मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीमधील वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर सत्ताधारी पक्षांमधील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर, भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी शिवसेनेचे नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर काही प्रश्न उपस्थित करत टीका केली होती. या वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेत शिवसेना (शिंदे गट) नेते तथा आमदार निलेश राणे यांनी नवनाथ बन यांच्यावर अत्यंत कडक शब्दात पलटवार केला आहे.
नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीला अपेक्षेप्रमाणे यश न मिळाल्यामुळे पक्षांतर्गत चर्चा आणि जुगलबंदी सुरू झाली आहे. पुणे आणि नागपूर पदवीधर मतदारसंघातील पराभवानंतर भाजपच्या काही नेत्यांकडून शिवसेनेवर खापर फोडण्याचा प्रयत्न झाला. भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेबाबत सवाल उपस्थित केला होता. यावर प्रतिक्रिया देताना आमदार निलेश राणे यांनी बन यांना थेट शब्दांत सुनावले. "नवनाथ बन माझा मित्र नाही, आणि तो माझ्यापेक्षा खूप ज्युनिअर आहे. मी जेव्हा २००९ मध्ये खासदार झालो, तेव्हा तो शाळेत असेल," अशा शब्दांत त्यांनी बन यांच्या राजकीय वयावर आणि स्थानावर बोट ठेवले.
तसेच, "शिंदे साहेबांवर बोलताना प्रत्येकाने आपल्या लायकीत राहिले पाहिजे. तुझी लायकी किती आणि तू बोलतोयस किती?" असा संतप्त सवाल निलेश राणे यांनी केला. भाजपच्या प्रवक्त्यांनी पक्षाची चौकट ओळखून काम करावे, उगाच आमच्या नेत्यांवर बेछूट आरोप करू नयेत, असा इशाराही त्यांनी दिला. आपण महायुतीमध्ये एकत्र काम करत असलो तरी कुणी आमच्या नेत्यांविषयी चुकीची भाषा वापरत असेल, तर ते सहन केले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. या वादांमुळे महायुतीमधील घटक पक्षांमधील वाढलेला अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला असून राजकीय वर्तुळात या विधानाची जोरदार चर्चा सुरू आहे.
शहर
- पुणे: सातारा आणि सांगलीत निवडणुका मग पुणे जिल्हा बँकेचीच का पुढे ढकलली? खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारला संतप्त सवाल
- पुणे: पुण्यात पाण्याची नासाडी केल्यास थेट १० हजारांपर्यंत दंड; वॉशिंग सेंटर, जलतरण तलाव आणि बांधकामांसाठी पाणी वापरावर कडक निर्बंध
- मुंबई: लाडकी बहीण योजना अपडेट: ई-केवायसी न केलेल्या ८१ लाख महिलांना मिळणार १५०० रुपये? मुख्यमंत्र्यांनी काय दिले आश्वासन?"
- पुणे: इंदापुरात मोठी दुर्घटना! महामार्गाच्या कामादरम्यान डबराचा ढिगारा कोसळून ६ मजूर अडकले; चौघांची सुखरूप सुटका
महाराष्ट्र
- पुणे: सातारा आणि सांगलीत निवडणुका मग पुणे जिल्हा बँकेचीच का पुढे ढकलली? खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारला संतप्त सवाल
- सांगली: नदी प्रदूषित करणाऱ्या महापालिका, पालिकांसह कारखान्यांवर थेट गुन्हे दाखल करा; जलसंपदामंत्र्यांचे अत्यंत कडक आदेश
- पुणे: पुण्यात पाण्याची नासाडी केल्यास थेट १० हजारांपर्यंत दंड; वॉशिंग सेंटर, जलतरण तलाव आणि बांधकामांसाठी पाणी वापरावर कडक निर्बंध
- बुलढाणा: शेतकऱ्यांविषयीच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आमदार संजय गायकवाड बॅकफूटवर; पक्षाच्या दबावानंतर व्यक्त केली दिलगिरी
गुन्हा
- नाशिक: प्रेयसीचा दुरावा अन् आर्थिक छळाला कंटाळून २८ वर्षीय इंजिनीअर तरुणाची आत्महत्या; सुसाईड नोटमुळे पोलीस चक्रावले, चौघांवर गुन्हा दाखल
- रायगड: सिडकोच्या कारवाईच्या धसक्याने बाळू कांबडे यांचा मृत्यू खारघरच्या बेलपाडा आदिवासीवाडीतील अत्यंत दुर्दैवी घटनेने संताप!
- जालना: दारूच्या नशेत आई-वडिलांना मारहाण करणाऱ्या मोठ्या भावाला झोपेतच संपवले; लहान भावाने कुऱ्हाड चालवून केला खून!
- मुंबई: पत्नीसोबतच्या भांडणातून नराधम बापाने अवघ्या ९ महिन्यांच्या चिमुकल्याला स्कायवॉकवरून खाली फेकले; घाटकोपरमधील अंगावर काटा आणणारी घटना
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: सणासुदीचे दिवस सुरू, व्यापाऱ्यांच्या कमाईवर पाणी नका फेरू; रामलीला मैदानातील आंदोलनावरून दिल्लीतील व्यापाऱ्यांचे राहुल गांधींना भावनिक आवाहन
- गोवा: वास्कोतील रविवार बाजारात ऐन दिवाळीपूर्वी भीषण आग; १०० हून अधिक दुकाने जळून खाक, व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान
- गोवा: भाजपला पुन्हा सत्तेत आणणे हेच आपले मुख्य लक्ष्य मंत्री विश्वजीत राणे आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
- बिहार: विधानपरिषद निवडणुकीत भाजपला मोठा धक्का! पाटणा शिक्षक मतदारसंघात ३ दशकांची वर्चस्वाची परंपरा खंडित करत आरजेडीचा दणदणीत विजय



























Subscribe to my channel




