
Mumbai : पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा मार्ग अहिल्यानगर-शिर्डीमार्गे नेण्यासाठी सर्व स्तरांतून तीव्र विरोध होत असल्याने पुन्हा जुन्या मार्गानेच पुणे-नाशिक रेल्वे विकसित करता येईल का, याचा अभ्यास करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी जाहीर केले. नारायणगाव येथील ‘जायन्ट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कॉप’च्या संरक्षित क्षेत्राला (बफर झोन) धोका निर्माण होणार नाही आणि जुन्या मार्गावरील महत्त्वाची गावे निसटणार नाहीत, अशा पद्धतीने तज्ज्ञ सल्लागाराकडून त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेऊ, असे आश्वासन फडणवीस यांनी विधान परिषदेत दिले.
विधान परिषदेतील आमदार सत्यजित तांबे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस यांनी या प्रकल्पातील अडचणी स्पष्ट केल्या; तसेच राज्य सरकारची भूमिका तुमच्यापेक्षा वेगळी नाही, अशी ग्वाही देतानाच, रेल्वेमंत्र्यांशी चर्चा करून तीन ते चार महिन्यांत सल्लागाराकडून योग्य मार्ग कसा काढता येईल, यासाठी प्रयत्न करण्याचे स्पष्ट केले.
काय आहे मुख्य अडथळा?
पुणे-नाशिक रेल्वे मार्ग हा नाशिक-सिन्नर-संगमनेर-अकोले-नारायणगाव-मंचर-चाकण या भागातून प्रस्तावित होता. मात्र, नारायणगाव परिसरात ३२ देशांच्या सहभागातून चालणारी जागतिक स्तरावरील 'जीएमआरटी' वेधशाळा आहे. रेल्वेच्या लहरींमुळे या वेधशाळेच्या कामात अडथळा येऊ शकतो, असे सांगून केंद्र सरकारने या मार्गाला लेखी नकार दिला आहे. केंद्र सरकारची भूमिका मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात स्पष्ट करून पर्यायी मार्गाचाच विचार करावा लागेल, असे सांगितले.
असा निघणार तोडगा
रेल्वे मंत्रालय आणि या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घेण्यासाठी आग्रह धरणार
सल्लागारांकडून ३ ते ४ महिन्यांच्या कालावधीत पुणे-नाशिक रेल्वेमार्गासाठी योग्य मार्ग कोणता, याचा अहवाल घेणार
वेधशाळेचे नियम पाळून आणि प्रस्तावित मूळ रेल्वेमार्गात फार बदल न करता (डेव्हिएशन) सर्व गावे रेल्वेशी 'कनेक्ट' होण्याच्या दृष्टीने अभ्यासाअंती निर्णय घेणार
शिर्डी पर्यायाला विरोध का?
शिर्डीमार्गे गेल्यास प्रवासाचा वेळ किमान ३० मिनिटांनी वाढणार आहे.
जुन्या प्रस्तावित मार्गावरील संगमनेर, सिन्नर, नारायणगाव, चाकण यासारखी महत्त्वाची ठिकाणे रेल्वे नकाशावरून बाद होतील.
मार्ग बदलण्यास स्थानिकांचा तीव्र विरोध असून गावोगावी कृती समित्या, आंदोलने होत आहेत.
शहर
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- नवी दिल्ली/मुंबई: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल २५ रुपयांनी महागणार? सोशल मीडियावरील चर्चांवर सरकारने दिले महत्त्वाचे स्पष्टीकरण
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- आंबेगाव तालुक्यात शोककळा! ओढ्यात खेळताना १० वर्षीय कृष्णा चवरेचा बुडून दुर्दैवी मृत्यू; अवसरी बुद्रुकमधील घटना
- जाऊन येतो म्हणाला, पण विहिरीत आढळला मृतदेह! जालन्यातील तरुणाच्या मृत्यूचे गूढ वाढले; दानापूर फाट्यावरील घटना
- बीड कारागृहातून धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल! अझर पठाणचा गंभीर आरोप; निवडणुकीच्या तोंडावर राजकीय षडयंत्राचा दावा
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
गुन्हा
- पैसा, घर गेले आणि मातृछत्रही हरवले! शहीद पुत्राची २ कोटींची फसवणूक; धक्क्याने मातेचा मृत्यू
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- पुणे: भिडे पुलाजवळील गळा चिरून झालेल्या खून प्रकरणाचा छडा; हातावरील 'टॅटू' आणि तांत्रिक तपासाने आरोपींना बेड्या
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ
























Subscribe to my channel




