशाला बसणार मोठा फटका! आता ई-चलानमुळे वाहन विम्याचा हप्ता वाढणार; सरकारच्या मोठ्या प्रस्तावाची तयारी!

तुम्ही दुचाकी किंवा चारचाकी चालवताना वारंवार वाहतूक नियमांचे उल्लंघन करत असाल किंवा तुमच्या गाडीवर प्रलंबित ई-चलान (E-Challan) असतील, तर आता सावध व्हा! केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून वाहन विम्याच्या प्रीमियमची थेट सांगड वाहतूक नियमांच्या उल्लंघनाशी घालण्याच्या प्रस्तावावर काम केले जात आहे.

वारंवार सिग्नल तोडणाऱ्या आणि दंड थकवणाऱ्या चालकांचा विमा महागणार, तर नियम पाळणाऱ्यांना मिळणार सवलत! यासोबतच 'नो इन्शुरन्स, नो फ्युएल' (No Insurance, No Fuel) उपक्रम आणि ४ ते ६ वर्षांच्या विम्याचाही विचार सुरू असल्याचे समोर आले आहे. पेट्रोल पंपांवर देखरेख ठेवण्यासाठी ANPR (Automatic Number Plate Recognition) कॅमेऱ्यांचा वापर करण्याबाबतही चर्चा सुरू आहे.

रस्ते सुरक्षा अधिक कडक करणे, वाहतूक नियमांची काटेकोर अंमलबजावणी करणे आणि विमा नसलेल्या किंवा नियम मोडणाऱ्या वाहनांवर अंकुश ठेवणे हा यामागील मुख्य उद्देश मानला जात आहे. वारंवार वाहतूक नियम मोडणाऱ्या चालकांच्या वाहन विमा प्रीमियममध्ये वाढ झाल्यास त्याचा थेट आर्थिक परिणाम वाहनधारकांच्या खिशाला बसू शकतो. तसेच प्रलंबित ई-चलान आणि विम्याची स्थिती तपासणी अधिक काटेकोर झाल्यास वाहनचालकांना नियम पाळणे आणि विमा वेळेत नूतनीकरण करणे अनिवार्य ठरेल.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *