उपराजधानी नागपूरमधून एक अत्यंत खळबळजनक आणि चक्रावून टाकणारी घटना समोर आली आहे. नागपूरच्या शांतनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तुलसीनगरात एका व्यावसायिकाच्या घरी तब्बल ३ कोटी ७४ लाख रुपयांची रोकड पळवण्यात आली आहे. घरातील कपाटातून पाच ते सहा बॅग्जमध्ये भरून ही अवाढव्य रोकड गाडीत ठेवताच, सशस्त्र दरोडेखोरांनी अत्यंत फिल्मी स्टाईलने हल्ला करत रोख रकमेची कारच पळवून नेल्याची घटना घडली. या थरारक घटनेमुळे नागपूर शहर पोलिस दल आणि गुन्हे शाखेत मोठी खळबळ उडाली असून, परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सुरक्षारक्षकावर चाकूने वार करून चालकाला धमकावले:
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, मंगळवारी (ता. १७) मध्यरात्री दीड ते अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. संबंधित घरातून सुमारे ३ कोटी ७४ लाख रुपयांची रोकड पाच ते सहा बॅग्जमध्ये भरून ती गाडीत ठेवण्यात आली होती. ही गाडी रवाना होत असतानाच अचानक आलेल्या सशस्त्र लुटारूंनी तेथे धुमाकूळ घातला. घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ तैनात असलेल्या सुरक्षारक्षकाने या चोऱ्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा संतापलेल्या हल्लेखोरांनी त्याच्यावर चाकूने निर्दयीपणे वार केले, ज्यामुळे सुरक्षारक्षक गंभीर जखमी झाला.
यादरम्यान, दरोडेखोरांनी कारचा चालक मोहन राव याच्या गळ्याला धारदार चाकू लावून त्याला जीवे मारण्याची धमकी दिली आणि बळजबरीने कारमधून खाली उतरवले. त्यानंतर लुटारू थेट ३ कोटी ७४ लाखांची रोकड असलेली ती कार घेऊन घटनास्थळावरून वेगाने पसार झाले.
कामठी-खैरी परिसरात कार सोडून आरोपी पसार, पोलिसांची चार पथके गठीत:
घटनेची माहिती मिळताच शांतिनगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आणि संपूर्ण शहरात नाकाबंदीचे आदेश दिले. तपासादरम्यान पोलिसांना नागपूर जिल्ह्यातील कामठी-खैरी (Kamptee-Khairi) परिसरामध्ये ती लुटलेली कार रस्त्याच्या कडेला लावारिस अवस्थेत असल्याचे आढळून आली. आरोपींनी कारमधील रोकड असलेली बॅग आणि रोقड लंपास करून गाडी तिथेच सोडून दिली होती. पोलिसांनी खैरी परिसरातून कार जप्त केली आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणातील रोकड (३ कोटी ७४ लाख रुपये) नेमकी कोणाची होती, ती कुठे नेली जात होती आणि तिचा मूळ स्रोत काय आहे, याविषयी आता उलटसुलट चर्चा सुरू असून हा व्यवहार हवाला व्यवहाराशी (Hawala Transaction) संबंधित असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, याबाबत पोलिसांकडून अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. आरोपींना पैशांच्या वाहतुकीची आधीपासून माहिती होती का, त्यांनी आधीच रेकी केली होती का, या सर्व बाजूंनी तपास करण्यासाठी नागपूर पोलिसांची चार विशेष तपास पथके गठीत करण्यात आली असून, परिसरातील शेकडो सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज कसून तपासले जात आहेत.
शहर
- पुणे: एम. ए. रंगूनवाला डेंटल कॉलेजच्या २५ वर्षांच्या गौरवशाली प्रवासाचा रौप्यमहोत्सव; भव्य मॅग्निफिकेशन मास्टरक्लासने झाली सोहळ्याची शानदार सुरुवात!
- पुणे: आईचा विनयभंग केल्याचा बदला; तरुणाने रस्त्यात गाठून केली ३१ वर्षीय व्यक्तीची निर्घृण हत्या, दौंड तालुक्यातील घटना!
- पुणे: टिंबर मार्केटमध्ये मध्यरात्री भीषण आगीचे तांडव; ५० ते ६० लाकडाची दुकाने जळून खाक, सुदैवाने जीवितहानी नाही!
- पुणे: भक्तीचा महासागर! प.पू. श्री शंकर महाराजांच्या प्रगटदिन सोहळ्याला उत्साहात सुरुवात, दिवसभर दर्शनासाठी उसळली अलोट गर्दी
महाराष्ट्र
- ठाणे: कौशल्य मेडीकल फाऊंडेशनने केला अटी आणि शर्तींचा भंग; ठाणे महासभेत भाजपाचे गंभीर आरोप, महापौरानी दिले चौकशीचे आदेश!
- कोल्हापूर: गडहिंग्लजमध्ये 'दुष्काळ' आंदोलन पेटले! महसूलमंत्र्यांच्या फोननंतर वाढला उद्रेक, रस्त्यावर टायरी पेटवून ठिय्या; वाहतूक ठप्प
- पुणे: एम. ए. रंगूनवाला डेंटल कॉलेजच्या २५ वर्षांच्या गौरवशाली प्रवासाचा रौप्यमहोत्सव; भव्य मॅग्निफिकेशन मास्टरक्लासने झाली सोहळ्याची शानदार सुरुवात!
- पुणे: आईचा विनयभंग केल्याचा बदला; तरुणाने रस्त्यात गाठून केली ३१ वर्षीय व्यक्तीची निर्घृण हत्या, दौंड तालुक्यातील घटना!
गुन्हा
- गोंदिया: उदमांजर शिकारप्रकरणी सहा जण जेरबंद; गोंदिया वनविभागाची धडक कारवाई, कामठा परिसरातील घटना
- कोल्हापूर: पुणे रेल्वे प्रवासादरम्यान धक्कादायक घटना हातकणंगलेत रेल्वेखाली सापडून विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; आत्महत्या की घातपात? चर्चांना उधाण
- पुणे: आळंदीत दिवसाढवळ्या थरारक रक्तपात! जुन्या वादातून पीसीएमटी चौकात रिक्षाचालकावर खंजीराने जीवघेणा हल्ला; परिसरात एकच दहशत
- धाराशिव: मोबाईलसाठी पैसे दिले नाही म्हणून जन्मदात्या वडिलांची झोपेतच हत्या; पोटच्या मुलाच्या कृत्याने धाराशिव हादरले!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गोवा: लोकशाहीच्या रक्षणासाठी भाजपने पणजीत काढली 'लोकशाही बचाव' पदयात्रा!
- उत्तर प्रदेश: लग्नापूर्वीच तिरंग्यात परतला अलीगढ़चा शिपाई; नायक करन चौधरी यांच्या अंगावर काटा आणणारी बलिदान गाथा
- गोंदिया: उदमांजर शिकारप्रकरणी सहा जण जेरबंद; गोंदिया वनविभागाची धडक कारवाई, कामठा परिसरातील घटना
- गोवा: शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लोकहिताचे काम करत राहणार आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची गोवा येथे गर्जना



























Subscribe to my channel



