एन. रघुरामन यांचा कॉलम:चला… कर्जफेडीचा उत्सव साजरा करूया

आयुष्यात चुकीचा आर्थिक निर्णय होणे किंवा चूक होणे हा गुन्हा नाही. सुरुवातीला सहज सांभाळता येते, तेच कर्ज व्याज वाढत गेल्यावर भयानक स्वप्न बनते. परतफेडीची रक्कम व्यक्तीच्या कमाईचा मोठा भाग खाऊन टाकू लागते. दुर्दैवाने, भारतात लोक हे लपवतात व लाज वाटण्यापासून वाचण्यासाठी सर्व काही ठीक असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करतात. सोशल मीडियावर नव्याने सुरू असलेला ट्रेंड यावर उत्तम पर्याय देतो. लोक उघडपणे कर्जाबद्दल बोलतात. त्याची नोंद ठेवतात. आपली जबाबदारी निश्चित करण्यासाठी लोकांना आमंत्रित करत आहेत. त्यांच्या या कथांशी विशिष्ट प्रेक्षक जोडले जातात. थकबाकी कमी होण्याच्या प्रत्येक टप्प्यावर उत्साह वाढवतात. काही आपल्या व्हिडिओंच्या माध्यमातून पैसेही कमावतात. त्याचा वापर ते आपले कर्ज फेडण्यासाठी करतात. लॉस एंजेलिसचे 33 वर्षांचे फ्लाइट अटेंडंट रॉडने मॉर्गन हे अशा हजारो लोकांपैकी आहेत. त्यांच्या प्रत्येक पोस्टला 1.5 लाख व्ह्यूज मिळाले. यावरून प्रत्येकाने सोशल मीडियावर कर्जाची जाहीर कबुली द्यावी, असा धडा मिळत नाही. कर्जबाजारी असण्यात लाज वाटण्यासारखे काही नाही. खरा धोका सर्वकाही ठीक असल्याचे ढोंग करण्यात आहे, हे यावरून शिकायला मिळते. कदाचित तुम्ही समजूतदारपणे कर्ज घेतले नसेल. तुम्ही कमाईपेक्षा जास्त खर्च केला असेल किंवा परतफेड क्षमतेचा चुकीचा अंदाज लावला असेल. चूक स्वीकारा, पण तिला तुमचे भविष्य ठरवू देऊ नका. तुमच्यावर नेमके किती कर्ज आहे याचा अचूक हिशेब करा. तुम्ही किती व्याज भरत आहात हे समजून घ्या. महागड्या कर्जाला प्राधान्य द्या व एक व्यावहारिक परतफेड योजना तयार करा. महत्त्वाचे म्हणजे समस्या हाताबाहेर जाण्यापूर्वी मदत मागा. लक्षात ठेवा, मदत मागणे म्हणजे हार मानणे नव्हे. ही स्वतःला पूर्वीसारख्या स्थितीत आणण्यासाठी उचललेली पहिली पायरी आहे. जुने कर्ज फेडण्यासाठी नवीन कर्ज घेत राहिल्यास कधीही न संपणाऱ्या चक्रात अडकू शकता. लोक महागडी घरे, गाड्या खरेदी करतात. त्यांचा उत्सव साजरा होतो. परंतु आता एक-एक हप्ता भरून कर्ज संपवतात. त्याचा उत्सव व्हावा. मॅनेजमेंट टिप: समाजासमोर श्रीमंत दिसणे ही सर्वात मोठी कामगिरी नाही, तर कर्जाच्या ओझ्याविना शांत झोप लागणे ही खरी कामगिरी आहे.

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *