पुण्यातील कोंढवामधील संशयिताच्या घरावर NIA चा छापा

NIA ने पुण्यातील कोंढवामधील तल्हा खान या व्यक्तीच्या घरावर छापा टाकला. तो ISKP या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात होता आणि या संघटनेची विचारधारा पसरवण्याचे काम करत होता असा संशय एनआयएला आहे. 

पुणे : राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने पुण्यातील कोंढवा भागातील तल्हा खान नावाच्या 38 वर्षीय व्यक्तीच्या घरावर छापा टाकून इस्लामिक स्टेटशी संबंधित कागदपत्रे आणि डिजिटल साहित्य जप्त केलं आहे. तल्हा खान इस्लामिक स्टेट खुरासान प्रांत या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात होता आणि या संघटनेची विचारधारा पसरवण्याचे काम करत होता असा संशय एनआयएला आहे. या प्रकरणात जहानझीब वानी आणि त्याची बायको हिना बशीर बेग या काश्मिरी दाम्पत्याला मार्च 2020 मध्ये अटक करण्यात आल्यानंतर दिल्लीत लोधी कॉलनी पोलीस ठाण्यात 8 मार्च 2020 रोजी गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर एनआयएने 20 मार्च 2020 रोजी या प्रकरणाची पुन्हा नोंद केली होती. या प्रकरणाच्या तपासादरम्यान अब्दुल्ला बसीत, सादिया अन्वर शेख, नबील सिद्दीकी खत्री आणि अब्दुल रहमान या चौघांना अटक करण्यात आली होती.


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *