मुंबई: पदपथ मोकळे झाले पण काही दिवसांतच पुन्हा तेच फेरीवाले! महापालिकेच्या कारवाईवर नगरसेवकाचा 'लाचेचा' थेट सवाल!

मुंबई: पादचाऱ्यांना विनाअडथळा आणि सुरक्षितपणे चालता यावे, यासाठी मुंबई महानगरपालिकेने पदपथांवरील अतिक्रमणे हटवली खरी; मात्र या कारवाईनंतर अवघ्या काही दिवसांतच त्याच जागांवर पुन्हा तेच फेरीवाले आणि तेच अतिक्रमण दिसू लागले आहे. या प्रकारचे तीव्र पडसाद सोमवारी पूर्व आणि पश्चिम प्रभाग समितीच्या बैठकीत उमटले. नगरसेवक तेजिंदर सिंग तिवाना यांनी, पैसे घेऊन फेरीवाले पुन्हा बसवले जातात का, असा थेट आणि गंभीर सवाल उपस्थित केला.

महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी पादचाऱ्यांच्या सोयीसाठी आणि पदपथ मोकळे ठेवण्यासाठी ‘मिशन पेडेस्ट्रियन फर्स्ट’ ही विशेष मोहीम हाती घेतली. याअंतर्गत प्रत्यक्ष कारवाईही सुरू करण्यात आली आणि सुरुवातीला काही ठिकाणी पदपथ मोकळे झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र, 'पी पश्चिम' (P-West) प्रभागातील प्रत्यक्ष परिस्थितीचे उदाहरण देत नगरसेवक तेजिंदर सिंग तिवाना यांनी या मोहिमेतील त्रुटी आणि अंमलबजावणीतील उणिवांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले.

कारवाई झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच फेरीवाले पुन्हा त्याच पदपथांवर बस्तान मांडत असल्याने मोहिमेच्या परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पैसे देऊन किंवा अर्थपूर्ण संबंधांतून हे फेरीवाले पुन्हा बसवले जात आहेत का, अशी विचारणा करत तिवाना यांनी कारवाईनंतरच्या सातत्यपूर्ण देखरेखीचा अभाव चव्हाट्यावर आणला. फेरीवाले पुन्हा बस्तान मांडत असल्याने सोमवारी प्रभाग समितीच्या बैठकीत या मुद्द्यावरून जोरदार चर्चा आणि पडसाद उमटले.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *