कोल्हापूर जिल्ह्यातील नामांकित आणि अग्रगण्य अशा श्री महालक्ष्मी सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ दूध संघ) च्या कारभाराबाबत नूतन अध्यक्ष राजेश पाटील यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि स्पष्ट भूमिका मांडली आहे. सध्या राज्यात आणि जिल्ह्यात कमी झालेला पाऊस तसेच सतत बदलत चाललेले हवामान यामुळे पशुधनावर व दूध उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत दूध संकलन नवीन टप्प्यावर नेऊन वाढवण्याऐवजी, सध्या सुरू असलेली दूध संकलनाची पातळी टिकवून ठेवणे हेच आमच्यासमोर सर्वात मोठे आव्हान असल्याचे मत गोकुळचे नूतन अध्यक्ष राजेश पाटील यांनी व्यक्त केले. 'सकाळ' वृत्तपत्राच्या कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीदरम्यान ते बोलत होते. यावेळी संपादक निखिल पंडितराव यांनी त्यांचे स्वागत केले, तर संघाचे इतर संचालकही उपस्थित होते.
चारा-पाण्याची टंचाई आणि २४ कोटींहून अधिक रुपयांचा तोटा:
सध्या कोल्हापूर जिल्ह्यातच नव्हे, तर राज्यभरात आणि देशभरात दुष्काळसदृश आणि चिंताजनक परिस्थिती निर्माण झाल्याचे नमूद करत अध्यक्ष राजेश पाटील म्हणाले की, आगामी काळात जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनत चालला आहे. उपलब्ध अंदाजानुसार, जानेवारीपर्यंत पुरेल इतकाच चारा सध्या उपलब्ध आहे. जानेवारीनंतर पुढे ओला आणि सुका चारा कसा उपलब्ध करायचा आणि पाण्याची स्थिती काय राहील, यांसारख्या अनेक प्रश्नांना संघाला सामोरे जावे लागणार आहे.
याशिवाय, मागील कालावधीत पशुखाद्य निर्मिती आणि इतर प्रशासकीय कारणांमुळे २४ कोटींहून अधिक रुपयांचा आर्थिक तोटा दूध संघाला सहन करावा लागला आहे. हा झालेला मोठा तोटा लवकरात लवकर भरून काढण्यासाठी कठोर प्रयत्न करावे लागणार असून, या तोट्याची नेमकी कारणे शोधून त्यावर ठोस उपाययोजना केल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. पशुधन आणि दूध उत्पादक शेतकरी वाचवणे ही आमची पहिली प्राथमिकता आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट आणि राजकारणाचे जोडे बाजूला ठेवण्याचे आवाहन:
चारा-पाण्याच्या तीव्र संकटावर आणि दूध संघाच्या सद्यस्थितीवर चर्चा करण्यासाठी मंगळवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती राजेश पाटील यांनी दिली. मुख्यमंत्र्यांना जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची आणि दुग्ध व्यवसायासममोरील आव्हानांची सविस्तर माहिती दिली जाणार आहे.
राजकारणाबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, "आता राजकारणाचे जोडे गोकुळच्या बाहेर ठेवायची वेळ आली आहे." आत्तापर्यंत निवडणुका व राजकारणात जे घडले ते मागे सोडून आता सर्वानी एकत्र येऊन दूध उत्पादक शेतकर्यांच्या हितासाठी एकजुटीने काम करण्याची गरज आहे. दूध संकलनासह दर्जेदार दूध विक्रीचेही मोठे आव्हान आमच्यासमोर आहे. सर्व संचालकांना विश्वासात घेऊन आणि सोबत घेऊन या सर्व संकटांना सामोरे जाऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पशुखाद्य, कच्च्या मालाचे वाढते दर आणि भविष्यातील दिशा:
पशुखाद्य निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल, दुग्ध प्रक्रियेसाठीचा खर्च आणि डिझेल-इंधनाच्या वाढत्या दरांमुळे उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांवर अतिरिक्त भार न पडता आणि दूध उत्पादकांनाही योग्य मोबदला मिळवून देताना दरवाढीचा निर्णय घेताना सारासार विचार करावा लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
समविचारी आघाडीचे प्रमुख नेते आमदार सतेज पाटील यांनी सर्व संचालकांना बैठकीसाठी पूर्ण सहकार्य केले असून, भविष्यात सर्व संचालकांच्या एकत्रित सहकार्यामुळे विरोध पूर्णपणे निवळल्याचे पाहायला मिळेल, असा विश्वासही अध्यक्ष राजेश पाटील यांनी शेवटी व्यक्त केला.
शहर
- पुणे: आदिवासी विद्यार्थ्यांच्या डीबीटी प्रक्रियेत मोठे सुधारणा निर्णय; आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना अर्ज करताना आता अनावश्यक कागदपत्रांपासून सुटका
- पुणे: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दोन दिवसांचा पुणे दौरा; विविध प्रकल्पांचे उद्घाटन, सहकार क्षेत्राचे भूमिपूजन आणि दिवंगत अजित पवार यांच्या पुतळ्याचे होणार अनावरण
- नागपुर: सडक्या सुपारीचा महाघोटाळा! शहराच्या सीमेवर उभारली हजारो क्विंटलची गोदामं अन् भट्ट्या; रासायनिक प्रक्रियेद्वारे घातक सुपारीची होतेय तस्करी
- नाशिक: लालपरीतून आता थेट अयोध्येचे दर्शन! नाशिकमधूनही राम मंदिराच्या तीर्थयात्रेचे नियोजन; एसटी महामंडळाकडून विशेष सोय उपलब्ध
महाराष्ट्र
- मुंबई: गोरेगावमधील संतापजनक घटना: घरखर्चावरून झालेल्या वादातून दारूच्या नशेत असलेल्या मुलाकडून वृद्ध आईची हत्या; बांगुरनगर पोलिसांनी आवळल्या मुसक्या
- पुणे: आदिवासी विद्यार्थ्यांच्या डीबीटी प्रक्रियेत मोठे सुधारणा निर्णय; आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना अर्ज करताना आता अनावश्यक कागदपत्रांपासून सुटका
- पुणे: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दोन दिवसांचा पुणे दौरा; विविध प्रकल्पांचे उद्घाटन, सहकार क्षेत्राचे भूमिपूजन आणि दिवंगत अजित पवार यांच्या पुतळ्याचे होणार अनावरण
- नागपुर: सडक्या सुपारीचा महाघोटाळा! शहराच्या सीमेवर उभारली हजारो क्विंटलची गोदामं अन् भट्ट्या; रासायनिक प्रक्रियेद्वारे घातक सुपारीची होतेय तस्करी
गुन्हा
- धाराशिव: मोबाईलसाठी पैसे दिले नाही म्हणून जन्मदात्या वडिलांची झोपेतच हत्या; पोटच्या मुलाच्या कृत्याने धाराशिव हादरले!
- पुणे: भाऊबीजेच्या दिवशीच नात्याला काळीमा! दिवाळीचा फराळ घेऊन आलेल्या बहिणींना भावाची बेदम मारहाण; बेसबॉल स्टिकने डोक्यावर केले वार
- मुंबई: पोलिसांची धडक कारवाई! कांदिवलीतील कुख्यात 'टिपू टोळी'वर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई, १७ गुन्हे दाखल असलेले मुख्य म्होरक्यासह तिघे जण जेरबंद
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
- आजचे राशिभविष्य ३१ ऑक्टोबर २०२६ : त्रिग्रह योगाचा तिप्पट लाभ, जाणून घ्या कशी असेल तुमची रास!
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: सोनिया गांधींच्या आत्मचरित्रावर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींची पहिलीच प्रतिक्रिया; म्हणाल्या, हे पुस्तक म्हणजे अत्यंत मनापासून आणि प्रामाणिकपणे...
- नवी दिल्ली: अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी; लॉरेंस बिश्नोई गँगच्या नावाने मागितले ७ कोटी रुपये!
- भोपाल: दारू पिण्यावरून झालेल्या वादानंतर तरुण चढला पाण्याच्या टाकीवर, भावांसमोरच खाली उडी मारत संपवले जीवन
- गोवा: नागरिकांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण! शिरगाव-पणजी कदंब बससेवा प्रथमच सुरू, प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण!


























Subscribe to my channel




