2026 या नवीन वर्षाच्या सुरुवातीला छोट्या पडद्यावर अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. त्यात आता आणखी एका नव्या मालिकेची भर पडणार आहे. हृदयाला भिडणाऱ्या कथेसह ही मालिका छोट्या पडद्यावर येण्यास सज्ज झाली आहे. येत्या 16 मार्चपासून स्टार प्रवाह वाहिनीवर ‘आनंदी’ ही नवी मालिका सुरू होतेय. मालिकेच्या शीर्षकाला साजेशी अशीच या मालिकेची गोष्ट आहे. ही कथा आहे आनंदीची. एका अपघातात दृष्टी गमावलेल्या, पण तरीही जीवनाकडे अत्यंत सकारात्मक दृष्टिकोनाने पाहणाऱ्या तरुणीची. डोळ्यांनी जग दिसत नसलं, तरी मनाने आणि संवेदनांनी आनंदी संपूर्ण जग अनुभवते. तिचं अंधत्व हा तिचा दुबळेपणा नसून तिची सगळ्यात मोठी ताकद आहे. इतरांना सहज न सापडणाऱ्या गोष्टी आनंदी सहज ओळखते. ती अत्यंत संवेदनशील असून गरजूंना मदत करणं हा तिच्या स्वभावाचा अविभाज्य भाग आहे. कधी कधी आपले डोळे आपल्याला फसवू शकतात, पण मन कधीच नाही हा आनंदीचा जीवनमंत्र आहे. जगण्याचा भरभरून आनंद घेणारी आनंदी म्हणूनच इतरांपेक्षा वेगळी ठरते.
या मालिकेतून नवोदित अभिनेत्री जाई खांडेकर मालिका विश्वात पदार्पण करत आहे. आजवर अनेक नाटकांच्या माध्यमातून अभिनय, दिग्दर्शन आणि लेखिका अशी तिहेरी भूमिका पार पाडलेल्या जाईसाठी ‘आनंदी’ ही भूमिका एक नवा आणि आव्हानात्मक अनुभव आहे. या भूमिकेविषयी सांगताना जाई खांडेकर म्हणाली, “आनंदी नावाप्रमाणेच आनंदी स्वभावाची मुलगी आहे. ही फक्त एक भूमिका नाही, तर ती एक भावना आहे. डोळ्यांनी दिसत नसलेल्या गोष्टी आनंदी मनाने अनुभवते आणि तिच तिची खरी ताकद आहे. ही भूमिका साकारणं माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आणि जबाबदारी आहे. या भूमिकेसाठी आम्ही एका अंध मुलांच्या संस्थेत जवळपास आठवड्याभराचं वर्कशॉप केलं. या मुलांच्या दैनंदिन आयुष्यातल्या गोष्टी खूप जवळून अनुभवता आल्या. प्रेक्षकांना आनंदी नक्कीच आपलीशी वाटेल असा मला विश्वास आहे.’
या मालिकेच्या प्रोमोनं सोशल मीडियावर येताच एक नवा विक्रम रचला आहे. ‘आनंदी’च्या प्रोमोला अवघ्या काही तासांत दोन दशलक्षांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या प्रोमोवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. या प्रोमोवर अमित भानुशाली, रुपाली भोसले, प्रतीक्षा मुणगेकर, अभिषेक रहाळकर, रेश्मा शिंदे, भाग्यश्री जोईल, ऋतुजा बागवे यांसारख्या सेलिब्रिटींनीही कमेंट्स करत आनंद व्यक्त केला आहे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




