पुणे: भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त राज्यभरात ११ ते १८ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत 'जनजातीय गौरव सेवा सप्ताह' अतिशय उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहाच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा थेट लाभ मिळवून देण्यासाठी विविध महत्त्वपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात आदिवासी बांधवांसाठी घरकुल उभारणीसाठी ८६३ भूमिहीन लाभार्थ्यांना हक्काची जागा उपलब्ध करून देण्यात आली असून, १४ हजारांहून अधिक जणांना आधारकार्डचे वाटप करण्यात आल्याची मोठी माहिती समोर आली आहे.
या विशेष उपक्रमाबाबत माहिती देताना उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितले की, भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी, तसेच जल, जंगल आणि जमिनीच्या संरक्षणासाठी दिलेला लढा आणि स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचे योगदान अतुलनीय आहे. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी आणि त्यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी १५ नोव्हेंबर हा दिवस 'जनजाती गौरव दिन' म्हणून देशभरात साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, घोडेगाव यांच्या वतीने सेवा सप्ताहांतर्गत धनादेश वितरण, स्मारक स्वच्छता व दीपोत्सव, रानभाजी महोत्सव, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, आदिवासी मेळावे तसेच आरोग्य व पोषण जनजागृती शिबिरे अशा अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
घरकुलांसाठी भूमिहीनांना भूमी उपलब्ध प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान (PM-JANMAN) योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यात एकूण १ हजार ९६७ घरकुलांचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करताना, ज्यांच्याकडेस्वतःची जागा नाही अशा तब्बल ८६३ भूमिहीन लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी हक्काची जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय, आंबेगाव, भोर, मावळ, मुळशी, खेड, जुन्नर आणि राजगड या सात प्रमुख तालुक्यांमधील उर्वरित ६४० लाभार्थ्यांना देखील लवकरात लवकर जागा उपलब्ध करून देण्याची प्रशासकीय कार्यवाही वेगाने सुरू आहे.
शासकीय कागदपत्रे आणि योजनांचा लाभ आदिवासी व कातकरी समाजातील नागरिकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांच्याकडील कागदपत्रांचा प्रश्न सोडवण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील कातकरी समाजातील नागरिकांना आतापर्यंत तब्बल १४ हजार ४४१ आधारकार्ड, १३ हजार ४८६ जातीचे दाखले आणि ११ हजार १७० रेशनकार्ड यशस्वीरीत्या वितरित करण्यात आले आहेत. केवळ कागदपत्रेच नव्हे, तर इतर कल्याणकारी योजनांचा लाभही मोठ्या प्रमाणावर देण्यात आला आहे. यामध्ये:
-
आयुष्मान कार्ड: ४ हजार २०० नागरिकांना मोफत उपचारासाठी आयुष्मान कार्ड वाटप.
-
जनधन बँक खाती: वित्तीय समावेशनासाठी ९७१ नागरिकांची जनधन बँक खाती उघडण्यात आली.
-
किसान सन्मान निधी: शेतीला हातभार लावण्यासाठी ४८५ नागरिकांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ देण्यात आला.
या सर्व उपक्रमांमुळे आदिवासी आणि दुर्गम भागातील वाड्या-वस्त्यांवर राहणाऱ्या नागरिकांच्या जीवनात मोठा सकारात्मक बदल होत असून, शासनाच्या विविध योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचत आहेत. दरम्यान, पुणे जिल्ह्याप्रमाणेच बीड जिल्ह्यातही ११ ते १८ नोव्हेंबरदरम्यान जनजाती गौरव दिवस सेवा सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा केला जात असून, यादरम्यान विविध सामाजिक व विकासात्मक उपक्रम राबविले जात आहेत.
शहर
- नागपूर: भाऊबीजेच्या पूर्वसंध्येला नागपुरात काळाचा घाला! हिवरा बाजारची मंडई पाहून परतताना झालेल्या दोन भीषण अपघातांत तिघांचा मृत्यू
- मुंबई: प्रशासनाची बंदी झुगारून मुंबईच्या आकाशात रॉकेटची आतषबाजी; एकाच दिवसांत फटाक्यांमुळे तब्बल १३७ दुर्घटनांची नोंद!
- पुणे: दिवसाआड पाणी, मग कालव्यातून पाणी कुणासाठी? मनसेचे कालव्यात 'प्रतीकात्मक पोहण्याची स्पर्धा' घेत अनोखे व आक्रमक आंदोलन!
- पुणे: बारामतीत शेतकरी कुटुंबासोबत साजरी केली भाऊबीज; सुनेत्रा पवारांनी घेतला दुष्काळी परिस्थितीचा आढावा, शेतकऱ्यांना मदतीची हमी
महाराष्ट्र
- नागपूर: भाऊबीजेच्या पूर्वसंध्येला नागपुरात काळाचा घाला! हिवरा बाजारची मंडई पाहून परतताना झालेल्या दोन भीषण अपघातांत तिघांचा मृत्यू
- मुंबई: प्रशासनाची बंदी झुगारून मुंबईच्या आकाशात रॉकेटची आतषबाजी; एकाच दिवसांत फटाक्यांमुळे तब्बल १३७ दुर्घटनांची नोंद!
- पुणे: दिवसाआड पाणी, मग कालव्यातून पाणी कुणासाठी? मनसेचे कालव्यात 'प्रतीकात्मक पोहण्याची स्पर्धा' घेत अनोखे व आक्रमक आंदोलन!
- पुणे: बारामतीत शेतकरी कुटुंबासोबत साजरी केली भाऊबीज; सुनेत्रा पवारांनी घेतला दुष्काळी परिस्थितीचा आढावा, शेतकऱ्यांना मदतीची हमी
गुन्हा
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
- पुणे: हुंड्याच्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित पायल झांबरेची आत्महत्या; संतप्त माहेरच्यांनी 'झांबरे पॅलेस' फोडले, पतीला अटक
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३१ ऑक्टोबर २०२६ : त्रिग्रह योगाचा तिप्पट लाभ, जाणून घ्या कशी असेल तुमची रास!
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी; लॉरेंस बिश्नोई गँगच्या नावाने मागितले ७ कोटी रुपये!
- भोपाल: दारू पिण्यावरून झालेल्या वादानंतर तरुण चढला पाण्याच्या टाकीवर, भावांसमोरच खाली उडी मारत संपवले जीवन
- गोवा: नागरिकांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण! शिरगाव-पणजी कदंब बससेवा प्रथमच सुरू, प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण!
- उत्तर प्रदेश: भाऊबीजेच्या आनंदावर विरघळली दिवाळी; हरदोईतील गंगा एक्सप्रेसवेवर भीषण अपघातात पती-पत्नीसह दोन चिमुरड्यांचा मृत्यू, हसताखेळता परिवार उद्ध्वस्त!
























Subscribe to my channel




