सातारा: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (SDCC Bank) २०२६-३१ च्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी (१ नोव्हेंबर) अत्यंत चुरशीच्या वातावरणात तब्बल ९७.९२ टक्के एवढे उच्चांकी मतदान पार पडले. जिल्ह्यातील राजकीय इर्षेने पेटलेल्या या निवडणुकीत महायुतीमधीलच घटक पक्ष आणि प्रमुख नेते समोरासमोर आल्याचे पाहायला मिळाले. एकूण २१ संचालक पदांपैकी ९ जागांवर आधीच बिनविरोध निवड झाली असून, उर्वरित १२ संचालक पदांच्या जागांसाठी हे मतदान पार पडले. या निवडणुकीची मतमोजणी उद्या (३ नोव्हेंबर) होणार असून संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष निकालाकडे लागले आहे.
जिल्ह्यातील ११ तालुक्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली. सातारा, कराड, वाई, पाटण, जावळी आणि फलटणसह बहुतांश ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्तात मतदान शांततेत झाले. मात्र, खंडाळा येथील मतदान केंद्राबाहेर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद होऊन तुफान राडा झाला.
खंडाळ्यात वाद अन् लाठीचार्ज:
खंडाळा प्रशासकीय इमारतीबाहेर मिनी बसमधून आलेल्या मतदारांच्या मुद्द्यावरून राजकीय तणाव वाढला. मंत्री मकरंद पाटील (राष्ट्रवादी) आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (भाजप) यांचे समर्थक आमनेसामने आले. भाजप कार्यकर्त्यांना उद्देशून एका कार्यकर्त्याने शेरेबाजी केल्याचा आरोप करत भाजप समर्थकांनी त्याला ताणून चोपले. यानंतर दोन्ही गटांचे कार्यकर्ते भिडले आणि जोरदार हाणामारी सुरू झाली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला आणि गर्दी पांगवली. सुमारे १५ मिनिटे चाललेल्या या राड्यामुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता.
उद्या निघणार कौल:
या निवडणुकीत सहलीवरून थेट मतदानासाठी आणलेले मतदार आणि प्रमुख नेत्यांची पणाला लागलेली प्रतिष्ठा यामुळे संपूर्ण राज्यात सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीची चर्चा रंगली आहे. १२ जागांसाठी रिंगणात असलेल्या उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून उद्या ३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीत कुणाचे वर्चस्व सिद्ध होणार, हे स्पष्ट होणार आहे.
शहर
- नागपूर: नेता असूनही लोक माझ्यावर विश्वास ठेवतात, कारण मी आधी प्रयोग करतो; नागपूर परिषदेत नितीन गडकरींचे शेतकऱ्यांच्या ऊर्जा निर्मितीवर मोठे भाष्य
- नाशिक: सिंहस्थ ध्वजारोहणावर २० कोटींचा खर्च; अडीच कोटींचे हेलिपॅड उभारूनही व्हीआयपींनी रस्त्याने प्रवास केल्याने चर्चांना उधाण
- नाशिक: मालेगाव तालुक्याच्या घशाला पडली कोरड; १२५ गावे आणि ५८ वाड्यांना पाणीटंचाईची तीव्र धग
- नाशिक: सिंहस्थ कुंभपर्वाला मंगलमय वातावरणात प्रारंभ; त्र्यंबकेश्वर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला ऐतिहासिक ध्वजारोहण सोहळा
महाराष्ट्र
- पुणे: पुण्यात विवाहितेची आत्महत्या; घटनेनंतर संतापलेल्या नातेवाईकांकडून महर्षीनगर येथील 'झांबरे पॅलेस'ची तोडफोड, परिसरात तणाव
- नागपूर: नेता असूनही लोक माझ्यावर विश्वास ठेवतात, कारण मी आधी प्रयोग करतो; नागपूर परिषदेत नितीन गडकरींचे शेतकऱ्यांच्या ऊर्जा निर्मितीवर मोठे भाष्य
- नाशिक: सिंहस्थ ध्वजारोहणावर २० कोटींचा खर्च; अडीच कोटींचे हेलिपॅड उभारूनही व्हीआयपींनी रस्त्याने प्रवास केल्याने चर्चांना उधाण
- नाशिक: मालेगाव तालुक्याच्या घशाला पडली कोरड; १२५ गावे आणि ५८ वाड्यांना पाणीटंचाईची तीव्र धग
गुन्हा
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
- नाशिक: प्रेयसीचा दुरावा अन् आर्थिक छळाला कंटाळून २८ वर्षीय इंजिनीअर तरुणाची आत्महत्या; सुसाईड नोटमुळे पोलीस चक्रावले, चौघांवर गुन्हा दाखल
- रायगड: सिडकोच्या कारवाईच्या धसक्याने बाळू कांबडे यांचा मृत्यू खारघरच्या बेलपाडा आदिवासीवाडीतील अत्यंत दुर्दैवी घटनेने संताप!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- चंदीगड: पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ३ आमदारांनी पक्ष सोडत भाजपमध्ये केला प्रवेश
- दिल्ली: विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची दिल्लीत अमित शाहांची भेट; सुनेत्रा आणि पार्थ पवारांना वगळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ
- बंगळुरू: पंचतारांकित हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये विजेचा धक्का लागून दोन परदेशी पर्यटकांचा मृत्यू; वाचवताना दोघे जण गंभीर जखमी
- गोवा: एसटी आरक्षण रखडल्यास अनेकांचे भाग्य उजळणार; २०२५-२७ विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय समीकरणांना नवी दिशा


























Subscribe to my channel




