
१ जून २०२६ पासून देशभरात अनेक बँकिंग आणि आर्थिक नियमांमध्ये बदल झाले आहेत. याचा थेट परिणाम क्रेडिट कार्डधारकांच्या खिशावर होणार आहे. कोटक महिंद्रा बँक, आयसीआयसीआय बँक, बँक ऑफ बडोदा आणि एचडीएफसी बँकेने आपल्या क्रेडिट कार्ड धोरणांमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत.
१. कोटक महिंद्रा बँक: कोटक महिंद्रा बँकेने १ जूनपासून रिवॉर्ड पॉईंट्स आणि शुल्काबाबत नवीन नियम लागू केले आहेत:
-
युटिलिटी बिले, इंधन (Fuel), भाडे (Rent) आणि शिक्षण पेमेंटवर रिवॉर्ड पॉईंट्स मिळण्यावर मर्यादा (Capping) आणली आहे.
-
रिवॉर्ड पॉईंट्सच्या 'रिडेम्पशन व्हॅल्यू'मध्ये कपात करण्यात आली आहे.
-
सर्व प्रकारच्या रेंट आणि एज्युकेशन पेमेंटवर १% ट्रांजॅक्शन फी आकारली जाईल.
-
टीप: 'व्हाइट रिझर्व्ह', 'सॉलिटेअर', 'इन्फिनिट', 'सिग्नेचर', 'इंडियन ऑईल' आणि 'मिंत्रा कोटक' यांसारख्या निवडक कार्ड्सना इंधन शुल्कातून सूट देण्यात आली आहे.
२. आयसीआयसीआय बँक:
-
आयसीआयसीआय बँकेने १८ जूनपासून आपल्या 'अॅमेझॉन पे क्रेडिट कार्ड'वर रेंट पेमेंट केल्यास मिळणारा १% रिवॉर्ड पॉईंट्सचा फायदा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
३. बँक ऑफ बडोदा:
-
बँक ऑफ बडोदाच्या 'वन को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड'वरील थकीत रक्कमेवर (Unpaid Dues) व्याजदर वाढवण्यात आला आहे. हा दर ३.४९% वरून वाढवून ३.७५% प्रति महिना करण्यात आला आहे, जो २३ जून २०२६ पासून लागू होईल.
४. एचडीएफसी बँक:
-
एचडीएफसी बँकेने एसएमएस अलर्ट नियमात बदल केला आहे. २५ जून २०२६ पासून लहान व्यवहारांसाठी एसएमएस पाठवणे बंद केले जाईल.
-
केवळ यूपीआय व्यवहारांवरच मेसेज येतील. पैसे पाठवताना १०० रुपयांपेक्षा जास्त आणि पैसे खात्यात जमा होताना ५०० रुपयांपेक्षा जास्त व्यवहारांवरच मेसेज अलर्ट मिळतील. इतर व्यवहारांची माहिती ग्राहकांना ईमेलद्वारे दिली जाईल.
तज्ज्ञांचा सल्ला: बँकेचे हे बदल खर्च व्यवस्थापनाचा भाग आहेत. त्यामुळे क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांनी बँकेच्या अधिकृत वेबसाईट किंवा ॲपवरून आपल्या कार्डशी संबंधित नवीन नियमांची खात्री करून घ्यावी आणि वेळेवर बिल भरण्यावर भर द्यावा.
सविस्तर वाचा, लिंक कमेंट मध्ये:https://punenews24.in/
शहर
- मुंबई: शिंदेसेनेत अंतर्गत बंडाळी उफाळली! अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी श्रीकांत देशपांडे यांचे दोन उमेदवारी अर्ज दाखल
- मुंबई: पर्यावरणपूरक गणेशोत्सव गिरगाव चौपाटीवर नागरिकांनी समुद्रात न टाकता निर्माल्य थेट प्रतिष्ठानकडे केले सुपूर्द
- ठाणे: हत्येनंतर उद्धव ठाकरेंचा ठाणे दौरा; प्रदीप पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन
- मुंबई: आगामी ४ ऑक्टोबरच्या मोर्चात पक्षाचा झेंडा बाजूला ठेवून सर्व कार्यकर्ते सहभागी होणार; राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांची घोषणा
महाराष्ट्र
- पुणे: गजबजलेल्या रस्त्यावर थरार; नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलणाऱ्या तरुणाचे प्राण अग्निशमन जवानांनी वेळीच वाचवले
- मुंबई: शिंदेसेनेत अंतर्गत बंडाळी उफाळली! अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी श्रीकांत देशपांडे यांचे दोन उमेदवारी अर्ज दाखल
- मुंबई: पर्यावरणपूरक गणेशोत्सव गिरगाव चौपाटीवर नागरिकांनी समुद्रात न टाकता निर्माल्य थेट प्रतिष्ठानकडे केले सुपूर्द
- सातारा: दुष्काळाची भीषण परिस्थिती; माण आणि खटाव परिसरात नद्या-विहिरी कोरड्या, पिके वाळून गेल्याने शेतकरी संकटात
गुन्हा
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
- पुणे: कारेगावात दिवसाढवळ्या थरारक गोळीबार पाण्याच्या प्लँटवर कामावर गेलेल्या तरुणाच्या डोक्यात गोळी झाडून निर्घृण हत्या!
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
- लंडन: युझवेंद्र चहलची काउंटी टीमला भावनिक साद; 3 वर्षे, 9 बळी आणि असंख्य आठवणी चहलचा नॉर्थम्प्टनशायरला भावनिक निरोप



























Subscribe to my channel




