प्रो. मनोज कुमार झा यांचा कॉलम:भारताबद्दलची संकल्पना राष्ट्र‎ नायकांनी एकत्र येऊन घडवली

‎‎‎‎‎‎‎‎‎‎गेल्या तीन दशकांहून अधिक काळापासून मी एका‎वेगळ्याच प्रश्नाकडे पुन्हा पुन्हा वळत राहिलो. माझा‎जन्म 1920 च्या दशकातील भारतात झाला असता तर‎काय झाले असते? माझे किशोरावस्थेचे दिवस‎स्वातंत्र्यलढ्याच्या अंतिम व धामधुमीच्या काळात गेले‎असते, तर मी काय पाहिले असते, काय ऐकले असते व‎काय मानले असते? मी ऐतिहासिक क्षणात जगत होतो.‎त्याच्या भव्यतेची मला जाणीवअसती का? मी हा प्रश्न‎कोणत्याही भूतकाळाच्या मोहापोटी विचारत नाही.‎ माझा जन्म 1920 च्या दशकात झाला असता, तर माझे‎बालपण एका ब्रिटिश साम्राज्याच्या सावलीत गेले असते.‎माझी किशोरावस्था आपला राजकीय आवाज‎शोधणाऱ्या भारतासोबत गेली असती. 1930 आणि 1940‎च्या दशकापर्यंत राजकारण दैनंदिन जीवनात शिरले होते. ‎‎बाजारपेठांत अटकेच्या बातम्या व अफवा पसरलेल्या ‎‎असत. रेल्वे स्थानकांवर सभा व निदर्शनांसाठी‎जाणाऱ्यांची गर्दी दिसे. लहान शहरांत व गावांत स्वराज्य, ‎‎सत्याग्रह व सविनय कायदेभंग यांसारखे शब्द सामान्य ‎‎संभाषणाचा भाग बनले होते. विद्यापीठे केवळ‎अभ्यासाची ठिकाणे उरली नव्हती; ती राजकीय ‎‎कल्पकतेच्या प्रयोगशाळा बनत होती. स्वातंत्र्यलढा‎म्हणजे केवळ परकीय राजवट हटवून तिथे भारतीय‎राज्यकर्त्यांना बसवण्याची लढाई नव्हती. त्यामागे खूप‎मोठा प्रश्न दडला होता. एवढ्या विविधतेने नटलेल्या,‎असमान व विषम समाजात स्वातंत्र्याचा अर्थ काय‎असेल? नागरिकत्व म्हणजे काय असेल? लोकशाही‎असहमती व विविधतेला स्वतःमध्ये स्थान देऊ शकेल‎का? राजकारण हा माझ्यासाठी केवळ अभ्यासाचा‎विषय नसता; तो माझा जीवन-अनुभव असता.‎ आणि मग गांधीजी होते. त्या वर्षांमध्ये महात्मा गांधींचा‎सामना करणे म्हणजे केवळ एका राजकारण्याला भेटणे‎नव्हते. राजकारणात नैतिकतेला उतरवण्याचा एक‎असामान्य प्रयोग स्वतःच्या डोळ्यांनी पाहण्यासारखे ते‎होते. मी कल्पना करतो की, कदाचित मीसुद्धा मैलोनमैल‎चालत गांधीजींच्या एखाद्या प्रार्थना सभेला पोहोचलो‎असतो. गावांतील लोक, मजूर,विद्यार्थ्यांच् या मध्ये‎बसून त्यांना सत्याग्रह, शिस्त, अहिंसा आणि‎सद्भावाबद्दल बोलताना ऐकले असते. त्यानंतर नेहरूही‎होते.भविष्याची स्वप्ने पाहणारे. विचार करा, मी‎अलाहाबाद किंवा लाहोरमध्ये शिकणारा एखादा विद्यार्थी‎असतो आणि नेहरूंना विज्ञान, औद्योगिकीकरण,‎लोकशाही आणि आधुनिक जगात भारताची भूमिका‎यावर बोलताना ऐकले असते. स्वातंत्र्य हे अंतिम ध्येय‎नसून ती केवळ एक सुरुवात आहे, हे कदाचित त्यांनी‎मला समजावले असते. स्वतंत्र भारताला लोकशाही‎संस्था, वैज्ञानिक दृष्टिकोन, शिक्षण, आर्थिक नियोजन‎आणि लोकशाही सवयी विकसित कराव्या लागतील,‎असा नेहरूंचा मोठा आग्रह होता. त्यानंतर पटेल होते.‎त्यांचा राजकीय धडा काहीसा वेगळा होता. आंदोलन‎केवळ प्रेरणेने चालत नाही. हे ते सांगत. मग, कदाचित‎सर्वात जास्त विचारात पाडणारा सामना डॉ. भीमराव‎आंबेडकर यांच्याशी झाला असता. डॉ. आंबेडकरांना‎भेटणे कोणत्याही तरुण राष्ट्रवाद्याच्या सहज समजुतींना‎हादरवून टाकू शकत होते. त्यावेळी राष्ट्रीय स्वातंत्र्याची‎कल्पना लोकांना आकर्षित करत होती. त्या वेळी डॉ.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎आंबेडकर एक अस्वस्थ करणारा प्रश्न विचारत‎होते-स्वातंत्र्य कोणासाठी? त्याचसोबत मौलाना‎आझादही होते. त्यांची भारताची संकल्पना वाढत्या‎जातीय राजकारणासमोर वेगळा मार्ग दाखवत होती.‎त्यांचा सामायिक राष्ट्रवाद या विश्वासावर आधारित‎होता की, भारताची विविधता ही कोणतीही समस्या‎नसून ती तिची सांस्कृतिक वास्तविकता आहे.‎ गांधी, नेहरू, पटेल, डॉ.आंबेडकर आणि आझाद हे‎सगळे एकाच प्रकारे विचार करत नव्हते. त्यांचे मतभेद‎वास्तविक होते. त्यांच्या प्राधान्यक्रमांमध्ये अनेकदा‎संघर्ष होत असे. पण कदाचित हीच स्वातंत्र्यलढ्याची‎सर्वात मोठी ताकद होती. भारत कोणत्याही तयार‎कल्पनेच्या रूपात आपल्या नागरिकांकडे सोपवला गेला‎नव्हता. भारतावर चर्चा झाली होती. त्यावर असहमती‎झाली होती. त्याच चर्चेतून भारताची संकल्पना आकार‎घेत गेली होती. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे. )‎ इतिहास स्वतःच्या काळात कधीही‎इतिहासासारखा दिसत नाही. त्या काळात‎तुरुंगात गेलेले किंवा आंदोलनात सहभागी‎झाले त्यांना पुढील पिढ्या आपली कशी‎आठवण ठेवतील, हे ठाऊक नव्हते. ते‎इतिहासाच्या पुस्तकातील एखाद्या‎अध्यायात नव्हे, तर वर्तमानात जगत होते.‎‎‎

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *